Saturday, July 31, 2010



वॉल स्ट्रीट जर्नल हे उद्योग जगतातले महत्वाचे दैनिक आहे. त्यांनी वेळात वेळ काढून एका चित्रासाठी जागा सोडून त्यावर एका चित्रकला समीक्षकाकडून चित्राचे रसग्रहण द्यावे हे फार कौतुकाचे आहे. आपण एरव्ही अमेरिकेची "पैसा, पैसा" करण्याची , भांडवलशाहीची निंदा नालस्ती करतो, पण एवढ्या धकाधकीच्या जमान्यात एखाद्या मास्टरपीस वर कोणी एवढे श्रम घ्यावेत त्याबद्दल आपण त्यांची अवश्य पाठ थोपटायला पाहिजे.
ह्या चित्राचे वैशिष्ट्य असे की ह्यात मेरी, येशूची आई , हिचा चेहरा चौकटीच्या मध्यभागी असल्याने त्यावर लक्ष्य केंद्रित होते.येशूची आई व आजी खाली येशूकडे व कोकराकडे पहात आहेत तर येशू व कोकरू वर त्यांच्याकडे पहात आहेत. त्याने पाहण्याचा समतोल साधतो. येशू पुढे मरणार आहे हे माहीत असूनही मेरी व तिच्या आईच्या नजरा मोना लिसा सारख्या निर्विकार आहेत. रंग संगतीत वरपासून खालपर्यंत रंग गडद होत जातात.

चित्राची माहीती व रसग्रहण जाणकारांकडून करून घेऊन आपण चित्रकलेचे, सौंदर्यास्वादाचे धडेच देत आहोत असे अशा प्रयत्नातून साध्य होत आहे. त्याबद्दल वॉल स्ट्रीट जर्नलच्या ह्या प्रयत्नांचे कौतुक करू या !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

No comments:

Post a Comment