Thursday, May 19, 2016

डाकिनी

---------------------------------------------------
डाकिनी....कशाचाही अर्थ निघतो...!
--------------------------------------
एखाद्या लहान मुलाने रेघोट्या ओढाव्यात व म्हणावे की हे पहा ब्रह्म ! आणि खरेच त्या ब्रह्माचा आपल्याला साक्षात्कार व्हावा, असाच आजकालचा काळ आला आहे. कशालाही अर्थ येऊ लागला आहे !
हेमंत राजोपाध्ये ह्यांच्या भिंतीवर त्यांनी विंदा करंदीकरांच्या कविता "डाकिनी पिशीमावशीच्या कविता" ह्यांचे संस्कृतमधले भाषांतर केले आहे. काय आहे हे डाकिनी प्रकरण ? कवितेत तर डाकीण, एक भूत अशाच प्रकारचा संदर्भ निघतो. पण सहज गंमत म्हणून गुगलच्या स्कॉलर ह्या साईटवर विचारले तर बौद्ध धर्मातल्या असंख्य पुस्तकांचे संदर्भ त्यांनी दिले, ज्यात वज्रायन संप्रदायातल्या एका स्त्री गुरूचे संदर्भ आले.
तर तुम्ही शोधायचाच अवकाश, की तुम्हाला कशाचाही अर्थ आजकाल असा लागतो. विंदा किंवा हेमंत राजोपाध्ये ह्यांच्या लेखी हे नसेलही, पण इतकी विद्वत्तापूर्ण अर्थांची ही सांखळी केवळ डाकीनी ह्या शब्दावरून लागावी ! कशालाही अर्थ असतो असेच म्हणावे लागेल.
लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Dakini
------------------------------------------------------

No comments:

Post a Comment