अरुणोदय झाला----१४
काय आश्चर्य !
काही काही गोष्टी आपण धरून चालतो की आपल्याला त्या माहीत आहेत. असेच आश्चर्याचे आहे. तुम्हाला जर कोणी विचारले की आश्चर्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का ? तर हमखास छदमीपणे आपण हसून म्हणू "म्हणजे काय, माहीतय !" आणि जर विचारले की सांगा बरे सात आश्चर्ये कोणती आहेत ती ?
आता आली का पंचाईत ! अहो ताजमहाल हे आठवे आश्चर्य आहे हे तर पोटटया-सोटट्यांनाही माहीत आहे की ! अहो पण त्या अगोदरची सात आश्चर्ये कोणती ? आं कोणती बर ?
जर तुम्ही म्हणाल : गीझाचे पिरॅमिड, बॅबिलोनचे हॅंगिंग गार्डन, झीयसचा पुतळा ऑलिंपियाचा, एफेससचे आर्टेमिसचे देऊळ, हॅलिकार्नसेसचे म्युझियम, र्होडसचे कोलोसस, आणि अलेक्झांड्रियाचा दीपस्तंभ ----तर तुम्ही विकीपीडीयातून हे कॉपी केलेय हे नंतर सगळ्यांनाच कळेल. पण मराठी माणसासाठी सात आश्चर्ये कोणती ?
जाऊ द्या ! मीच सांगतो. ती आहेत अशी:
१) आकाशाला खांब नाही !
२) तळहाताला केस नाही !
३) समुद्राला झाकण नाही !
४) घोडयाला स्तन नाही !
५) देवाला आई-बाप नाहीत !
६) जीभेला हाड नाही !
७) केसाला रक्त नाही !
तुम्हाला वाटत असेल ही मी मनाने जुळविलेली आहेत तर ते तसे नसून ही सात आश्चर्ये आपल्या मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपटे यांचा शब्दरत्नाकर पृ.७५५ वर "सात आश्चर्ये" समोर) ती दिलेली आहेत.
आता पुढची सगळी आश्चर्ये आपल्याला माहीत आहेत, नक्की ना ?
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
The Bhalerao-----13
Seven Wonders of the World !
For some strange reason we feel sometimes confident that we know a certain answer. We think it is so easy that we know it already.
Here is a small demonstration. The question is : "WHAT ARE THE SEVEN WONDERS OF THE WORLD ?"
Oh ! Don't you know that our Taj Mahal is officially declared as the eighth wonder of the world. So we know it. Well then what are those seven wonders ? Well....I knew it , but somehow.....
If you said that these are :
* Great Pyramid of Giza
* Hanging Gardens of Babylon
* Statue of Zeus at Olympia
* Temple of Artemis at Ephesus
* Mausoleum of Maussollos at Halicarnassus
* Colossus of Rhodes
* Lighthouse of Alexandria...........................then obviously you got it from Wikipedia ?
But for a Marathi man , what are the seven wonders ?
Well , without much ado, I will tell you. These are :
1) There is no supporting column for the sky !
2) There are no hair on the palm !
3) There is no lid for the sea !
4) There is no breast for the horse !
5) God has no parents !
6) Tounge has no bone !
7) There is no blood in hair !
Don't think that I made up the above list of seven wonders myself ! No , it is given in our Marathi Dictionary ( W.G.Apte's ShabdaRatnakar page 755 against the word: saat aascharye ) .
Is'nt it a wonder that now, all further wonders we know ! What a wonder !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
Thursday, December 23, 2010
Saturday, December 11, 2010
अरुणोदय झाला----१२
तुटे वाद "संवाद", त्यासी म्हणावे !
सध्या भैरप्पांच्या कादंबर्यांविषयी वादंग उठले आहेत. कन्नडचेच एक मान्यवर साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती म्हणतात की भैरप्पा काही सर्जनशील कलाकार नाहीत, तर एक उत्तम वादपटू आहेत. वरवर पाहता ही शाबासकीच वाटते, पण त्याचा गर्भित अर्थ असा निघतो की एखादा जाहीरात लिहिणारा लेखक असतो, तसे तुम्ही निवडलेल्या विषयावर चांगला वाद मांडता . खपणार्या जाहीरातीसारखे ! पण ते काही साहित्य वा वाङमय नव्हे.
आता गंमत पहा हां. हा सुद्धा अनंतमूर्ती ह्यांचा एक वादच आहे. पण ह्यातली युगत अशी की कादंबरीतल्या मतांविरुद्ध टीका किंवा प्रत्युत्तर म्हणून दुसरी कादंबरी किंवा कविता किंवा निबंध असा प्रकार निवडण्या ऐवजी ते म्हणतात तुमची कादंबरी हे वाङमयच नव्हे, तो एक वादच आहे. हे म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट मध्ये आऊट झालेल्या मुलाने हा नो बॉलच होता असे म्हणण्यासारखे झाले. हा काही योग्य प्रतिवाद नाही.
कादंबरीत एखाद्या विषयावर जोरदार वाद करणे नसावे, असा काही कुठल्या साहित्यात नियम नाहीय. मुळात वाङमय प्रकारांना अशी बंधने नसतातच. प्रत्येक अविष्कारात, मग ती कविता असो, लघुकथा असो वा कादंबरी असो, काहीतरी ठामपणे सांगितलेले असते. ते तसे सांगिललेले नसेल तर उलट आपण म्हणतो की ह्यांना काय सांगायचेय ते समजत नाही किंवा नीट जमलेले नाही. म्हणूनच तर न कळणार्या कवितेला खूपजण दुर्बोध संबोधून कवीला दूषणे देतात किंवा आपापल्या परीने अर्थ लावतात. काही तरी प्रकर्षाने सांगणे हेच तर असते साहित्य. प्रतिभेला कुठल्याच विषयाचे वावडे नसावे . मग तो वाद करणे आहे म्हणून हिणकस कसे ? एखाद्या लेखकाचा उत्कर्ष होतोय की अपकर्ष हे कोण व कसे ठरवणार ?
इंग्रजीतल्या सध्या गाजत असलेल्या कादंबर्या पाहिल्या तर त्या त्या त्या विषयांवरचे अप्रतीमपणे पटवणारे वादच आहेत हे आपल्याला सहजी जाणवते. "दा व्हिन्सी कोड" मध्ये एका गुप्त ख्रिश्चन गटाच्या मतांबाबतचा वादच घातलेला आहे. मग त्याविरुद्ध मते असलेले लोक त्याविरुद्ध मतप्रदर्शन करतात. पूर्वी भारतात बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा होता. पण त्यांनी वाद-विवाद हा मार्ग धर्मप्रचारात स्वीकारलेला होता व शंकराचार्यांनी त्यात त्यांना जिंकत परत हिंदूंना जरा अवकाश मिळवून दिला असे म्हणतात. वाद-विवाद हे नेहमीच अहिंसक मार्गात समर्थनीय असतात, विशेषत: लोकशाही राजवटीत. पण वादाला प्रतिवाद न करता तुमचा वाद हा वादच नव्हे व मीच जिंकलो असे वाद-विवाद-नियमांत बसणारे नाही. वाद बाद झाला की मग तो संपतो.
जे अनंतमूर्ती भैरप्पांना म्हणतात की तुम्ही राजकीय विचार पसरवताहेत तेच अनंतमूर्ती स्वत: लोकसभेची निवडणूक लढले होते व देवेगौडांनी भाजपशी संगनमत केले म्हणून रागावलेले होते. एकेकाळी कम्युनिस्ट सत्ता राजकीय प्रचार करणारी भरपूर पुस्तके काढीत असे. अजूनही लोकवाङमय गृह ह्याच विचारांची पुस्तके आवर्जून काढते आहे व त्यात काहीच गैर नाही. चांगले वाङमय असेल तर लोक वाचतीलच.
हेच तर समर्थांनी म्हटले आहे की "तुटे वाद संवाद, त्यासी म्हणावे !"
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Arunoday zala-----12
A good debate is good for us !
Currently there is some controversy going on, in the field of literature. Especially in Kannada novels, which are popular and written by Mr.S.L.Bhairappa. His most famous novel, this year, by name, Aavaran ( meaning environment ) . In this novel his heroine shows by detailed arguments in the novel, how the Moguls had invaded our culture and were not a just rulers. The novel also gives a detailed reference of some 54 scholarly treatises written by famous authors, in support of the heroine. The book is extremely popular and has already running into its 20 th print in just a year.
So, what is the controversy ? A renowned senior Kannad writer by the name of U.R.Ananthmoorthy says that Bhairappa is not a creative writer but he is a good debator, especially as his occupation is professor of philosophy. So, as per him, it is a right wing, Hindutwa propaganda and not a good literature. Mr.Ananthmoorthy himself had contested in LokSabha election and indulged in politics but did not like it when in the past his leader, Devegouda compromised with BJP. But he is also a renowned Kannada Literary bigewig and is on Sahitya Academy also.
It is baffeling as to why a good literature should not give out a strong opinion, be it social cause or a political cause ? If we see the current famous novels, we find that they put out very convincing stron opinions. For example take "Da Vinci Code" by Dan Brown. It tells us how a christian secret society operated for some cause and how it was fought against. Even when the whole world was crying shame on the global warming Michel Chrishton wrote his famous novel "State of Fear" against the environmentalists. Taking an opposite view, even against the popular thought, does not disqualify an argument or a good novel.
In fact the proponents of Democracy have famously applauded it by saying "eternal vigilance is the price of democracy !" . And if someone does not take an opposite view, how are we to keep a good vigil ?
They say that once Buddhism was very pervasive in ancient India and that is why lot of Buddhists monastries are everywhere in India. They had accepted debates as a good way of propagating their religion and it is claimed that through these well conducted debates Shankaracharya made up lot of lost ground for Hindus. Instead of making an equally strong convincing argument against Mr.Bhairappa, if Ananthamoorthy just dumps his novels as not creative enough, it is akin to a gully cricket where if a boy is clean bowled he claims that it was a No-ball ! In good old times the communist regime had tried to influence the public by printing huge propaganda books. But ultimately people realise, what is a good novel and which are not !
Perhaps keeping this in mind our learned saint Ramadas had said "that is best communication which ends a good debate !" So, a good debate should be good for us !

Sunday, December 5, 2010
अरुणोदय झाला---११
"भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी"
मानवी व्यवहारात सत्य शोधण्याचे फार अप्रूप आहे. चांगली बुद्धिमत्ता असलेले लोक शास्त्रज्ञ होतात व ह्या विश्वातील सत्यतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यालाच आपण वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणू शकतो. त्यात असते कसोटी घेणे व त्याला खरे उतरणे. आणि इतर लोक हे प्रत्यही करीत असतात व म्हणूनच शास्त्रकाटयाची कसोटी ही त्या सत्य-शोधण्याची एक मूलभूत प्रक्रिया राहते.
साहित्यात असे मात्र होत नाही. कला व विज्ञान ह्या दोहोंचा सत्य शोधण्याचाच हेतु असतो पण कला आधीच ठरवते की तिच्या दृष्टीने सत्य काय आहे व मग ते इतरांनी पटले तर पत्करावे. विज्ञानातही गृहितके मानण्याची परंपरा आहे. पण विज्ञान कसोटीला सामोरे जाते तसे कला किंवा कलाकृती सत्याला सामोरे जात नाहीत.
आता भालचंद्र नेमाडे इतिहासातून "हिंदू" कादंबरी द्वारे सत्य त्यांना काय सापडले ते सांगतात. ते म्हणतात त्याप्रमाणे "ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला" व "हिंदू धर्माने जिंकलेल्या लोकांची संस्कृती स्वीकारत एक समृद्ध अडगळ आपल्या जीवनात निर्माण केली". आता त्यांचे हे म्हणणे खरे किती हे तपासायचे कोणी प्रयत्न करीत नाही. दरम्यान ५०० रुपयांच्या १५ हजार प्रती खपतात.
(म्हणजे गेला बाजार ७५ लाखांचा गल्ला जमतो ). म्हणजे कमीत कमी २५/३० हजार लोक ते म्हणणे ऐकून घेतात. आता हेच त्यांनी एखाद्या संशोधनार्थ प्रबंध लिहिला असता ( कोणी सांगावे लिहिला असेलही ! ) तर त्यावर किंवा त्याविरुद्ध कोणाला हे म्हणणे पडताळता तरी आले असते. पण कादंबरीत हे मांडलेले असल्याने तशी काही सोय नसते. वाटले तर वाचा, नाही तर वाचालच !
ज्यास्त प्रती खपल्या म्हणजे जे सांगितले आहे ते खरेच आहे असे होत नाही. कारण प्रती आधी खपतात व मग त्या लोक वाचतात ( किंवा बहुदा तशाच न वाचता ठेवून देतात ! ). तसेच उद्या ह्या कादंबरीला मोठमोठे पुरस्कार मिळाले तरी त्यावरून त्यातले प्रतिपादन सिद्ध झाले असे होत नाही. पटणे व खरे निघणे तर फारच दूर.
ह्याच अडचणी पायी तर बा.सी.मर्ढेकर म्हणाले नसतील ना की "भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी " ?

Saturday, December 4, 2010

Subscribe to:
Posts (Atom)