Thursday, March 4, 2010

न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
३ मार्च २०१०

2 comments:

  1. अरे पण तू एकच पोस्ट दोन वेळ का प्रकाशित केलं आहेस?
    तू केलेली तुलना भारी आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की
    मुळात गज़लची जी anatomy आहे ती कशी अभंगाच्या anatomy शी
    निकटवर्ती आहे हे यातून दिसते. हे मस्तपैकी समीक्षकी संदर्भ देऊन विकसित करून त्या कविता-रतीला पाठव की. मी तुला काही संदर्भ पाठवतो. जिथे काव्यप्रकारांच्या उत्क्रांतीविषयी चर्चा असेल.

    ReplyDelete
  2. i like ur blog.last time i was insisting u to start Blog u didnt disclose. anyway its good. i like the idea of translating Abhang in Hindi and comparing it with Gazal.

    ReplyDelete