अरुणोदय झाला---२६
नाही हो नाही हो नाही......
माणसाला ठामपणाचे खूप आकर्षण असते व आदर्श चांगला माणूस हा अगदी ठाम असाच असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस बर्याच बाबतीत हो नाही च्या अध्येमध्येच घोटाळत असतो. सोनियांचा आजार लोकांना सांगावा का नाही ? राहूलने व्हेनेझुएलिन मुलीशी लग्न करावे का नाही ? राहूलने आत्ता लगेच पंतप्रधान व्हावे का पुढच्या निवडणुकी नंतर ? का प्रियांकालाच पंतप्रधानपद द्यावे ? हे खरे तर भारताचे मोठ्ठे प्रश्न असायला हवेत. पण लोकांना पडलेत एफडीआय-रिटेल, लोकपाल, महागाई, काळे धन, लाल दिवे वगैरे क्षुल्लक प्रश्न...
लोकपाल बिलात अगोदरच लोकसभेने तीन मुद्यांवर होकाराचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणून मग आता कशाला नाही म्हणता येत नाही का ? कोण लागून गेली आहे स्टॅंडिंग कमीटी ? खुद्द सम्राज्ञीला अमेरिकेला ऑपरेशनसाठी जावे लागले, हे खरे, पण कोणता आजार होता हे आम्ही सांगू शकलो का ? सांगितले का ? अभिषेक मनु सिंघवी आहेत खूप हुशार पण त्यांना सुद्धा आम्ही कॉंग्रेसच्या प्रवक्तेगिरीवरून एकदा काढून टाकलेच होते ना ? प्रणबदा आहेत खूप अनुभवी पण राजीवजींच्या काळात त्यांनासुद्धा आम्ही चांगले बदडले होते ना ? मग नक्की नक्की असे काय असते ? नक्की कशाचे नक्की नसतेच.
आमच्या नाही नाही म्हणण्याचे एवढे काय घेऊन बसलात. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा "नेति नेति" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ! ). अहो देवाची व्याख्या करताना सुद्धा भारतीय तत्वज्ञान म्हणून गेले आहे की "नेति नेति". मग आम्ही थोडे हो नाही, हो नाही, केले तर त्यात काय एवढे ? न, ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का? तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, "न करणे" ही असते. पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज "न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी "न-पदार्थ" अशी संबोधिली गेली आहे. "येथे"च्या उलट "तेथे" असे होते, पण "न येथे" म्हणजे काही "तेथे" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे "न येथे"! तसेच, "बोलणे" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने "ऐकणे" असे व्हावे. "न बोलणे " ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा "न"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री "बायनरी ऑपोजिशन" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).
साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, "वाया आणिका पंथा जाशी झणी" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात "असे करू नको", "तसे करू नको" किंवा बहुतेक पालक जसे "डोंट प्ले नाउ". "डोंट वेस्ट टाइम" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास "वाया जाणे" येतेच. मग सदगुरूला "बॅड पेरेंटिंग"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की "नो एंट्री" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.इंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो.
मग काय समजलात ? लोकपाल आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
एफडीआय-रिटेल मागे घेणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
काळे धन माघारी आणणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
महागाई कमी होणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
२-जी चे राजे सुटणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
राहूलच लग्न होणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
आमचेच राज्य परत येणार का नाही ? उत्तर आहे : हो नाही हो नाही हो नाही......
( हे सगळे खरे समजायचे का ? नाही हो नाही हो नाही हो...........)
-------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------------------------------