Saturday, July 31, 2010
वॉल स्ट्रीट जर्नल हे उद्योग जगतातले महत्वाचे दैनिक आहे. त्यांनी वेळात वेळ काढून एका चित्रासाठी जागा सोडून त्यावर एका चित्रकला समीक्षकाकडून चित्राचे रसग्रहण द्यावे हे फार कौतुकाचे आहे. आपण एरव्ही अमेरिकेची "पैसा, पैसा" करण्याची , भांडवलशाहीची निंदा नालस्ती करतो, पण एवढ्या धकाधकीच्या जमान्यात एखाद्या मास्टरपीस वर कोणी एवढे श्रम घ्यावेत त्याबद्दल आपण त्यांची अवश्य पाठ थोपटायला पाहिजे.
ह्या चित्राचे वैशिष्ट्य असे की ह्यात मेरी, येशूची आई , हिचा चेहरा चौकटीच्या मध्यभागी असल्याने त्यावर लक्ष्य केंद्रित होते.येशूची आई व आजी खाली येशूकडे व कोकराकडे पहात आहेत तर येशू व कोकरू वर त्यांच्याकडे पहात आहेत. त्याने पाहण्याचा समतोल साधतो. येशू पुढे मरणार आहे हे माहीत असूनही मेरी व तिच्या आईच्या नजरा मोना लिसा सारख्या निर्विकार आहेत. रंग संगतीत वरपासून खालपर्यंत रंग गडद होत जातात.
चित्राची माहीती व रसग्रहण जाणकारांकडून करून घेऊन आपण चित्रकलेचे, सौंदर्यास्वादाचे धडेच देत आहोत असे अशा प्रयत्नातून साध्य होत आहे. त्याबद्दल वॉल स्ट्रीट जर्नलच्या ह्या प्रयत्नांचे कौतुक करू या !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Friday, July 30, 2010
अरुणोदय झाला---६
नव्या शब्दांचे घडणे
भाषा शास्त्र म्हणते की आपण प्रत्यही नवनवीन शब्द बनवत असतो, ते अंमलात आणत असतो, व कालांतराने त्यातली गोडी संपत आली की ते चक्क टाकूनही देतो. आपण पाहिले की आजकाल नवीन टारगट पोरे "वाट लागली", "भंकस", "फंडा", "सेंटी होणे", वगैरे शब्द बिनधास्त वापरत असतात.
तर अशाच अमेरिकेत वाट लागलेल्या एका कंपनीने ( गोल्डमन सॅक्स ) तोंडी अशा सूचना दिल्या आहेत की त्यांच्या नोकरवर्गाने सर्व शब्द ई-मेल मध्ये जपून वापरावेत व ते एरव्ही वापरतात ते शब्द, पण जे आजकाल बदनाम झालेत, ते वापरू नयेत. वाट लागल्यावर अमेरिका अभिव्यक्ति-स्वातंत्र्यावर कसे सोईस्करपणे डोळ्यावर कातडे ओढून घेते हे आपण बघतोच आहोत. अमेरिकेचा सेनापती अध्यक्षांविरुद्ध जरा मानहानीकारक बोलला ( एका मासिकाच्या मुलाखतीत )तर त्याला काढून टाकले गेले आणि तरीही दुसरीकडे जॉन स्टुअर्ट त्याच्या रोजच्या "डेली शो" कार्यक्रमात भल्याभल्यांची खिल्ली उडवत असतो. अशा गोंधळात हे कोणते शब्द आहेत हे पाहणे गमतीचे ठरेल.
एक शब्द आहे "एस-डील" ! काय असते हे ? तर सांगतात की "स्वीट-हार्ट डील". आता ह्या शब्दात नैतिकतेच्या चष्म्यातून बाधा येणारे काही दिसत नाही, मग हा का वापरू नये ? तर वकील लोक सांगतात, हे असे करार असतात की ज्यात सर्व फायदा एकाच पक्षाला , स्वीट-हार्टला, होतो. म्हणजे थोडक्यात जे एकतर्फी करार असतात ते कायद्याच्या दृष्टीने बेकायदा असतात. वेस्ट इंडीजला असताना आम्ही आमच्या कॉंन्ट्रॅक्टस मध्ये भारतीय परंपरेने मुदतीत काम न झाल्यास किती दंड ( पेनल्टी ) ते लिहीत असू. तिथल्या कंपन्या अमेरिकन प्रभावाखालच्य़ा . त्या म्हणत उशीर झाला तर जसा दंड तसाच लवकर काम उरकल्याबद्दल बक्षीसीही असायला हवी. हे कॉंन्ट्रॅक्ट कोर्टात टिकणार नाहीत व ते स्वीट-हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स ठरविल्या जातील.
जगात सर्वात भरभराट व्हावी ती मात्र अमेरिकेची, पण करार असू नयेत स्वीट हार्ट डील सारखे, असा अमेरिकन नीती- मत्तेचा खाक्या. इथे मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही हा नवीन शब्द वापरू नका असे म्हणताहेत, ते मात्र भाषाशास्त्राच्या विरुद्ध आहे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
arunoday zala--6
New Words
Linguistics tells us that over a period,in any language, we coin new words or give a new meaning to the existing words and when these are rarely used we throw them away as obosolete.
Recently Goldman Sachs in USA has asked its employees to use some words very cautiously in their emails, letters etc. This is mostly due to image problems. It is interesting to see which words the company thinks as damaging. Some words or symbolic short forms of them like "WTF" are definitely morally low sounding ( assuming the long form could be "Want to f---" ). Another word being banned is "S-deal". This word, though morally passable, perhaps means "Sweetheart Deal". What is so damning about Sweetheart Deal ? The lawyers will tell us that these are deals, which give all the terms favourable to one party alone, just like how we treat our sweethearts. Or at least we are supposed to.
When I was in West Indies, we used to mention in our contracts, in the habit of Indian ways of deals, a clause specifying penalty for delays. The contractors used to tell me that mentioning penalty alone, and not providing for incentives for early completion, would render these contracts to be Sweetheart deals and so void in court of law. So, the sweetheart deals are not balanced and are onesided and thus not considered as flawless contract.
On one hand America prides itself for upholding the right to freedom of speech ( but fires its general for speaking to a magazine in not so kind words about the president ) and on the other even the company going downhill like Goldman Sachs, tells which words not to use. Moreover the pure science of linguistics tells us that people will coin new words and new meanings ! It is a strange world !
Arun Anant Bhalerao

Wednesday, July 28, 2010
अरुणोदय झाला---५
भाषा तसे विचार
अमेरिकेत काहीही घडू शकते. "वॉल स्ट्रीट जर्नल" तसे शेअर्स, उद्योग वगैरे वरचे दैनिक. पण परवा त्यात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कल्चरल सायकॉलॉजीच्या मुख्य, श्रीमती लेरा बोरोडिटिस्की ह्यांचा "भाषेचे विचारांवर होणारे परिणाम" असा एक छान मोठा लेख होता. लेखिकेने त्यात असे दाखविले आहे की आपण कोणती भाषा बोलतो, त्याप्रमाणे आपल्या विचारांवर परिणाम होतो. भाषेचे रचनेचे जे निय़म असतात त्यानुसार विचार येतात. उदाहरण म्हणून बाई सांगतात की स्पॅनिश भाषेत "जॉन ने भांडे फोडले" असे म्हणताना "भांडे आपोआप फुटले" असे म्हणावे लागतात. त्यांच्या म्हणण्यानुसार मग जॉन जर स्पॅनिश मध्ये बोलला तर त्याच्यावरचा आळ जातो व भांडे फुटते. सामान्य वाचकाला ही "भांडा फोड" फोड केल्यावरच उमगणार.
इथे आठवण येते ती पु.ल.देशपांडेंची. ते म्हणत प्रत्येक भाषेचा आपला एक लहेजा असतो. उर्दू भाषा इतकी भारदस्त, शेर-शायरीवाली की त्यांना वाटे वाघ कधी काळी बोलला तर उर्दूतच बोलेल. असेच कित्येकांना वाटते की रसग्गुल्ला खाल्ल्यावर बोलण्याची गोड प्रेमाची भाषा म्हणजे बांग्ला. आपल्याकडे कोणाला "वाकडे" बोलायचे असेल तर ते मराठीतच चांगले येणार.
कदाचित म्हणूनच आपल्याकडे "चलता है" असे म्हटल्याने आपल्याला काही चांगले मिळत नाही तर अमेरिकनांना सगळे "बेस्ट" मिळते.
सहज म्हणून ह्या बाईंचे संकेतस्थळ पाहिले तर अजून एक गंमतशीर बाब पहायला मिळाली. त्यांनी डिपार्टमेंटची एक अॅंथेम केली आहे. हे गाणे म्हणते, "तुम्ही काहीही म्हणा मी त्याविरुद्ध आहे". विरोधाचे बाळकडू पाजणारी ही विदुषी एकदम मराठीच वाटते,इतके न पटण्याचे व मराठीचे सख्य आहे. हे पटवण्यासाठी चला ह्यांना विरोध करू. प्रसिद्ध भाषाविदुषी सुसन लॅंगर म्हणतात की विचार "चिन्हा"त असतात, भाषेत नसतात. समजा मराठी ही भाषा लैंगिक बोलण्याला असभ्य समजणारी आहे, म्हणून मला "लैंगिक" विचार येत नसतील तर आता अमेरिकेत चालते म्हणून इंग्रजीत बोललो तर मला "लैंगिक" विचार येतील हे कसे शक्य आहे? आजकाल प्रत्येकाला मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या भाषा सहजी येतात व प्रसंगापरत्वे, स्थळपरत्वे बोलाव्या लागतातही. तर मग माणसाचे विचार असे सारखे बदलते कसे होतील ? माझा मराठी बाणा आता कसा छान विरोधतो आहे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Arunodaya Zala--5
Lost in Translation
Strange things happen in America. The other day "Wall Street Journal" had an article on "effect of language on thoughts" by Ms.Lera Boroditsky who is heading cultural psychology department at Stanford University. She proposes that the way we think is affected by the language one speaks.Demonstrating the difference she cites examples of Spanish, in which they say "the vase broke itself" instead of "John broke the vase". Since the blame goes away in Spanish, Johns would love it, but the common man would not understand this linguistic gimmick.
P.L.Deshpande used to say that Urdu is such a grandiosque language that if ever a lion talks, it will be in Urdu. Bengalees speak so sweet that we feel the language of love has to be as sweet as Russagulla. If ever one has to speak insultingly, perhaps one would speak aptly in Marathi. Perhaps in all Indian languages we say "chaltaa hai " and that may be the reason we don't insist so much for what we want and Americans get all the best !
When one surfs the website of this professor, we find a funny "anthem" she has posted there. It goes " Whatever you say,I am agaist it". She seems to inculcate the Socrates' habit of going against the well trodden path for exploring new possibilities. Let us take her on the anthem and go against her proposition here. I remember the great linguist Ms.Susan Langer telling us that our "thoughts" do occur to us through "symbols" and we interpret or communicate by language. If that happens, when I am having a sexual urge , say, then it must be appearing in my mind in some "sexy symbols". Now if my mother tongue, say, Marathi, gives me inhibitions and taboo for such "thoughts" ( and at this age ) then my language must be supressing or prohibiting it and if I speak, say, English, it must encourage it. But I know from experience that no such phenomenon takes place,for any language I speak. And thoughts come and go irrespective of the language I speak. Especially in India, where everyone easily speaks at least three languages ( Marathi, English, Hindi ) , it would be a great confusion of changing "symbols" for three languages and may be we keep mum ! See, I am already influenced by the Lera's anthem and going against her !

Tuesday, July 20, 2010
अरुणोदय झाला-३
शब्द, भाषेचा "फंडा"
अमेरिकेत कशाचे ना कशाचे फॅड कायमच असते. सध्या इथे स्पॅनिश भाषा शिकायचे प्रस्थ दिसते आहे. कारण मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्मलेली माझी नात, जिला मराठी अजिबात येत नाही, सध्या माझ्याशी स्पॅनिश बोलते.
ही भाषाही मोठी अजब आहे. अमेरिकेतला जो कामकरी वर्ग आहे व जो बहुतांशी आडमार्गाने अमेरिकेत आला आहे, त्या वर्गाची हि बोली भाषा आहे.जगात सगळ्यात ज्यास्त लोक (१३० कोटी ) मंडारिन म्हणजे चिनी बोलतात व ती युनोची सहापैकी एक मान्य भाषा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्पॅनिश ( इस्पॅनिओल) भाषेचा जी बोलतात, ५० कोटी लोक, व तिसरा नंबर लागतो इंग्रजीचा ( ४९ कोटी). हिंदी व उर्दु एकत्र पकडले तर ( ६० कोटी) आपला नंबर तिसरा लागू शकतो पण सध्या तरी तो चौथा ठरतो.
तर आपल्या पुढे असलेली ही स्पॅनिश भाषा आहे तरी कशी ?
भाषेचा "फंडा" असलेले नुसते शब्द घेतले तर काय दिसते ? आपण मराठी, जे तू तू मै मै करण्यात वाकबगार असतो,त्यांचा "तू" स्पॅनिश मध्येही "तू" च आहे. आपला "सदरा" घालण्या अगोदर आपण बहुदा "खमीस" घालत असू . कारण स्पॅनिश मध्ये सदर्याला "खमीसा"च म्हणतात. पूर्वी आपण ज्या "मेज" वर बसत असू त्याच "मेजा" वर आजही स्पॅनिश लोक बसतात. आपल्याला व स्पॅनिश लोकांना सारखाच "पगार" मिळत असावा कारण दोन्हीकडे "पगार" म्हणजे पगारच आहे. स्पॅनिश लोकांच्या पायजम्याला नाडा नसावा कारण "नाडा" चा अर्थ "नाही" असा होतो. "अंक" म्हणजे जी मांडी होते ती स्पॅनिश लोकांना "बेडकाचे पाय" वाटते. जी गोष्ट आपल्याला "अप्रीय" वाटते ती स्पॅनिश लोकांना "अप्रीतो" वाटते. ज्या मराठी म्हातार्यांना "अस्मा" होतो त्यांना स्पॅनिश मध्येही "अस्मा" च होतो. जे मराठीत "बैलोबा" ठरतात त्यांना स्पॅनिश लोक "बुये" म्हणतात. कामशास्त्रात पलंगाचे महत्व स्पॅनिश लोकांना पटलेले असावे कारण ते पलंगालाच "काम" म्हणतात. दशमान पद्धतीतल्या "दश"ला ते लोक "देझ" म्हणतात, दोनला "दोस" म्हणतात.पूर्वी गॅबर्डीन नावाचे एक कापड मिळे त्याचा अर्थ ते रेनकोट असा करतात.जर्सी व मनीला हे त्यांचेच प्रकार असावेत कारण ते लोक त्याच नावाने ते ओळखतात. भांडणार्या माणसाला ते "लुचा" म्हणतात. धर्मशाळा, कार्यशाळा वगैरेतले "शाळा" म्हणजे स्पॅनिश लोकांची "खोली" ठरते.
आता कशी ही भाषा अगदी आपल्यातली वाटते की नाही ? अर्थात हे वाटायला अमेरिकेतले अगदी खुले राहणे आवश्यक आहे। कसे ? तर बघा आम्ही नातवंडांना रशियन मॅथ च्या क्लासला सोडून, चायनीज स्टोर मधून इंडियन ग्रोसरी घेऊन येतो व मग सांड्रा ही मेक्सिकन कामवाली आमच्या नातीशी स्पॅनिशचा सराव करते. सर्व भाषाशास्त्रज्ञांना अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.
अगदी आमच्या पुण्याच्या नाती आळंदीहून पुण्याला दिंडीतून चालत आल्या त्याच तोडीचे हे आहे !

Subscribe to:
Posts (Atom)