Tuesday, November 16, 2010

अरुणोदय झाला--१०

भाज्या विरुद्ध बोकड
काल वळणावर दोन तीन रिक्षात पकडून नेत असलेले बोकड दिसले तेव्हाच ध्यानात आले की ईद जवळ आलेली दिसते. आणि आज पाहतो ते बॅंका बंद, ईद निमित्त ! ईद साठी की मोठया एकादशी साठी ?
हिंदू मुसलमानांचे कॅलेंडर कर्ते मोठे बेरके असावेत. नेमके एकादशीच्या दिवशीच ईद कशी आणतात ? आता ईद म्हटली की त्यांच्या रीतीप्रमाणे हे बोकड कापणारच. ज्यांना बोकड कापणे महागाचे वाटते त्यांच्यासाठी म्हणे अशी एक सोय आहे की सहा कुटुंबात मिळुन एक गाय किंवा म्हैस कापली तरी सहाही जणांना पुण्य मिळते. नेमके त्याच दिवशी एकादशी वाल्यांना मात्र उपासाचेच खावे लागणार, भाजीपाला !
धर्मांचे वादविवाद तर चालतच राहणार. पण काळ बदलतो आहे, हे आपल्याला कळते तसे त्यांनाही कळतच असणार. आता अमेरिकेतच पहा ना ! लोक आपण होऊन मांसाहार सोडून देत आहेत व खाताहेत नुसते भाजीपाला किंवा आपल्या खास शब्दात "घासपूस". हे कोणत्या धर्मामुळे नाही तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा टाळण्यासाठी होते आहे. म्हणजे त्यामागे वैज्ञानिक निकड आहे. तसेच काही लोक तर त्याही पुढे जाऊन व्हेगन होत आहेत. म्हणजे दुधाचे पदार्थही खायचे टाळायचे. त्याऐवजी आजकाल लोक पसंत करीत आहेत गोट-चीज, किंवा बकरीचे चीज. हे लागतेही छान ! हे खाल्ल्यावर महात्मा गांधी का बकरीच्या दुधासाठी एवढा आटापीटा करीत ते ध्यानात येते.
मग जागतिक कल जर भाजीपाला खाण्याकडे आहे तर हे बोकड, गाय, बैल, म्हैस, कोंबडी, वगैरे खाणे आपसुकच कमी व्हायला पाहिजे. किती दिवस हे धर्माच्या अभिनिवेशा खातर मासाहार करीत राहणार. हिंसेचे असेच होते आहे. आजकाल जागतिक क्षेत्रात हिंसेला अजिबात चांगले दिवस नाहीत. त्यामुळे सगळीकडेच हिंसेचा निषेध होत आहे. इतका की आता इस्लाम म्हणजे शांती व आम्ही जीहाद पसंत करीत नाही असे मुसलमानही म्हणायला लागलेत. बाकी आपण सगळे ह्याच कारणासाठी नक्षलवाद वगैरे हिंसक आंदोलनांची निर्भत्सना करतो आहोत.
हा जर जागतिक कल मानला तर बोकड कापण्याची हिंसा एक ना एक दिवस तरी बंद होईल हे अगदी स्वच्छ आहे, धर्म कोणताही असला तरी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

No comments:

Post a Comment