आवाज-अर्थ-शास्त्राची गल्ली
---------------------------
आवाज-अर्थ-शास्त्रात ( Phonosemantics ) एक समज असा आहे की ज्या शब्दाशेवटी आ असा उच्चार होतो त्या शब्दाचा आकार मोठा असतो व ज्या शब्दाशेवटी इ,ई असा उच्चार होतो त्याचा आकार लहान असतो. आ व इ/ई हे उच्चार करताना तोंडाचा जो मोठा व लहान ( अनुक्रमे ) आकार होतो त्यावरून आपण आकाराचे अनुमान काढीत असतो. जसे : रस्ता हा आकाराने मोठा ( ज्यास्त रुंदीचा, लांबीचा ) असतो तर गल्ली ही आकाराने लहान/छोटी असते. हमरस्ता ( हायवे/महामार्ग ) हा रस्त्यांच्या कुटुंबात मोठा माणूस असतो तर आळी/गल्ली ह्या लहान व्यक्ती असतात. खोली, ओसरी, पडवी, लहान असते तर दिवाणखाना मोठा असतो. गाथा मोठा ( जाडीने ) असतो तर पोथी, वही, लहान असते. बाबा मोठे असतात, तर आई/ममी लहान असते ( वयाने/आकाराने ).
समजा आपण रस्ता आणि गल्ली ह्यांच्यासाठी सध्या अस्तित्वात नसलेले शब्द केले आणि लोकांना विचारले की ह्याच्यातले तुम्हाला मोठे कोणते वाटते व लहान कोणते वाटते तर हा नियम सिद्ध होईल. जसे : बुबा व किकी.
सांगा बरे बुबा मोठा वाटतो का किकी ?
---------------------------------------------

No comments:
Post a Comment