स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )
जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे ! असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे ! प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !
Tuesday, January 17, 2017
स्त्रिया, आया, बाया...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment