एकटा –एक शब्द !
तंत्रशास्त्रात प्रत्येक अक्षराचे एक दैवत असते जो त्याचा वाच्यार्थ असतो. “ट” ह्या अक्षराचा वाच्यार्थ गुदद्वार असून कोणत्याही शब्दात “ट” आले की त्याला तीरस्करणीय अर्थ येतो. इतका हा भाव दाट की संस्कृतात “ट ” पासूनचे शब्दच नाहीत. मराठीत ट आल्याने तीरस्करणीय झालेले शब्द आहेत : बावळट ; येडपट ; वात्रट वगैरे ( ट पासूनच्या एकूण ५०५ शब्दांपैकी ३३५ म्हणजे ६६% शब्द नकारात्मक आहेत. ट चे हे कसब ठ, ड, ढ सुद्धा चालवतात . जसे मास्तरला मास्तरडा केले की ते तिरस्करणीय होते. ). हे केवळ मराठीतच नाही तर हिंदी व इंग्रजीतही घडते. जर घडीभर हे खरे धरले तर एकटेपणाच्या भावनेचा आपल्याला तिटकारा येतो, का एकटा ह्या शब्दात ट आल्याने आपल्याला तसे वाटते ?
स्टॅनफोर्ड विध्यापीठात एक बाई आहेत. त्यांचा एक शोधनिबंध असा आहे की आपण जशी भाषा वापरू तसे आपले विचार होतात. त्या म्हणतात की स्पॅनिष भाषेत “मी फुलदाणी फोडली ” असे म्हणताच येत नाही. ते केवळ “फुलदाणी फुटली ” एव्हढेच मोघम म्हणतात. म्हणजे स्पॅनिष लोकांना अपराधीपण येणेच नको ! तसेच समजा आपण एकटा ऐवजी इंग्रजीतले Alone वापरले तर ? हा शब्द म्हणे मिड-इंग्लिश मध्ये All + One असा होता. म्हणजे सगळे व त्यात मी एक . ह्यात नेमके वर्णन आहे की आजूबाजूला खूप लोक आहेत व त्यात मी एक आहे . आता इथे “एकटा” मधली नकाराची भावना येत नाही. खरे तर इंग्रज जास्त लोनली असतील पण त्यांना आपल्या इतके एकटेपण जाणवत नाही ते ह्या ट नसल्याने .
गुगल शब्दकोशात अशी एक सवलत आहे की इ.स.१८०० पासून आजतागायत एकूण शब्दांपैकी अमुक शब्द हा किती वेळा वापरला गेलाय त्याचा आलेख देतात . alone हा शब्द १८५० दरम्यान ०.०१९ % वापरला गेला होता व २००७ मध्ये तो ०.००१ % वापरल्या गेलाय. म्हणजे त्याचा वापर खूपच कमी झालाय. ( इंग्रजीत १० लाख शब्द आहेत असे धरले तर हा वापर १०० शब्दांचा किंवा १०० वेळा एवढाच होतो. ).
आता एकटा ह्या शब्दाला बदलून ( किंवा थोडे छळून) पाहू. ट बदलत त्या ऐवजी ओळीने दुसरे अक्षर ठेवले तर आपल्याला मिळतात : एकी ; एका ; एके ; एको ; एकम ; एकच ; एकता ; एकदा ; एकम ; एकर ; एकला ; एकवा ; एकद्न्य वगैरे जे इतके काही वाईट वाटवणारे नाहीत.
तर मतितार्थ काय तर एकटा/एकटी/ एकटे राहू नका. ह्या स्थितीला तुम्हीच व तेही Alone तोंड देऊ शकता !
------------------------------------------

No comments:
Post a Comment