अरुणोदय झाला: ३
वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.
--अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२
१. चॉम्सकी जे म्हणत आहे ते असे की इतके कमी inputs असतांना मानवी मूल इतके अधिक शिकते कसे? यालाच तत्त्वज्ञानात प्लेटोचा प्रॉब्लेम असे म्हणतात, याच्या विरुद्ध म्हणजे, एवढे evidence,inputs असतांना आपण इतके कमी कसे शिकतो, याला ऑरवेलचा प्रॉब्लेम म्हणतात. [अधिक माहितीसाठी पाहा गुगलबुक्सवरील हा दुवा, व त्या पुस्तकातील पेज 1: http://books.google.co.in/books?id=DXrJswWXMBcC&printsec=frontcover&dq=orwell%27s+problem&source=bl&ots=vIFGKpoQ1Q&sig=j4q0KFuhW0TUKrFm7MrdWoxQvyE&hl=en&ei=XiHTS_KUDJG3rAentMG_Bg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=5&ved=0CCAQ6AEwBA#v=onepage&q&f=false]
ReplyDelete२. मानवी भाषांत काळाच्या ओघात शब्दार्थ बदलतात, याचा उपरोक्त समस्येशी तसा थेट संबंध नाही. भाषेचा परिवर्तशीलता हा गुण आहे, तो तिच्या वापराने, जिवंतपणाने तिला मिळत असावा. तरी "वाट लागणे" याबद्दल अधिक असे: वाट लागणे याचा आधीचा अर्थ आज़ही कायम आहेच. जसं की "आम्ही वैजापूरहून येवल्याला जातांना आम्हाला मध्ये शिर्डीची वाट लागली होती" यात कोणताही (metaphoric, idiomatic) रूपकात्मक अर्थ नाही, तर वस्तुगत, भौतिक वाट लागली होती असाच अर्थ निघतो. "वाट लागणे" याला idiomatic अर्थ कधी प्राप्त होतो असा भाषावैज्ञानिक प्रश्न आहे. तर आपण असे म्हणू, जे आपले tentative hypothesis असेल की: अमुक व्यक्तीची वाट लागणे, प्रकल्पाची वाट लागणे असे प्रयोग असतांना व जेव्हा त्या दिशेने स्थलगत मार्गक्रमण प्रायः शक्य नसते अथवा अपेक्षित नसते व बव्हंशी संदर्भावरूनही कळून येते की "वाट लागणे" इथे "अमुकचा नाश संभव असणे किंवा त्यासंबंधी नकारात्मक गोष्टी संभव असणे इ." या अर तेव्हा वाट लागणेचा idiomatic अर्थ प्रतीत होतो.