अरुणोदय झाला--८
साल्वोदोर डाली, किंमत झाली ?
मागे बातमी होती की साल्वोदोर डाली ह्या चित्रकाराचे चित्र काही कोटी डॉलर्सना ऑक्शनमध्ये विकल्या गेले. प्रथम त्याचा अचंबा वाटला, एवढी किंमत कशी ? मग वाचले की अशा प्रचंड किंमती इतर चित्रांनाही कशा मिळतात, हुसेन ह्यांची चित्रेही कशी कोटी कोटीला विकल्या जातात. मग वाटले की होता तरी कोण हा डाली ?
तर कळले की हा स्पेनचा मूळचा, सर-रिअॅलिस्ट चित्रप्रणालीचा एक चित्रकार, १९८३ मध्ये वारलेला. ह्याने स्वत:च्या चित्रांच्या प्रदर्शन, खरेदी, विक्री वगैरे साठी एक विना-प्रॉफिट फौंडेशन केलेले आहे. त्यांच्याकडे आजमितीला ५०० मिलियन डॉलरची चित्रे संग्रही आहेत व गेली २० वर्षे ते त्याची चित्रे खाजगी लोकांकडून विकत घेत आहेत. ह्याने चित्रांबरोबर फोटोग्राफी, कमर्शियल डिझाइनिंग, मूर्तीकला असे नाना उपद्व्याप केलेले. ह्याला विज्ञानाचे भयंकर आकर्षण. ह्याची प्रसिद्ध चित्रे आइनस्टाइनच्या रिलेटिव्हिटी ऑफ टाइम वर आधारलेली आहेत तर कित्येक न्युक्लियर तंत्रज्ञानावर. ह्याला आर्ट स्कूलने काढून टाकले होते कारण तो कोणाला योग्यतेचा समजत नव्हता. सर-रिएलिस्टांच्या संघटनेनेही नंतर ह्याच्यावर बहिष्कार टाकला होता. स्वत:च्या बापाबरोबर भांडण झाल्यावर ह्याला बेघर व्हावे लागले होते. वडिलांनी त्याचे नाव त्याच्या आधी मेलेल्या भावाचेच ठेवले होते तर त्याला आपण भावाचाच अवतार आहोत असे कैक वर्षे वाटे. ज्या येशू,मेरीचे चित्र ह्याने काढले होते त्यावर मी थुंकतो अस तो एकदा म्हणाला होता, तर शेवटच्या दिवसात अतिशय धार्मिक झाला होता. तो अतिशय छानछोकीने राही, विक्षिप्त वागे, सिनेमे पाही, काढी, दिग्दर्शन करी असा हरहुन्नरी व नंतर ठार वेडा म्हणता येईल असा !
त्याच्याच सारखे वेडे असणारे असंख्य वेडे चित्रकार आजही त्याच्या सारखी किंमत मिळावी असे वेड मनी बाळगून असतील पण चित्रात जे सर्जनाचे बेभान वेड हवे ते अजूनही त्यांच्या वाट्याला येत नाही, चित्रांची किंमत तर नाहीच ! डालीच्या वाटेला आलेले सर्जनाचे वेड लोभाचे का त्याच्या चित्रांच्या वाटेला आलेली किंमत लोभाची हे मात्र ठरवणे अशक्य !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Arunodaya Zala---8
Salvodor Dali, Got good price ?
Last week's news brought Salvador Dali in limelight once again. His personae was always seeking it, the history tells us. When we read about his life our amazement about the price his pictures is fetching fades away and we are left wonderstruck at the icredible turn of events he had. And yet he could produce such masterpieces.
At one time he was one of the main promotors of surrealist tradition but later they expelled him from their camp. He was even ousted from the Art school as he never accepted anyone to judge his paintings. He was a great student of science and many of his paintings show Einstein's relativity of time and some nuclear science. Though he initially insulted his own picture about Mary and Jesus, he turned to religion in his later life. He was given to dress dandy and practiced many other arts like photography, sculpture, commercial arts, advertising, acting in cinemas, directing them etc. Non-profit foundation in his name has a rich collection of his paintings worth 500 million and they are still buying since last 20 yrs.
There are many an artists who are equally ecentric in behaviour but would love to aspire to get the price for their paintings as his paintings command.
We are perplexed to decide as to what we should value more, his ecentricity in life or his madness in his artistic creations or the amazing price which his paintings fetch these days ?
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
Artists make us see the world through different lenses and that's is their gift. Whether they fetch big bucks or not is totally related to luck and their agents. Van Gough was brilliant but died poor and frustrated...Monet, on the other hand, got lucky with a great agent.
ReplyDeleteFor one Dali that became successfull there are at least a hundred equivalent Dali's that don't get the price and luck. Then how one should judge the greatness of a painting of a failed Dali ?
ReplyDelete