पनामा कावा का
कालवाकालव
जे कोपऱ्यावरून जाते तेच
परत येत असते अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. त्यावरून हे “पनामा पेपर्स” असे
मधेच कसे उपटले ह्याचे एक गूढच वाटत होते. आणि ह्यात सगळेच कसे ओवळे निघत आहेत
त्याचेही आश्चर्यच वाटत होते. शेवटी निकराने शोधाशोध केली आणि सापडले गौड-बंगाल.
मागे विकीलीक्स प्रकरण
झाले तेव्हा त्याच्या बातम्या केवळ “हिंदू”त येत, तेव्हा कळले की त्यांनी प्रचंड
पैसे खर्चून त्या विकत घेतल्या होत्या. तर मग आज हे “पनामा पेपर्स”चे कारनामे केवळ
इंडियन एक्स्प्रेस मध्येच कसे येतात ? तर असे आढळले की एक ICIJ नावाची शोध पत्रकारांची एक अमेरिकेत संस्था आहे त्याच्याशी एक्स्प्रेस संबंधित
आहेत. काय करते ही संस्था ?
सगळ्या प्रगत जगात अॅसबेस्टॉस वर बंदी आहे कारण त्याने फुफ्फुसांचा कर्क रोग
होतो. अमेरिकेत ह्याची एव्हढी प्रकरणे झाली की ह्यासंबंधीत उद्योग तर बंद झालेच
शिवाय जी नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागली त्याने विमा कंपन्याही बुडीत आल्या.
पण रशिया, ब्राझील, कॅनडा इथे हे उद्योग आजही खूप जोरात आहेत व त्याला तिथले सरकार
संरक्षण देते. चीन व भारत हे ह्या अॅसबेस्टॉसचे जगातले मोट्ठे ग्राहक आहे. अॅसबेस्टॉसच्या
खाणी रशियात प्रचंड प्रमाणात आहेत व पुतीन त्यांना संरक्षण देण्यात आग्रही आहेत.
सीएनएन वरची अमान्पोर हीही ह्या संस्थेशी निगडीत होती. फोर्ड फौंडेशन,
रॉकफेल्रर व जॉर्ज सोरोस हेही ह्या संस्थेत कार्यरत आहेत व त्यांना सध्या रशिया
सिरीयात जी चढाई करीत आहे त्याला लगाम घालायचा आहे व त्याला काही मुस्लीम राज्ये
मदत करीत आहेत त्यांनाही वठणीवर आणायचे आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या विरुद्ध
खुन्नसने अॅसबेस्टॉस विरोधी संशोधन करताना जी
माहिती हाती लागले होती त्याचा आता बोभाटा केला तर ह्या धोरणाने हे सगळे
प्रकरण बाहेर येत आहे. गरीब देशांना अॅसबेस्टॉसचे पत्रे छत म्हणून हवे आहेत तर ते
ह्या कर्क रोगापायी वापरू नयेत असा चांगला हेतूही त्यामागे आहे.
आणि ह्याच मुळे ह्या पनामा पेपर्स मध्ये अमेरिकन नावे नाहीत. कर भरला तर ज्यांची
नावे आलीत त्यांना काही डर नाही. पण मुख्य भर रशियाच्या पुतीन ह्यांना अडचणीत आणणे
मात्र ह्याने चांगले साधते आहे !
---------------------------------------------
No comments:
Post a Comment