------------------------------
कोडगु भाषा
-------------------
कर्नाटकातल्या कूर्ग ह्या रम्य ठिकाणची भाषा म्हणतात की "कोडगु भाषा" म्हणून जाणल्या जाते. कशी आहे ही कोडगु भाषा ?
ह्या भाषेत तुम्ही म्हणू शकता की माझ्या जावयाने काही गोष्टी केल्या असतील तर मी कशाला बीसीसीआय चे अध्यक्षपद सोडू. तसेच तुम्ही स्त्री असाल तर म्हणू शकता की माझ्या वाढराने घेतली असेल थोडीशी जमीन तर त्यात काय एवढे ? असेच तुम्ही पाटबंधारे मंत्री असाल तर म्हणू शकता की धरणातच पाणी नाही तर मी काय मुतडू ( कोडगु भाषेत मुतू ) काय ? जर तुम्ही अन्नमंत्री/कृषीमंत्री असाल तर म्हणू शकता की लोक आताशा खूप खाऊ लागलेत म्हणून अन्नाचा तुडवडा पडतोय. तुम्ही प्लॅनिंग कमिशनचे मुख्य असाल तर म्हणू शकता की दिवसाला ज्यांचे उत्पन्न ३२ रुपये आहे ते काही गरीब नाहीत, त्याखालचे गरीब. तुम्ही पंतप्रधान असाल तर म्हणू शकता की मी कोडगु भाषेतही चुप बसू शकतो.
बोला की तुम्ही कोडगु भाषा, आपली राष्ट्रभाषा !
---------------------------------------------
पहा विश्वकोशात कोडगु भाषा : http://www.marathivishwakosh.in/index.php…