Thursday, December 23, 2010

अरुणोदय झाला----१४
काय आश्चर्य !
काही काही गोष्टी आपण धरून चालतो की आपल्याला त्या माहीत आहेत. असेच आश्चर्याचे आहे. तुम्हाला जर कोणी विचारले की आश्चर्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का ? तर हमखास छदमीपणे आपण हसून म्हणू "म्हणजे काय, माहीतय !" आणि जर विचारले की सांगा बरे सात आश्चर्ये कोणती आहेत ती ?
आता आली का पंचाईत ! अहो ताजमहाल हे आठवे आश्चर्य आहे हे तर पोटटया-सोटट्यांनाही माहीत आहे की ! अहो पण त्या अगोदरची सात आश्चर्ये कोणती ? आं कोणती बर ?
जर तुम्ही म्हणाल : गीझाचे पिरॅमिड, बॅबिलोनचे हॅंगिंग गार्डन, झीयसचा पुतळा ऑलिंपियाचा, एफेससचे आर्टेमिसचे देऊळ, हॅलिकार्नसेसचे म्युझियम, र्‍होडसचे कोलोसस, आणि अलेक्झांड्रियाचा दीपस्तंभ ----तर तुम्ही विकीपीडीयातून हे कॉपी केलेय हे नंतर सगळ्यांनाच कळेल. पण मराठी माणसासाठी सात आश्चर्ये कोणती ?
जाऊ द्या ! मीच सांगतो. ती आहेत अशी:
१) आकाशाला खांब नाही !
२) तळहाताला केस नाही !
३) समुद्राला झाकण नाही !
४) घोडयाला स्तन नाही !
५) देवाला आई-बाप नाहीत !
६) जीभेला हाड नाही !
७) केसाला रक्त नाही !
तुम्हाला वाटत असेल ही मी मनाने जुळविलेली आहेत तर ते तसे नसून ही सात आश्चर्ये आपल्या मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपटे यांचा शब्दरत्नाकर पृ.७५५ वर "सात आश्चर्ये" समोर) ती दिलेली आहेत.
आता पुढची सगळी आश्चर्ये आपल्याला माहीत आहेत, नक्की ना ?
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

The Bhalerao-----13
Seven Wonders of the World !
For some strange reason we feel sometimes confident that we know a certain answer. We think it is so easy that we know it already.
Here is a small demonstration. The question is : "WHAT ARE THE SEVEN WONDERS OF THE WORLD ?"
Oh ! Don't you know that our Taj Mahal is officially declared as the eighth wonder of the world. So we know it. Well then what are those seven wonders ? Well....I knew it , but somehow.....
If you said that these are :
* Great Pyramid of Giza
* Hanging Gardens of Babylon
* Statue of Zeus at Olympia
* Temple of Artemis at Ephesus
* Mausoleum of Maussollos at Halicarnassus
* Colossus of Rhodes
* Lighthouse of Alexandria...........................then obviously you got it from Wikipedia ?
But for a Marathi man , what are the seven wonders ?
Well , without much ado, I will tell you. These are :
1) There is no supporting column for the sky !
2) There are no hair on the palm !
3) There is no lid for the sea !
4) There is no breast for the horse !
5) God has no parents !
6) Tounge has no bone !
7) There is no blood in hair !
Don't think that I made up the above list of seven wonders myself ! No , it is given in our Marathi Dictionary ( W.G.Apte's ShabdaRatnakar page 755 against the word: saat aascharye ) .
Is'nt it a wonder that now, all further wonders we know ! What a wonder !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Saturday, December 11, 2010

अरुणोदय झाला----१२
तुटे वाद "संवाद", त्यासी म्हणावे !
सध्या भैरप्पांच्या कादंबर्‍यांविषयी वादंग उठले आहेत. कन्नडचेच एक मान्यवर साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती म्हणतात की भैरप्पा काही सर्जनशील कलाकार नाहीत, तर एक उत्तम वादपटू आहेत. वरवर पाहता ही शाबासकीच वाटते, पण त्याचा गर्भित अर्थ असा निघतो की एखादा जाहीरात लिहिणारा लेखक असतो, तसे तुम्ही निवडलेल्या विषयावर चांगला वाद मांडता . खपणार्‍या जाहीरातीसारखे ! पण ते काही साहित्य वा वाङमय नव्हे.
आता गंमत पहा हां. हा सुद्धा अनंतमूर्ती ह्यांचा एक वादच आहे. पण ह्यातली युगत अशी की कादंबरीतल्या मतांविरुद्ध टीका किंवा प्रत्युत्तर म्हणून दुसरी कादंबरी किंवा कविता किंवा निबंध असा प्रकार निवडण्या ऐवजी ते म्हणतात तुमची कादंबरी हे वाङमयच नव्हे, तो एक वादच आहे. हे म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट मध्ये आऊट झालेल्या मुलाने हा नो बॉलच होता असे म्हणण्यासारखे झाले. हा काही योग्य प्रतिवाद नाही.
कादंबरीत एखाद्या विषयावर जोरदार वाद करणे नसावे, असा काही कुठल्या साहित्यात नियम नाहीय. मुळात वाङमय प्रकारांना अशी बंधने नसतातच. प्रत्येक अविष्कारात, मग ती कविता असो, लघुकथा असो वा कादंबरी असो, काहीतरी ठामपणे सांगितलेले असते. ते तसे सांगिललेले नसेल तर उलट आपण म्हणतो की ह्यांना काय सांगायचेय ते समजत नाही किंवा नीट जमलेले नाही. म्हणूनच तर न कळणार्‍या कवितेला खूपजण दुर्बोध संबोधून कवीला दूषणे देतात किंवा आपापल्या परीने अर्थ लावतात. काही तरी प्रकर्षाने सांगणे हेच तर असते साहित्य. प्रतिभेला कुठल्याच विषयाचे वावडे नसावे . मग तो वाद करणे आहे म्हणून हिणकस कसे ? एखाद्या लेखकाचा उत्कर्ष होतोय की अपकर्ष हे कोण व कसे ठरवणार ?
इंग्रजीतल्या सध्या गाजत असलेल्या कादंबर्‍या पाहिल्या तर त्या त्या त्या विषयांवरचे अप्रतीमपणे पटवणारे वादच आहेत हे आपल्याला सहजी जाणवते. "दा व्हिन्सी कोड" मध्ये एका गुप्त ख्रिश्चन गटाच्या मतांबाबतचा वादच घातलेला आहे. मग त्याविरुद्ध मते असलेले लोक त्याविरुद्ध मतप्रदर्शन करतात. पूर्वी भारतात बौद्ध धर्माचा प्रचंड पगडा होता. पण त्यांनी वाद-विवाद हा मार्ग धर्मप्रचारात स्वीकारलेला होता व शंकराचार्यांनी त्यात त्यांना जिंकत परत हिंदूंना जरा अवकाश मिळवून दिला असे म्हणतात. वाद-विवाद हे नेहमीच अहिंसक मार्गात समर्थनीय असतात, विशेषत: लोकशाही राजवटीत. पण वादाला प्रतिवाद न करता तुमचा वाद हा वादच नव्हे व मीच जिंकलो असे वाद-विवाद-नियमांत बसणारे नाही. वाद बाद झाला की मग तो संपतो.
जे अनंतमूर्ती भैरप्पांना म्हणतात की तुम्ही राजकीय विचार पसरवताहेत तेच अनंतमूर्ती स्वत: लोकसभेची निवडणूक लढले होते व देवेगौडांनी भाजपशी संगनमत केले म्हणून रागावलेले होते. एकेकाळी कम्युनिस्ट सत्ता राजकीय प्रचार करणारी भरपूर पुस्तके काढीत असे. अजूनही लोकवाङमय गृह ह्याच विचारांची पुस्तके आवर्जून काढते आहे व त्यात काहीच गैर नाही. चांगले वाङमय असेल तर लोक वाचतीलच.
हेच तर समर्थांनी म्हटले आहे की "तुटे वाद संवाद, त्यासी म्हणावे !"
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunoday zala-----12
A good debate is good for us !
Currently there is some controversy going on, in the field of literature. Especially in Kannada novels, which are popular and written by Mr.S.L.Bhairappa. His most famous novel, this year, by name, Aavaran ( meaning environment ) . In this novel his heroine shows by detailed arguments in the novel, how the Moguls had invaded our culture and were not a just rulers. The novel also gives a detailed reference of some 54 scholarly treatises written by famous authors, in support of the heroine. The book is extremely popular and has already running into its 20 th print in just a year.
So, what is the controversy ? A renowned senior Kannad writer by the name of U.R.Ananthmoorthy says that Bhairappa is not a creative writer but he is a good debator, especially as his occupation is professor of philosophy. So, as per him, it is a right wing, Hindutwa propaganda and not a good literature. Mr.Ananthmoorthy himself had contested in LokSabha election and indulged in politics but did not like it when in the past his leader, Devegouda compromised with BJP. But he is also a renowned Kannada Literary bigewig and is on Sahitya Academy also.
It is baffeling as to why a good literature should not give out a strong opinion, be it social cause or a political cause ? If we see the current famous novels, we find that they put out very convincing stron opinions. For example take "Da Vinci Code" by Dan Brown. It tells us how a christian secret society operated for some cause and how it was fought against. Even when the whole world was crying shame on the global warming Michel Chrishton wrote his famous novel "State of Fear" against the environmentalists. Taking an opposite view, even against the popular thought, does not disqualify an argument or a good novel.
In fact the proponents of Democracy have famously applauded it by saying "eternal vigilance is the price of democracy !" . And if someone does not take an opposite view, how are we to keep a good vigil ?
They say that once Buddhism was very pervasive in ancient India and that is why lot of Buddhists monastries are everywhere in India. They had accepted debates as a good way of propagating their religion and it is claimed that through these well conducted debates Shankaracharya made up lot of lost ground for Hindus. Instead of making an equally strong convincing argument against Mr.Bhairappa, if Ananthamoorthy just dumps his novels as not creative enough, it is akin to a gully cricket where if a boy is clean bowled he claims that it was a No-ball ! In good old times the communist regime had tried to influence the public by printing huge propaganda books. But ultimately people realise, what is a good novel and which are not !
Perhaps keeping this in mind our learned saint Ramadas had said "that is best communication which ends a good debate !" So, a good debate should be good for us !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Sunday, December 5, 2010

अरुणोदय झाला---११
"भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी"
मानवी व्यवहारात सत्य शोधण्याचे फार अप्रूप आहे. चांगली बुद्धिमत्ता असलेले लोक शास्त्रज्ञ होतात व ह्या विश्वातील सत्यतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यालाच आपण वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणू शकतो. त्यात असते कसोटी घेणे व त्याला खरे उतरणे. आणि इतर लोक हे प्रत्यही करीत असतात व म्हणूनच शास्त्रकाटयाची कसोटी ही त्या सत्य-शोधण्याची एक मूलभूत प्रक्रिया राहते.
साहित्यात असे मात्र होत नाही. कला व विज्ञान ह्या दोहोंचा सत्य शोधण्याचाच हेतु असतो पण कला आधीच ठरवते की तिच्या दृष्टीने सत्य काय आहे व मग ते इतरांनी पटले तर पत्करावे. विज्ञानातही गृहितके मानण्याची परंपरा आहे. पण विज्ञान कसोटीला सामोरे जाते तसे कला किंवा कलाकृती सत्याला सामोरे जात नाहीत.
आता भालचंद्र नेमाडे इतिहासातून "हिंदू" कादंबरी द्वारे सत्य त्यांना काय सापडले ते सांगतात. ते म्हणतात त्याप्रमाणे "ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला" व "हिंदू धर्माने जिंकलेल्या लोकांची संस्कृती स्वीकारत एक समृद्ध अडगळ आपल्या जीवनात निर्माण केली". आता त्यांचे हे म्हणणे खरे किती हे तपासायचे कोणी प्रयत्न करीत नाही. दरम्यान ५०० रुपयांच्या १५ हजार प्रती खपतात.
(म्हणजे गेला बाजार ७५ लाखांचा गल्ला जमतो ). म्हणजे कमीत कमी २५/३० हजार लोक ते म्हणणे ऐकून घेतात. आता हेच त्यांनी एखाद्या संशोधनार्थ प्रबंध लिहिला असता ( कोणी सांगावे लिहिला असेलही ! ) तर त्यावर किंवा त्याविरुद्ध कोणाला हे म्हणणे पडताळता तरी आले असते. पण कादंबरीत हे मांडलेले असल्याने तशी काही सोय नसते. वाटले तर वाचा, नाही तर वाचालच !
ज्यास्त प्रती खपल्या म्हणजे जे सांगितले आहे ते खरेच आहे असे होत नाही. कारण प्रती आधी खपतात व मग त्या लोक वाचतात ( किंवा बहुदा तशाच न वाचता ठेवून देतात ! ). तसेच उद्या ह्या कादंबरीला मोठमोठे पुरस्कार मिळाले तरी त्यावरून त्यातले प्रतिपादन सिद्ध झाले असे होत नाही. पटणे व खरे निघणे तर फारच दूर.
ह्याच अडचणी पायी तर बा.सी.मर्ढेकर म्हणाले नसतील ना की "भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी " ?

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Saturday, December 4, 2010

अरुणोदय झाला---११
"भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी"
मानवी व्यवहारात सत्य शोधण्याचे फार अप्रूप आहे. चांगली बुद्धिमत्ता असलेले लोक शास्त्रज्ञ होतात व ह्या विश्वातील सत्यतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यालाच आपण वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणू शकतो. त्यात असते कसोटी घेणे व त्याला खरे उतरणे. आणि इतर लोक हे प्रत्यही करीत असतात व म्हणूनच शास्त्रकाटयाची कसोटी ही त्या सत्य-शोधण्याची एक मूलभूत प्रक्रिया राहते.
साहित्यात असे मात्र होत नाही. कला व विज्ञान ह्या दोहोंचा सत्य शोधण्याचाच हेतु असतो पण कला आधीच ठरवते की तिच्या दृष्टीने सत्य काय आहे व मग ते इतरांनी पटले तर पत्करावे. विज्ञानातही गृहितके मानण्याची परंपरा आहे. पण विज्ञान कसोटीला सामोरे जाते तसे कला किंवा कलाकृती सत्याला सामोरे जात नाहीत.
आता भालचंद्र नेमाडे इतिहासातून "हिंदू" कादंबरी द्वारे सत्य त्यांना काय सापडले ते सांगतात. ते म्हणतात त्याप्रमाणे "ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला" व "हिंदू धर्माने जिंकलेल्या लोकांची संस्कृती स्वीकारत एक समृद्ध अडगळ आपल्या जीवनात निर्माण केली". आता त्यांचे हे म्हणणे खरे किती हे तपासायचे कोणी प्रयत्न करीत नाही. दरम्यान ५०० रुपयांच्या १५ हजार प्रती खपतात.
(म्हणजे गेला बाजार ७५ लाखांचा गल्ला जमतो ). म्हणजे कमीत कमी २५/३० हजार लोक ते म्हणणे ऐकून घेतात. आता हेच त्यांनी एखाद्या संशोधनार्थ प्रबंध लिहिला असता ( कोणी सांगावे लिहिला असेलही ! ) तर त्यावर किंवा त्याविरुद्ध कोणाला हे म्हणणे पडताळता तरी आले असते. पण कादंबरीत हे मांडलेले असल्याने तशी काही सोय नसते. वाटले तर वाचा, नाही तर वाचालच !
ज्यास्त प्रती खपल्या म्हणजे जे सांगितले आहे ते खरेच आहे असे होत नाही. कारण प्रती आधी खपतात व मग त्या लोक वाचतात ( किंवा बहुदा तशाच न वाचता ठेवून देतात ! ). तसेच उद्या ह्या कादंबरीला मोठमोठे पुरस्कार मिळाले तरी त्यावरून त्यातले प्रतिपादन सिद्ध झाले असे होत नाही. पटणे व खरे निघणे तर फारच दूर.
ह्याच अडचणी पायी तर बा.सी.मर्ढेकर म्हणाले नसतील ना की "भावनेला येऊ दे गा शास्त्रकाटयाची कसोटी " ?

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, November 16, 2010

अरुणोदय झाला--१०

भाज्या विरुद्ध बोकड
काल वळणावर दोन तीन रिक्षात पकडून नेत असलेले बोकड दिसले तेव्हाच ध्यानात आले की ईद जवळ आलेली दिसते. आणि आज पाहतो ते बॅंका बंद, ईद निमित्त ! ईद साठी की मोठया एकादशी साठी ?
हिंदू मुसलमानांचे कॅलेंडर कर्ते मोठे बेरके असावेत. नेमके एकादशीच्या दिवशीच ईद कशी आणतात ? आता ईद म्हटली की त्यांच्या रीतीप्रमाणे हे बोकड कापणारच. ज्यांना बोकड कापणे महागाचे वाटते त्यांच्यासाठी म्हणे अशी एक सोय आहे की सहा कुटुंबात मिळुन एक गाय किंवा म्हैस कापली तरी सहाही जणांना पुण्य मिळते. नेमके त्याच दिवशी एकादशी वाल्यांना मात्र उपासाचेच खावे लागणार, भाजीपाला !
धर्मांचे वादविवाद तर चालतच राहणार. पण काळ बदलतो आहे, हे आपल्याला कळते तसे त्यांनाही कळतच असणार. आता अमेरिकेतच पहा ना ! लोक आपण होऊन मांसाहार सोडून देत आहेत व खाताहेत नुसते भाजीपाला किंवा आपल्या खास शब्दात "घासपूस". हे कोणत्या धर्मामुळे नाही तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा टाळण्यासाठी होते आहे. म्हणजे त्यामागे वैज्ञानिक निकड आहे. तसेच काही लोक तर त्याही पुढे जाऊन व्हेगन होत आहेत. म्हणजे दुधाचे पदार्थही खायचे टाळायचे. त्याऐवजी आजकाल लोक पसंत करीत आहेत गोट-चीज, किंवा बकरीचे चीज. हे लागतेही छान ! हे खाल्ल्यावर महात्मा गांधी का बकरीच्या दुधासाठी एवढा आटापीटा करीत ते ध्यानात येते.
मग जागतिक कल जर भाजीपाला खाण्याकडे आहे तर हे बोकड, गाय, बैल, म्हैस, कोंबडी, वगैरे खाणे आपसुकच कमी व्हायला पाहिजे. किती दिवस हे धर्माच्या अभिनिवेशा खातर मासाहार करीत राहणार. हिंसेचे असेच होते आहे. आजकाल जागतिक क्षेत्रात हिंसेला अजिबात चांगले दिवस नाहीत. त्यामुळे सगळीकडेच हिंसेचा निषेध होत आहे. इतका की आता इस्लाम म्हणजे शांती व आम्ही जीहाद पसंत करीत नाही असे मुसलमानही म्हणायला लागलेत. बाकी आपण सगळे ह्याच कारणासाठी नक्षलवाद वगैरे हिंसक आंदोलनांची निर्भत्सना करतो आहोत.
हा जर जागतिक कल मानला तर बोकड कापण्याची हिंसा एक ना एक दिवस तरी बंद होईल हे अगदी स्वच्छ आहे, धर्म कोणताही असला तरी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

The Goat Vs Vegetables
Yesterday, while returning home, I saw some two three autorikshas carrying the tied up goats. And it struck me that Id ( the Muslim's festival on which they sacrifice a goat or an animal ) must be around the corner. And around it was, as today I noticed that Banks are closed due to Id. Or is it for the Big Ekaadashi ( fasting day of Hindus) ?
The calender makers of Hindus and Muslims must be very clever persons. How could they summon an Id on an Ekadaashi day ? Hindus who normally devour vegetables would be eating the fasting stuff on this day and Muslims would be getting ready to feast on the sacrificed goat , or a cow or a bull or a buffalo or a hen. If these two religions force such a diverse practice on their respective people, how can India have one common practice or a culture ? Remember the German chancellor recently lamenting that despite all efforts the multiculturism has failed in Germany?
Religions would keep on harping their principles to their respective captive audiences. But the world trends keep moving in entirely different directions. For example, the world is mostly abondoning meat eating for health reasons as it helps in reducing obesity and the consequent health hazards. In America people are going further than vegeterianism by becoming vegans, i.e, not eating the milk products. They change for goat cheese, which is very tasty, instead of normal cow-cheese. We marvel here why Mahatma Gandhi was so insisting for the goat's milk and other products.
We see that world trends don't abide by any philosophy, dogmas or by religions. It is evident from the world wide denouncement of violence we see all over. Any resistance movement which takes help of violence is instantly condemned by one and all. That is why, the Naxalite's movement is condemned by all right thinking people. In fact this trend is so obvious that even Muslims have started blaming Jihaadists for bringing Islam in disrepute. The compulsion for denouncing is so great that we can safely pronounce it as the established world trend. So is the case with vegeterianism. For obvious health reasons everybody would have to learn to eat vegetables, sooner than later !
If this world trend is convincing then the Muslims would have to learn to skip killing the goat and skip eating it too !
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com
अरुणोदय झाला--१०

भाज्या विरुद्ध बोकड
काल वळणावर दोन तीन रिक्षात पकडून नेत असलेले बोकड दिसले तेव्हाच ध्यानात आले की ईद जवळ आलेली दिसते. आणि आज पाहतो ते बॅंका बंद, ईद निमित्त ! ईद साठी की मोठया एकादशी साठी ?
हिंदू मुसलमानांचे कॅलेंडर कर्ते मोठे बेरके असावेत. नेमके एकादशीच्या दिवशीच ईद कशी आणतात ? आता ईद म्हटली की त्यांच्या रीतीप्रमाणे हे बोकड कापणारच. ज्यांना बोकड कापणे महागाचे वाटते त्यांच्यासाठी म्हणे अशी एक सोय आहे की सहा कुटुंबात मिळुन एक गाय किंवा म्हैस कापली तरी सहाही जणांना पुण्य मिळते. नेमके त्याच दिवशी एकादशी वाल्यांना मात्र उपासाचेच खावे लागणार, भाजीपाला !
धर्मांचे वादविवाद तर चालतच राहणार. पण काळ बदलतो आहे, हे आपल्याला कळते तसे त्यांनाही कळतच असणार. आता अमेरिकेतच पहा ना ! लोक आपण होऊन मांसाहार सोडून देत आहेत व खाताहेत नुसते भाजीपाला किंवा आपल्या खास शब्दात "घासपूस". हे कोणत्या धर्मामुळे नाही तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा टाळण्यासाठी होते आहे. म्हणजे त्यामागे वैज्ञानिक निकड आहे. तसेच काही लोक तर त्याही पुढे जाऊन व्हेगन होत आहेत. म्हणजे दुधाचे पदार्थही खायचे टाळायचे. त्याऐवजी आजकाल लोक पसंत करीत आहेत गोट-चीज, किंवा बकरीचे चीज. हे लागतेही छान ! हे खाल्ल्यावर महात्मा गांधी का बकरीच्या दुधासाठी एवढा आटापीटा करीत ते ध्यानात येते.
मग जागतिक कल जर भाजीपाला खाण्याकडे आहे तर हे बोकड, गाय, बैल, म्हैस, कोंबडी, वगैरे खाणे आपसुकच कमी व्हायला पाहिजे. किती दिवस हे धर्माच्या अभिनिवेशा खातर मासाहार करीत राहणार. हिंसेचे असेच होते आहे. आजकाल जागतिक क्षेत्रात हिंसेला अजिबात चांगले दिवस नाहीत. त्यामुळे सगळीकडेच हिंसेचा निषेध होत आहे. इतका की आता इस्लाम म्हणजे शांती व आम्ही जीहाद पसंत करीत नाही असे मुसलमानही म्हणायला लागलेत. बाकी आपण सगळे ह्याच कारणासाठी नक्षलवाद वगैरे हिंसक आंदोलनांची निर्भत्सना करतो आहोत.
हा जर जागतिक कल मानला तर बोकड कापण्याची हिंसा एक ना एक दिवस तरी बंद होईल हे अगदी स्वच्छ आहे, धर्म कोणताही असला तरी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Sunday, October 24, 2010

संस्कृतीची ऐशी तैशी !
जर्मनी हा एकमेव असा देश आहे की ज्याने पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी दरम्यानची भिंत संगनमताने तोडून जगाला साहचर्याचा एक आदर्श घालून दिला. आता त्याच जर्मनीच्या चॅंन्सेलर बाई, एंजेला मर्केल, म्हणताहेत की आम्ही बहुविध संस्कृती जोपासण्यात अपयशी ठरलो आहोत. बाई हे खास करून टर्किश स्थलांतरित लोकांबद्दल( हे अवघे ४ टक्के) म्हणताहेत. त्यांचा रोख आहे की बाहेरून आलेले लोक एका संस्कृतीत मिसळत नाहीत, देशाची एकजीव अशी संस्कृती बनतच नाहीय. आणि हे आमचे अपयश आहे.
ऐकायला धक्कादायक असले तरी हे हरघडी व हरठिकाणी दिसणारे वास्तव आहे. आता हेच पहा मराठी लोकांचे पदार्थ खायचे असतील किंवा मराठी पद्धतीचे आकाशदिवे घ्यायचे असले तर आपण घाटकोपरहून दादरलाच जातो. कारण अजून तिथेच हे थोडेफार टिकून आहे. मुसलमान तसे लोकसंख्येने म्हणतात १५ टक्के आहेत पण सकाळी कुठेही बागेत जे लोक मॉर्निंग वाक घेताना दिसतात त्यात हे अजिबात कुठेच दिसत का नाहीत ? मॉर्निंग वॉक घेऊ नये, असे तर काही इस्लाम सांगत नसावा. तसेच तुम्हाला समजा बुरखा विकत घ्यायचाय तर मोहमद अली रोडवरच जायला हवे. घाटकोपरला आताशा सगळीकडे ९० टक्के गुजराथी लोकच आहेत. गरबा दांडीयात इथे जे मराठी लोक राहतात ते का सामील होत नाहीत ? उलट ते दादरला जाऊन मराठी दांडीया खेळतात. दिवाळीला कोणी मुसलमान शेजार्‍याने कोणा हिंदूला मिठाईचा बॉक्स दिलाय असे का होत नाही. उलट एकेकाळी आम्ही तुमच्याबरोबर राहूच शकत नाही ह्या धार्मिक निकषावरच तर आपल्याला वेगळा पाकीस्तान करून द्यावा लागला. म्हणजे एक सामायिक, निदान रोजच्या व्यवहाराची, अगदी जुजबी का होईना, अशी समान संस्कृती का तयार होत नाही ? जर्मन बाई म्हणतात तसे हे आपल्या सगळ्यांचेच अपयश म्हणायचे !
बरे आपण समजा एकवेळ मागासलेले, म्हणून हे आपल्याला जमत नसावे, असे म्हटले तर अमेरिकेतही काही वेगळी परिस्थिती नाहीय. माझी मुलगी तिथली नागरिक होऊन आता २० वर्षे झालीत. पण अजूनही तिथले आजूबाजूचे लोक त्यांना "इंडियन" म्हणूनच ओळखतात. त्यांची मुलेही "इंडियन" ! त्यांना एक धड इंडियन भाषा येत नाही, इंडियन संस्कृती कशाशी खातात हे त्यांना माहीत नाही, तरी ते इंडियनच ! कसले आलेय संस्कृतीचे मिसळणे !
अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Monday, August 30, 2010

अरुणोदय झाला---१९

पाण्यावरच्या रेघा

कोणते तंत्रज्ञान किती व केव्हा प्रगती करेल ह्याचा अंदाज लागणे महा कठीण. सार्वत्रिक सामान्यज्ञानाने जावे तर केव्हा दगाफटका होईल त्याचा नेम नाही. पुस्तक व प्रकाशन क्षेत्रात सारखे घडत असते.

इथली एक प्रसिद्ध पुस्तक विक्रेती कंपनी बार्नेस अ‍ॅंड नोबल इतकी मोठी व ती म्हणे आता विकायला काढली आहे. कारण काय तर लोकांची पुस्तके वाचण्याची सवय बदलली आहे. आता लोक खरोखरची (साक्षात )पुस्तके वाचण्या पेक्षा ई-पुस्तके ज्यास्त वाचताहेत व त्यामुळे नेहमीच्या कागदी पुस्तकांचा खप कमी झालाय, ई-पुस्तकांचा खप वाढलाय. आणि हा सगळ्याच पारंपारिक प्रकाशकांना येणारा अनुभव आहे म्हणतात.

ह्यामुळे की काय अमेरिकेत सध्या ई-रीडर्सची चलती आहे. अमेझॉन कंपनीचे किंडल, सोनी कंपनीचे रीडर, नूक , व आता ह्या सगळ्यांवर बाजी मारणारे आय-पॅड. ह्या रीडर्स वर ई-बुक्स संगणकाद्वारे लादावी लागतात व मग ती आपण कुठेही, वाचू शकतो. नेहमीचे पुस्तक समजा २० डॉलरला असेल तर ई-बुक अदमासे ५/६ डॉलरला पडते. शिवाय आयपॅडवर तर टेक्स्ट बुके प्रकरणाने सुद्धा कमी भावात उतरवू शकतात. कित्येक ई-पुस्तके इंटरनेटवर मोफतही उपलब्ध आहेत. ही संगणकावरही उतरवून वाचता येतात. जसे गुटेनबर्ग ह्या संकेतस्थळावर खूप जुनी जुनी पुस्तके मोफत ठेवलेली आहेत.

जगात पुस्तकांची घोडदौड ह्या ई-पुस्तकांच्या दिशेने चालली असताना, झेरॉक्स कंपनीने असे एक मशीन विकसित केले आहे की ज्याचा छापायचा वेग, ताशी शंभर पाने आहे. व हे मशीन पाने जोडून पुस्तकाची बांधणीही करते. अशी ४/५ हजार मशीने विकण्यात आली असून एका पुस्तक विक्रेत्याकडे लोक रांगा लावून आपले पुस्तक प्रत्यक्ष छापताना बघतात व दोन तीन मिनिटात पुस्तक छापून हातात तयार मिळतेही. आता हे डिजिटल प्रिंटिंगचे पुस्तक छापणे यश मिळवील की ई-पुस्तक हा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे. खुद्द गुगल कंपनी अशी डिजिटल पुस्तके ७/८ डॉलरमध्ये छापून देते. शिवाय तुम्ही अगदी कमीत कमी प्रती ( अगदी एक सुद्धा ) छापू शकता.

ह्या संभ्रमात नक्की भरवसा फक्त संत वांङमयात मिळतो. ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात एके ठिकाणी म्हटले आहे की हे पाण्यावर रेघा काढून माशाचे चित्र काढल्यासारखे आहे. आपण म्हणतो वांङमयाला अक्षर-वांङमय पण ते टिकते किती हे आपण ५० वर्षात विस्मरणात गेलेल्या लेखकांवरून पाहतोच. ( कदाचित म्हणूनच कायद्याने ६० वर्षांनंतर कोणीही कोणाचे पुस्तक विना परवाना छापू शकतो, कॉपीराइट फक्त ६० वर्षांसाठी ). असे असताना ई-पुस्तके काय किंवा कागदावरची पुस्तके काय, सर्व पाण्यावरच्या रेघाच !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunodaya Zala---19

Lines on Water

Nowadays it is difficult to imagine which technology will outdo which . If we go by the common peoples' trends , we do not which one will change when and how soon. In the business of Books printing and publishing, this is typically so.

E-books and E-readers are a craze in America, these days. It has already upset the conventional book publishers like Barnes & Nobel and they are said to be on the death row. They say that more people are reading e-books than the conventional hard copy books. And they say, e-books are cheaper ( costing on average 5/6 $ a book ) compared with $20 for the conventional ones. After Amezon's kindle, sony's e-reader, nook, etc now Apple has come out with the winner i-pad which is so sophisticated that it is bound to be a best seller. In addition there are many a websites which give e-books free of charge. The Gutenberg site has lot of old authors' e-books which can be downloaded free. The downloaded e-books on the e-readers can be read more conveniently anywhere at our leisure.

When the trend and business is thus going towards e-books and e-readers there is one company Xerox , which has developed a digital printing machine which may reverse the trend. This machine is capable of printing 100 pages in a minute and the cost of printing is hardly 1 penny a page. Morevoer the machine also does book-binding and colour cover page. The company has already sold 4/5000 machines and at one book sellers' shop people waite in line to see their book getting printed in minutes. Even a company like google has partnered with this company and can give a hard book copy at 7/8 $ a book from a digital copy.

In such a contrasting scenario, we do not know if e-books will outlive the hard copy books or otherwise.
The copy-right law keeps the rights for 60 yrs, perhaps becuse anyway people put all literature in the abyss of forgetfullness in 50/60 yrs. All our literature as the saints say are the lines on water and may not last long enough, either in hard copy or in e-book shape !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Wednesday, August 25, 2010

अरुणोदय झाला---११

चित्रांतली नग्नता

कौंटी म्युझियम ऑफ आर्ट्स, लॉस एंजेल्स, मध्ये थॉमस ईकीन्स ( १८४४-१९१६) ह्या प्रसिद्ध जुन्या चित्रकाराचे प्रदर्शन लागलेले आहे. ह्या चित्रकाराच्या पेंटिग्जमध्ये प्रामुख्याने नग्न पुरुषाच्या आकृतींचे वैभव चितारलेले आहे. (वर ह्यांचे "स्विमिंग" नावाचे चित्र नमून्यादाखल दिले आहे). चित्रकलेमध्ये परंपरेने नग्नता का दाखवतात हे न सुटणारे कोडे आहे. आपण नग्नतेबद्दल विचार करतो न करतो तोच न्यू यॉर्क मध्ये एक विचित्र प्रदर्शन भरले आहे. ह्यात खरोखरची जिवंत माणसे, नग्न ठेवली आहेत व विचारले आहे की, चित्रकलेत नग्नता असते तर मग ही नग्न माणसे म्हणजे "आर्ट" ( कला ) समजावे का ?

बरे, ही काही फॅशनप्रमाणे हलकी फुलकी बाब नसते. आता ह्याच ईकीन्सला अश्लीलतेखाली दहा वर्षे बिनकामाची घालवावी लागली. कारण तो चित्रकलेचा प्रोफेसर असताना, व वर्गात मुली असताना त्याने एक नग्न पुरुष मॉडेल म्हणून आणला होता, जे त्याकाळी न पटणारे होते. आपल्या हुसेनना नाही का केवळ सरस्वतीचे व भारतमातेचे नग्न चित्र काढल्याबद्दल परदेशी दारोदार भटकावे लागते आहे व ते ही वयाच्या ९४ व्या वर्षी ! तर चित्रकार हे काही गंमत म्हणून नग्नता चितारीत नाहीत.

नग्न आकृती, व्यवहारात, एरव्ही कपड्यांनी झाकलेल्या असतात, व नाही म्हटले तरी कामुक भावना उद्दीपित करणार्‍या असतात. त्यामुळे पटकन चित्त आकर्षून घेतात. इथेच चित्रकाराची अर्धी बाजी जिंकल्या जाते. गंमत बघा, नग्न पेंटिंग्ज म्युझियम मध्ये दाखविल्या जातात खरी ,पण पाहणार्‍याने कपडे घालूनच ती पहावी लागतात. काही चित्रकारांच्या मते नग्न आकारात एक नैसर्गिक देखणेपण असते व तेच सौंदर्य त्यांना चित्रातून दाखवायचे असते.

व्यवहारात काही काही गोष्टी खूफ सांगून जातात. अमेरिकेत वाट्टेल तसे कपडे घालणारी मुले, भारतीय आजीला मात्र म्हणतात, की आजी साडी घालू नको, उघडे पोट विचित्र दिसते. कदाचित नग्नतेकडे पाहण्याची आपली मानसिकताच ह्यातून दिसत असावी !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Arunodaya Zala---11

Nudity in Art

One of the famous yesteryear's artists, Thomas Eakins ( 1844-1916) is holding an exhibition of his paintings at Los Angels County Museum of Art. ( One painting of his by name "Swimming" is givne above as an example ). This artist celebrates the nudity of the man and paints mostly men as athletes in various postures. While we wonder the propriety of his selecting "nudity" as his subject we come to know that presently there is an exhibition at New York where live nude men & women are kept as "art".
That exhibition asks us that if there is nudity in art, can we say nude themselves are "art" ?

This tendency of depicting nudity in paintings is not something which our artists take as lightly as a fashion. They are quite serious about the effort and stake their entir careers for the cause. We are told that this Thomas Eakins had to forego his paintings work for ten years when he was a professor of fine arts and had brought a nude male model in the class. And he had women students present there. Even the famous Indian artist Husein has to suffer a lot by being exile from country to country because he painted Hindu Godess Saraswati in the nude. So, artist take nudity very seriously, after all , even at the ripe age of 94 !

We will have to concede that ( since normally we are sufficiently clad in clothes ) the nude figures do raise our emotions and catch the eye easily. For an artist, perhaps half the battle is won here. It is so ironical that though we condone nudity in the paintings at exhibitions, we have to see them while we are properly dressed ! Some artist do believe that there is an innate beauty in the nude natural form of men and women and they want to draw the same for us !

We always want something different and not everyday stuff. Perhaps this tendency in looking at things is exhibited by our grandchildren, when they say to their sari-clad grandmother that she should shun sari as it shows off part of the stomach. To them, it is unusual and so not ordinary . This must be the same view we must be taking when we look at nudity in paintings !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, August 17, 2010

अरुणोदय झाला--१०

जाळून टाका !

फाईन आर्ट्सचे एक प्राध्यापक व इथले एक नावाजलेले चित्रकार श्री.जॉन बाल्डेसरी ह्यांच्या "प्युअर ब्यूटी" नावाच्या चित्रप्रदर्शनावरून एक जुनी आठवण आली. चंद्रकांत पाटील, त्यावेळी वहिदा रेहमान ह्या नटीवर फिदा असत. त्यांनी एका असीम प्रेमक्षणी त्यावेळेसच्या त्यांच्या कविता, वहिदाला अर्पण म्हणून, जाळून टाकल्या होत्या ! तसेच ह्या जॉन ( वय वर्षे ८० ) महाशयांनी त्यांची ६०-७० दशकातली चित्रे जाळून त्यांची राख एका कलशात ठेवून त्याची चित्रे काढलीत व प्रदर्शनाचे नाव ठेवलेय "प्युअर ब्यूटी" किंवा "शुद्ध सौंदर्य" !

कदाचित असला वेडेपणा नाही दाखवला तर कलावंताला कोणी थोर म्हणत नसावेत. हुसेन ह्यांनी मागे असेच जहांगीर आर्ट गॅलरीत फक्त अस्ताव्यस्त पेपरांचा ढिगारा घातला होता, व हेच माझे प्रदर्शन म्हणाले. असेच हे चित्रकार एका फलकाचे प्रदर्शन करतात. फलक असा : ज्या पेंटिंग्ज मध्ये सौम्य रंग असतील तेच भडक रंगांपेक्षा ज्यास्त विकल्या जातील. ज्या पेंटिंग्जमध्ये गाई, कोंबड्या असतील ती ज्यास्त धूळ खातील, बैल व कोंबडे असलेल्या पेंटिंग्ज पेक्षा !

एका प्रसिद्ध चित्रकाराने आपल्याच चित्रांची अशी खिल्ली उडवावी व काय खरे सौंदर्य असा चकित करणारा प्रश्न टाकावा हे स्तंभित करणारे आहे.

जीवन ही एका मूर्खाने सांगितलेली कहाणी आहे, जिचा काही अर्थ नाही, असे जे म्हणतात तेच शेवटी खरे ठरत असावे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunodaya Zalaa---10

Burn it !

The exhibition titled "Pure Beauty" by a famous Fine Arts Professor and Painter, Mr. John Baldessari, reminded me of Chandrakant Patil. Chandrakant Patil, was in love with the famous actress, Vaheeda Rehman and in one fit of madness had burnt all his poems as an offering to the deity ! Similarly this painter here has not only burnt his onetime famous paintings but put the ash of such burnt paintings in an urn and is exhibiting the painting of that urn as "Pure Beauty" !

Perhaps by convention the artist must not be gettting due recognition unless he exhibits any such madness. Mr. Husain at one time had similarly exhibited a mess of scattered newspapers at Jehangir Art Gallery and had called it an exhibition. In the vein of same madness, this Baldessari painter, has painted one painting, which is just a written board, giving tips to the artists. The Board reads as : Generally speaking paintings with light colours sell more quickly than paintings with dark colours. Subject matter is important, it has beeb said that paintings with cows and hens in them collect dust while with bulls and roosters sell...

It is funny that a famous painter should take such a light view of Art and it stunns one who are already confused to know what is art .

Perhaps it must be true that life is a tale told by an idiot signifying nothing !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, August 10, 2010

अरुणोदय झाला-----९

पुस्तके आणि किंमती

जी पुस्तके अगदी हवी असतात त्यांना किंमत मोजताना काही वाटत नाही. पण आता काही एखाद्या परिक्षेसाठी वाचायचे नसते, त्यामुळे कोणत्याही पुस्तकाला कमीत कमी पैसे पडले तर बरे, असे हमखास वाटते. त्यामुळे मी बेस्ट सेलर्स "पायरेटेड एडिशन" मधली वाचतो. ह्यात छपाईची शाई कधी कधी पुसट दिसते तर कधी पाने मागे पुढे लागलेली असतात. पण शब्द अन शब्द तोच, लेखकाचाच असतो. शिवाय "पायरेटेड" पुस्तके छापणारे स्वत: खूप धोरणी असतात, जी पुस्तके प्रसिद्ध होऊ शकणारी असतात तीच पायरेट करतात.( मराठीत पायरेटेड झालेले मी पाहिलेले पहिले पुस्तक: आम्ही अन आमचा बाप-ले-नरेंद्र जाधव ). त्यामुळे हमखास चांगलीच निघतात.

हर्बर्ट रीड ह्यांचे "मीनींग ऑफ आर्ट" हे पुस्तक मी किती तरी वर्षे शोधत होतो. कुठेच मिळाले नाही. त्यामुळे इथे आल्या आल्या इथल्या लायब्ररीत तेच हुडकले आणि ते सापडलेही. आता नेहमीच्या प्रथेने विचार करीत होतो की आता हे झेरॉक्स करून घ्यावे. नातवाला हाताशी धरून घरच्या झेरॉक्स मशीनशी झटापट सुरू करणार तोच नातवाने आजोबांना सल्ला दिला की कशाला झंझट करता, अमेझॉन वर विकतच घ्या, स्वस्त पडेल. आता मला माझ्या नातवाला दाखवायचेच होते की भारतीय कंजूशीने झेरॉक्सच कसे स्वस्त पडते. पण काय आश्चर्य, अमेझॉन वर वापरलेले पुस्तक अवघे एका डॉलरला मिळाले. तिसर्‍या दिवशी पुस्तक ( नवे कोरेच म्हणाना असे ) हातात, शिवाय पाठणावळ माफ होती. मग ह्याच लेखकाची इतर दोन तीन पुस्तकेही अशीच दोन दोन डॉलरला मिळाली. दुर्मिळ पुस्तके व तीहि इतकी स्वस्तात, असा दुप्पट आनंद झाला. अर्थात अमेझॉनवरून भारतात मागवली असती तर नाकापेक्षा मोती जडच झाले असते !

खरे तर आता भारतात आल्यावर इ-बे इंडिया वर अशी दुर्मिळ पुस्तके स्वस्त मिळतात का हे बघायला हवे !

स्वस्त पेक्षाही फुकट बरी असे वाटून मग काही फार अतिप्राचीन पुस्तके गुटेनबर्ग ह्या संकेतस्थळावर जाऊन खाली उतरवून घेतली. त्यात एक ८०० पानी प्लेटोचे "रिपब्लिक" ही घेतले. अगदी चकट फू !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunodaya Zala---9

Books and prices

Though I love to buy good books, I don't want to spend much money on them. Especially since I do not read any books for any exam., I want to spend as little on them. I don't mind if these are used ones. Most of the Best Sellers I read in "Pirated Editions". Only drawback in those is , sometimes the ink is little faded and page numbers get jumbled up. But each word in these pirated books is original . An added advantage in reading such pirated editions is you can almost be confident that the book is good because the pirates will not spend their energies on any other book but a sure fire best seller !

Some books are hard to get. I was searching for one such book viz., "Meaning of Art" by Herbert Read. Hence the first thing I searched here was this book. And like last time, I got this rare book, this time too, in Library here. Now I wanted to get it xeroxed, to take it to India and at a nominal cost of xeroxing. With the help of my grandchildren I started tinkering with the xerox machine at home. But my grandson advised to look it up on amazon. Before I could tell him the economy of xeroxing, he said it might be cheaper as a book on amazon. And what a surprise ? I got it as cheap as at 1 Dollar and that too, delivered free. Taking inspiration from this, then I ordered few more rare books of the same author which I got for as little as 2 Dollars. The pleasure of receiving beautiful art at the cost of nothing, is a valuable experience I will cherish throught my visit in America.

While, I was wondering on amazon another website showed me a better deal . I always wanted to read the old classic "Republic" of Plato and I got it down from Gutenberg free of charge. This beats all the pleasures of good rare books and at no cost !


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Sunday, August 8, 2010

अरुणोदय झाला--८

साल्वोदोर डाली, किंमत झाली ?
मागे बातमी होती की साल्वोदोर डाली ह्या चित्रकाराचे चित्र काही कोटी डॉलर्सना ऑक्शनमध्ये विकल्या गेले. प्रथम त्याचा अचंबा वाटला, एवढी किंमत कशी ? मग वाचले की अशा प्रचंड किंमती इतर चित्रांनाही कशा मिळतात, हुसेन ह्यांची चित्रेही कशी कोटी कोटीला विकल्या जातात. मग वाटले की होता तरी कोण हा डाली ?

तर कळले की हा स्पेनचा मूळचा, सर-रिअ‍ॅलिस्ट चित्रप्रणालीचा एक चित्रकार, १९८३ मध्ये वारलेला. ह्याने स्वत:च्या चित्रांच्या प्रदर्शन, खरेदी, विक्री वगैरे साठी एक विना-प्रॉफिट फौंडेशन केलेले आहे. त्यांच्याकडे आजमितीला ५०० मिलियन डॉलरची चित्रे संग्रही आहेत व गेली २० वर्षे ते त्याची चित्रे खाजगी लोकांकडून विकत घेत आहेत. ह्याने चित्रांबरोबर फोटोग्राफी, कमर्शियल डिझाइनिंग, मूर्तीकला असे नाना उपद्व्याप केलेले. ह्याला विज्ञानाचे भयंकर आकर्षण. ह्याची प्रसिद्ध चित्रे आइनस्टाइनच्या रिलेटिव्हिटी ऑफ टाइम वर आधारलेली आहेत तर कित्येक न्युक्लियर तंत्रज्ञानावर. ह्याला आर्ट स्कूलने काढून टाकले होते कारण तो कोणाला योग्यतेचा समजत नव्हता. सर-रिएलिस्टांच्या संघटनेनेही नंतर ह्याच्यावर बहिष्कार टाकला होता. स्वत:च्या बापाबरोबर भांडण झाल्यावर ह्याला बेघर व्हावे लागले होते. वडिलांनी त्याचे नाव त्याच्या आधी मेलेल्या भावाचेच ठेवले होते तर त्याला आपण भावाचाच अवतार आहोत असे कैक वर्षे वाटे. ज्या येशू,मेरीचे चित्र ह्याने काढले होते त्यावर मी थुंकतो अस तो एकदा म्हणाला होता, तर शेवटच्या दिवसात अतिशय धार्मिक झाला होता. तो अतिशय छानछोकीने राही, विक्षिप्त वागे, सिनेमे पाही, काढी, दिग्दर्शन करी असा हरहुन्नरी व नंतर ठार वेडा म्हणता येईल असा !

त्याच्याच सारखे वेडे असणारे असंख्य वेडे चित्रकार आजही त्याच्या सारखी किंमत मिळावी असे वेड मनी बाळगून असतील पण चित्रात जे सर्जनाचे बेभान वेड हवे ते अजूनही त्यांच्या वाट्याला येत नाही, चित्रांची किंमत तर नाहीच ! डालीच्या वाटेला आलेले सर्जनाचे वेड लोभाचे का त्याच्या चित्रांच्या वाटेला आलेली किंमत लोभाची हे मात्र ठरवणे अशक्य !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Arunodaya Zala---8

Salvodor Dali, Got good price ?

Last week's news brought Salvador Dali in limelight once again. His personae was always seeking it, the history tells us. When we read about his life our amazement about the price his pictures is fetching fades away and we are left wonderstruck at the icredible turn of events he had. And yet he could produce such masterpieces.
At one time he was one of the main promotors of surrealist tradition but later they expelled him from their camp. He was even ousted from the Art school as he never accepted anyone to judge his paintings. He was a great student of science and many of his paintings show Einstein's relativity of time and some nuclear science. Though he initially insulted his own picture about Mary and Jesus, he turned to religion in his later life. He was given to dress dandy and practiced many other arts like photography, sculpture, commercial arts, advertising, acting in cinemas, directing them etc. Non-profit foundation in his name has a rich collection of his paintings worth 500 million and they are still buying since last 20 yrs.

There are many an artists who are equally ecentric in behaviour but would love to aspire to get the price for their paintings as his paintings command.

We are perplexed to decide as to what we should value more, his ecentricity in life or his madness in his artistic creations or the amazing price which his paintings fetch these days ?

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Saturday, July 31, 2010



वॉल स्ट्रीट जर्नल हे उद्योग जगतातले महत्वाचे दैनिक आहे. त्यांनी वेळात वेळ काढून एका चित्रासाठी जागा सोडून त्यावर एका चित्रकला समीक्षकाकडून चित्राचे रसग्रहण द्यावे हे फार कौतुकाचे आहे. आपण एरव्ही अमेरिकेची "पैसा, पैसा" करण्याची , भांडवलशाहीची निंदा नालस्ती करतो, पण एवढ्या धकाधकीच्या जमान्यात एखाद्या मास्टरपीस वर कोणी एवढे श्रम घ्यावेत त्याबद्दल आपण त्यांची अवश्य पाठ थोपटायला पाहिजे.
ह्या चित्राचे वैशिष्ट्य असे की ह्यात मेरी, येशूची आई , हिचा चेहरा चौकटीच्या मध्यभागी असल्याने त्यावर लक्ष्य केंद्रित होते.येशूची आई व आजी खाली येशूकडे व कोकराकडे पहात आहेत तर येशू व कोकरू वर त्यांच्याकडे पहात आहेत. त्याने पाहण्याचा समतोल साधतो. येशू पुढे मरणार आहे हे माहीत असूनही मेरी व तिच्या आईच्या नजरा मोना लिसा सारख्या निर्विकार आहेत. रंग संगतीत वरपासून खालपर्यंत रंग गडद होत जातात.

चित्राची माहीती व रसग्रहण जाणकारांकडून करून घेऊन आपण चित्रकलेचे, सौंदर्यास्वादाचे धडेच देत आहोत असे अशा प्रयत्नातून साध्य होत आहे. त्याबद्दल वॉल स्ट्रीट जर्नलच्या ह्या प्रयत्नांचे कौतुक करू या !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Friday, July 30, 2010

अरुणोदय झाला---६

नव्या शब्दांचे घडणे

भाषा शास्त्र म्हणते की आपण प्रत्यही नवनवीन शब्द बनवत असतो, ते अंमलात आणत असतो, व कालांतराने त्यातली गोडी संपत आली की ते चक्क टाकूनही देतो. आपण पाहिले की आजकाल नवीन टारगट पोरे "वाट लागली", "भंकस", "फंडा", "सेंटी होणे", वगैरे शब्द बिनधास्त वापरत असतात.

तर अशाच अमेरिकेत वाट लागलेल्या एका कंपनीने ( गोल्डमन सॅक्स ) तोंडी अशा सूचना दिल्या आहेत की त्यांच्या नोकरवर्गाने सर्व शब्द ई-मेल मध्ये जपून वापरावेत व ते एरव्ही वापरतात ते शब्द, पण जे आजकाल बदनाम झालेत, ते वापरू नयेत. वाट लागल्यावर अमेरिका अभिव्यक्ति-स्वातंत्र्यावर कसे सोईस्करपणे डोळ्यावर कातडे ओढून घेते हे आपण बघतोच आहोत. अमेरिकेचा सेनापती अध्यक्षांविरुद्ध जरा मानहानीकारक बोलला ( एका मासिकाच्या मुलाखतीत )तर त्याला काढून टाकले गेले आणि तरीही दुसरीकडे जॉन स्टुअर्ट त्याच्या रोजच्या "डेली शो" कार्यक्रमात भल्याभल्यांची खिल्ली उडवत असतो. अशा गोंधळात हे कोणते शब्द आहेत हे पाहणे गमतीचे ठरेल.

एक शब्द आहे "एस-डील" ! काय असते हे ? तर सांगतात की "स्वीट-हार्ट डील". आता ह्या शब्दात नैतिकतेच्या चष्म्यातून बाधा येणारे काही दिसत नाही, मग हा का वापरू नये ? तर वकील लोक सांगतात, हे असे करार असतात की ज्यात सर्व फायदा एकाच पक्षाला , स्वीट-हार्टला, होतो. म्हणजे थोडक्यात जे एकतर्फी करार असतात ते कायद्याच्या दृष्टीने बेकायदा असतात. वेस्ट इंडीजला असताना आम्ही आमच्या कॉंन्ट्रॅक्टस मध्ये भारतीय परंपरेने मुदतीत काम न झाल्यास किती दंड ( पेनल्टी ) ते लिहीत असू. तिथल्या कंपन्या अमेरिकन प्रभावाखालच्य़ा . त्या म्हणत उशीर झाला तर जसा दंड तसाच लवकर काम उरकल्याबद्दल बक्षीसीही असायला हवी. हे कॉंन्ट्रॅक्ट कोर्टात टिकणार नाहीत व ते स्वीट-हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स ठरविल्या जातील.

जगात सर्वात भरभराट व्हावी ती मात्र अमेरिकेची, पण करार असू नयेत स्वीट हार्ट डील सारखे, असा अमेरिकन नीती- मत्तेचा खाक्या. इथे मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही हा नवीन शब्द वापरू नका असे म्हणताहेत, ते मात्र भाषाशास्त्राच्या विरुद्ध आहे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

arunoday zala--6

New Words

Linguistics tells us that over a period,in any language, we coin new words or give a new meaning to the existing words and when these are rarely used we throw them away as obosolete.

Recently Goldman Sachs in USA has asked its employees to use some words very cautiously in their emails, letters etc. This is mostly due to image problems. It is interesting to see which words the company thinks as damaging. Some words or symbolic short forms of them like "WTF" are definitely morally low sounding ( assuming the long form could be "Want to f---" ). Another word being banned is "S-deal". This word, though morally passable, perhaps means "Sweetheart Deal". What is so damning about Sweetheart Deal ? The lawyers will tell us that these are deals, which give all the terms favourable to one party alone, just like how we treat our sweethearts. Or at least we are supposed to.

When I was in West Indies, we used to mention in our contracts, in the habit of Indian ways of deals, a clause specifying penalty for delays. The contractors used to tell me that mentioning penalty alone, and not providing for incentives for early completion, would render these contracts to be Sweetheart deals and so void in court of law. So, the sweetheart deals are not balanced and are onesided and thus not considered as flawless contract.

On one hand America prides itself for upholding the right to freedom of speech ( but fires its general for speaking to a magazine in not so kind words about the president ) and on the other even the company going downhill like Goldman Sachs, tells which words not to use. Moreover the pure science of linguistics tells us that people will coin new words and new meanings ! It is a strange world !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Wednesday, July 28, 2010

अरुणोदय झाला---५
भाषा तसे विचार
अमेरिकेत काहीही घडू शकते. "वॉल स्ट्रीट जर्नल" तसे शेअर्स, उद्योग वगैरे वरचे दैनिक. पण परवा त्यात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कल्चरल सायकॉलॉजीच्या मुख्य, श्रीमती लेरा बोरोडिटिस्की ह्यांचा "भाषेचे विचारांवर होणारे परिणाम" असा एक छान मोठा लेख होता. लेखिकेने त्यात असे दाखविले आहे की आपण कोणती भाषा बोलतो, त्याप्रमाणे आपल्या विचारांवर परिणाम होतो. भाषेचे रचनेचे जे निय़म असतात त्यानुसार विचार येतात. उदाहरण म्हणून बाई सांगतात की स्पॅनिश भाषेत "जॉन ने भांडे फोडले" असे म्हणताना "भांडे आपोआप फुटले" असे म्हणावे लागतात. त्यांच्या म्हणण्यानुसार मग जॉन जर स्पॅनिश मध्ये बोलला तर त्याच्यावरचा आळ जातो व भांडे फुटते. सामान्य वाचकाला ही "भांडा फोड" फोड केल्यावरच उमगणार.
इथे आठवण येते ती पु.ल.देशपांडेंची. ते म्हणत प्रत्येक भाषेचा आपला एक लहेजा असतो. उर्दू भाषा इतकी भारदस्त, शेर-शायरीवाली की त्यांना वाटे वाघ कधी काळी बोलला तर उर्दूतच बोलेल. असेच कित्येकांना वाटते की रसग्गुल्ला खाल्ल्यावर बोलण्याची गोड प्रेमाची भाषा म्हणजे बांग्ला. आपल्याकडे कोणाला "वाकडे" बोलायचे असेल तर ते मराठीतच चांगले येणार.
कदाचित म्हणूनच आपल्याकडे "चलता है" असे म्हटल्याने आपल्याला काही चांगले मिळत नाही तर अमेरिकनांना सगळे "बेस्ट" मिळते.
सहज म्हणून ह्या बाईंचे संकेतस्थळ पाहिले तर अजून एक गंमतशीर बाब पहायला मिळाली. त्यांनी डिपार्टमेंटची एक अ‍ॅंथेम केली आहे. हे गाणे म्हणते, "तुम्ही काहीही म्हणा मी त्याविरुद्ध आहे". विरोधाचे बाळकडू पाजणारी ही विदुषी एकदम मराठीच वाटते,इतके न पटण्याचे व मराठीचे सख्य आहे. हे पटवण्यासाठी चला ह्यांना विरोध करू. प्रसिद्ध भाषाविदुषी सुसन लॅंगर म्हणतात की विचार "चिन्हा"त असतात, भाषेत नसतात. समजा मराठी ही भाषा लैंगिक बोलण्याला असभ्य समजणारी आहे, म्हणून मला "लैंगिक" विचार येत नसतील तर आता अमेरिकेत चालते म्हणून इंग्रजीत बोललो तर मला "लैंगिक" विचार येतील हे कसे शक्य आहे? आजकाल प्रत्येकाला मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या भाषा सहजी येतात व प्रसंगापरत्वे, स्थळपरत्वे बोलाव्या लागतातही. तर मग माणसाचे विचार असे सारखे बदलते कसे होतील ? माझा मराठी बाणा आता कसा छान विरोधतो आहे !


अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunodaya Zala--5
Lost in Translation
Strange things happen in America. The other day "Wall Street Journal" had an article on "effect of language on thoughts" by Ms.Lera Boroditsky who is heading cultural psychology department at Stanford University. She proposes that the way we think is affected by the language one speaks.Demonstrating the difference she cites examples of Spanish, in which they say "the vase broke itself" instead of "John broke the vase". Since the blame goes away in Spanish, Johns would love it, but the common man would not understand this linguistic gimmick.

P.L.Deshpande used to say that Urdu is such a grandiosque language that if ever a lion talks, it will be in Urdu. Bengalees speak so sweet that we feel the language of love has to be as sweet as Russagulla. If ever one has to speak insultingly, perhaps one would speak aptly in Marathi. Perhaps in all Indian languages we say "chaltaa hai " and that may be the reason we don't insist so much for what we want and Americans get all the best !

When one surfs the website of this professor, we find a funny "anthem" she has posted there. It goes " Whatever you say,I am agaist it". She seems to inculcate the Socrates' habit of going against the well trodden path for exploring new possibilities. Let us take her on the anthem and go against her proposition here. I remember the great linguist Ms.Susan Langer telling us that our "thoughts" do occur to us through "symbols" and we interpret or communicate by language. If that happens, when I am having a sexual urge , say, then it must be appearing in my mind in some "sexy symbols". Now if my mother tongue, say, Marathi, gives me inhibitions and taboo for such "thoughts" ( and at this age ) then my language must be supressing or prohibiting it and if I speak, say, English, it must encourage it. But I know from experience that no such phenomenon takes place,for any language I speak. And thoughts come and go irrespective of the language I speak. Especially in India, where everyone easily speaks at least three languages ( Marathi, English, Hindi ) , it would be a great confusion of changing "symbols" for three languages and may be we keep mum ! See, I am already influenced by the Lera's anthem and going against her !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, July 20, 2010

अरुणोदय झाला-३
शब्द, भाषेचा "फंडा"
अमेरिकेत कशाचे ना कशाचे फॅड कायमच असते. सध्या इथे स्पॅनिश भाषा शिकायचे प्रस्थ दिसते आहे. कारण मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्मलेली माझी नात, जिला मराठी अजिबात येत नाही, सध्या माझ्याशी स्पॅनिश बोलते.
ही भाषाही मोठी अजब आहे. अमेरिकेतला जो कामकरी वर्ग आहे व जो बहुतांशी आडमार्गाने अमेरिकेत आला आहे, त्या वर्गाची हि बोली भाषा आहे.जगात सगळ्यात ज्यास्त लोक (१३० कोटी ) मंडारिन म्हणजे चिनी बोलतात व ती युनोची सहापैकी एक मान्य भाषा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्पॅनिश ( इस्पॅनिओल) भाषेचा जी बोलतात, ५० कोटी लोक, व तिसरा नंबर लागतो इंग्रजीचा ( ४९ कोटी). हिंदी व उर्दु एकत्र पकडले तर ( ६० कोटी) आपला नंबर तिसरा लागू शकतो पण सध्या तरी तो चौथा ठरतो.
तर आपल्या पुढे असलेली ही स्पॅनिश भाषा आहे तरी कशी ?
भाषेचा "फंडा" असलेले नुसते शब्द घेतले तर काय दिसते ? आपण मराठी, जे तू तू मै मै करण्यात वाकबगार असतो,त्यांचा "तू" स्पॅनिश मध्येही "तू" च आहे. आपला "सदरा" घालण्या अगोदर आपण बहुदा "खमीस" घालत असू . कारण स्पॅनिश मध्ये सदर्‍याला "खमीसा"च म्हणतात. पूर्वी आपण ज्या "मेज" वर बसत असू त्याच "मेजा" वर आजही स्पॅनिश लोक बसतात. आपल्याला व स्पॅनिश लोकांना सारखाच "पगार" मिळत असावा कारण दोन्हीकडे "पगार" म्हणजे पगारच आहे. स्पॅनिश लोकांच्या पायजम्याला नाडा नसावा कारण "नाडा" चा अर्थ "नाही" असा होतो. "अंक" म्हणजे जी मांडी होते ती स्पॅनिश लोकांना "बेडकाचे पाय" वाटते. जी गोष्ट आपल्याला "अप्रीय" वाटते ती स्पॅनिश लोकांना "अप्रीतो" वाटते. ज्या मराठी म्हातार्‍यांना "अस्मा" होतो त्यांना स्पॅनिश मध्येही "अस्मा" च होतो. जे मराठीत "बैलोबा" ठरतात त्यांना स्पॅनिश लोक "बुये" म्हणतात. कामशास्त्रात पलंगाचे महत्व स्पॅनिश लोकांना पटलेले असावे कारण ते पलंगालाच "काम" म्हणतात. दशमान पद्धतीतल्या "दश"ला ते लोक "देझ" म्हणतात, दोनला "दोस" म्हणतात.पूर्वी गॅबर्डीन नावाचे एक कापड मिळे त्याचा अर्थ ते रेनकोट असा करतात.जर्सी व मनीला हे त्यांचेच प्रकार असावेत कारण ते लोक त्याच नावाने ते ओळखतात. भांडणार्‍या माणसाला ते "लुचा" म्हणतात. धर्मशाळा, कार्यशाळा वगैरेतले "शाळा" म्हणजे स्पॅनिश लोकांची "खोली" ठरते.
आता कशी ही भाषा अगदी आपल्यातली वाटते की नाही ? अर्थात हे वाटायला अमेरिकेतले अगदी खुले राहणे आवश्यक आहे। कसे ? तर बघा आम्ही नातवंडांना रशियन मॅथ च्या क्लासला सोडून, चायनीज स्टोर मधून इंडियन ग्रोसरी घेऊन येतो व मग सांड्रा ही मेक्सिकन कामवाली आमच्या नातीशी स्पॅनिशचा सराव करते. सर्व भाषाशास्त्रज्ञांना अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.
अगदी आमच्या पुण्याच्या नाती आळंदीहून पुण्याला दिंडीतून चालत आल्या त्याच तोडीचे हे आहे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Tuesday, April 6, 2010

अरुणोदय झाला: ३

वाट लागली
नोम चोम्स्की नावाचे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मूल प्रथम भाषा शिकते तेव्हा त्याच्याकडे अगदी थोडी माहीती असते, अगदी थोडे नियम माहीत असतात, व तेवढ्याच बळावर व बाहेरच्या विश्वाचे संपर्क न्याहाळत ते त्याच्या मनाने भरारी घेते व काही एक ठरवून ती भाषा शिकते. ही काही माहीती नसताना, धडाडीने निष्कर्ष काढणे, हा मुलाचा ( माणसाचा ) जात्याच स्वभाव असतो व पुढेही सर्व ज्ञान-विज्ञानातली प्रगती, नवीन शोध ते ह्याच स्वभाव-गुणाने करते.
कदाचित दिलेल्या प्रमाण भाषेतलाच एखादा शब्द घेऊन मग त्यातूनच वेगळा अर्थ काढण्याची खोड मग माणसाला लागली असली पाहिजे. शिवाय माणसे एखादा गट बनविला की पटकन लक्षात येईल असे कोड-नाव ठेवतात.ह्यात काही जुजबी कोड असतात व्यंगांवरून . जसे : लंगडा, डुचका, मोटू, लंबू वगैरे. अशाच खोडी मुळे मूळ अर्थ वेगळाच असलेला शब्द मग लोक वेगळ्याच अर्थाने वापरू लागतात, रूढ करतात. जसे : वाट लागणे. सुरुवातीला "दिंडी वाटेला लागली", "तो मग चांगल्या वाटेला लागला", "तो मुंबईच्या दिशेने वाटेला लागला", असल्या वाक्य़ांवरून "इच्छित स्थळी जाण्यासाठी वाट धरणे "असा चांगला अर्थ असणार. त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाने मग काही लोक म्हणू लागले असतील की "मला त्या रस्त्याने जाताना खूपच अडचणी आल्या, अगदी नकोसे झाले.", ह्यालाच मग हे लोक म्हणू लागले : वाट लागली.

--अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२
अरुणोदय झाला ! : २

डावे, उजवे

शिल्पकार जेव्हा एखाद्या दगडाकडे पाहतो तेव्हा त्याला दगड दिसत नाही, तर त्यात कोरायचे कल्पिलेले शिल्प त्याला दिसते. मग तो त्याच्या कुसरी प्रमाणे त्या दगडातून नको असलेला भाग छिन्नीने काढून टाकतो. उरते त्याला आपण शिल्प म्हणतो.
हे नको असलेला "दगड" काढून टाकणे आपण भाषेच्या वापरातही करत असतो. हे आपण आपल्या मनानेच करत असतो. त्यामुळे व्याकरण एक सांगते व आपण वापर करतो भलताच. एखाद्या शब्दाचा अर्थ असतो एक व आपण त्याला फिरवून करतो भलताच. कधी कधी तर शब्दाचा जो प्रमाण अर्थ आहे त्याला बदलून आपण त्याच्याविरुद्ध अर्थाचा शब्द रूढ करतो. कै.प्रा.भगवंत देशमुखांना हे खूप खटके. मला ते एकदा म्हणाले, अहो, "अपरोक्ष " म्हणजे (रूढ अर्थ जरी असला "माझ्या माघारी, माझ्या डोळ्याआड") तरी प्रमाण भाषेत व कोशात तो आहे "डोळ्या देखत, समक्ष". म्हणजे अगदी विरुद्ध. आणि "परोक्ष" चा अर्थ कोशात आहे : "डोळ्याआड". हे आपण अगदी एखाद्या खटयाळ मुलासारखे उलट करीत, वापरीत असतो. बंडखोर मुलाला आपण बैस म्हटले तर तो मुद्दाम उभा राहतो. त्याच प्रमाणे ही बंडखोरी आपण करतो. कोणी तरी एक सुरू करतो आणि मग सगळेच त्याचे बघून तसे करू लागतात. शिवाय आपण त्याचे समर्थनही करतो की सर्व-संमतीने हा अर्थ असेल तर आपण बदलूयात ना अर्थ !
ही बंडखोरी फक्त आपण मराठीच करतो असे नाही. अमेरिकेत घराबाहेर गाडी "पार्क" करण्याची जी जागा असते, त्याला ते लोक म्हणतात "ड्राईव्ह-वे" आणि गाडी चालवण्याच्या रस्त्याला म्हणतात "पार्क-वे".
बर्‍याच वेळा काही गोष्टी आपल्याला मुळातूनच समजलेल्या नसतात. जसे दिशा . परवा वास्तुशांतीला आलेल्या भटजीने आम्हालाच विचारले की पूर्व कुठल्या बाजूला आहे ? आता आमची पूर्व व भटजींची पूर्व अशा काही दोन वेगळ्या दिशा असतात का ? सगळ्यांनाच लहानपणी शिकविलेले असते की सूर्याकडे तोंड करून उभे राहिले असता चेहर्‍यासमोरची पूर्व, मागची पश्चिम, उजव्या हाताला दक्षिण व डाव्या हाताल उत्तर ( आता हे मी कसे लक्षात ठेवले ते सांगतो.डाउ व ऊद, म्हणजे सूर्याकडे तोंड तर उजव्या हाताला दक्षिण व डाव्याला उत्तर.शिवाय मास्तर चुकीचा हात दाखवला तर त्यावर छडी मारत म्हणून धाकाने ऊद लक्षात ठेवायचे नाही तर खा छडी.). आता मुख्य चार दिशांची ही गत तर ईशान्य़, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्यांची बातच नको. दशदिशा आम्हाला कळल्याच नाहीत तर पूर्व कोणती व पश्चिम कोणती हे आम्हाला कसे माहीत ? आम्ही पश्चिमेची नक्कल जरूर करतो पण आम्हाला पश्चिम दिशा माहीतच नसते. म्हणूनच आजच्या मुलांना नकाशात पूर्व कुठे आहे असे विचारले तर ते हमखास पश्चिम दाखवतात.
असेच आहे डावे उजवे . सुरुवातीला लक्षात ठेवण्याची युक्ती म्हणून सांगत की आपण जेवतो तो उजवा हात. व ढुंगण धुतो तो डावा. आजकाल पॉटी ट्रेनिंगच्या धसक्याने आया इतक्या मेटाकुटीला आलेल्या असतात की त्यांना वाटते येईल ह्याला ओळखता नंतर. मग तो हमखास रिक्षावाल्याला ( मोठा झाल्यावर ) डावीकडे जायचे असले तर म्हणतो "राइट". ( मग रिक्षावाला ओरडतो की राइट्ला नो एन्ट्री आहे ). काय "डावे-उजवे" आहे, हे आजकालच्या पिढीला न कळण्या मागे हेच अज्ञान असावे. मराठी भाषेने आता जायचे तरी कुठल्या दिशेने असा प्रश्न आला की मग दिशांचे ज्ञान पाहता "खाली, वर" ह्या दोनच दिशा ( दशदिशांपैकी ) शिल्लक राहतात. वर गेले तरी भाषेचे मरण, खाली गेले तरी गाडले जाऊन मरण !

अरूण अनंत भालेराव
भ्रमण : ९३२४६८२७९२

Friday, March 5, 2010

मौखिक परंपरेचे मुख !
तुकाराम महाराजांच्या काळी जो वारकरी संप्रदाय होता,त्याची म्हणतात मौखिक परंपरा होती. म्हणजे जे काही संप्रदायाचे ज्ञान, नियम, रीती-रिवाज होते,ते कुठे लिखित स्वरूपात नव्हते तर सर्व तोंडी होते. जसे भजन, कीर्तन वगैरे सर्व मुखाने म्हणण्याचे प्रकार होते. अशी ही मौखिक परंपरा.
त्याच वेळी दुसरा एक महानुभावी संप्रदाय होता. तो वारकर्‍यांपेक्षा प्रगत होता.पण त्यांचे साहित्य,नियम,रूढी वगैरे सर्व मोडी लिपीत लिखित स्वरूपात होते.ह्या कठिण प्रकारापायी हा संप्रदाय लवकर लयाला गेला. मौखिक परंपरेमुळे वारकरी संप्रदाय बराच टिकला, वाढला.
आपल्याला वाटते, आज जग किती पुढे गेले आहे,सगळे कसे नीट,संगतवार लिहून ठेवलेले असते. मोठमोठे करार व्यवस्थित कलमे घालून लिहून ठेवलेल्या बाडातून असतात. सगळ्यात मोठ्ठा करार कोणता ? " आय डू " किंवा "शुभ लग्न सावधान" म्हणून होणारे लग्न ! का हा मोठ्ठा करार ? कारण ह्या करारान्वये संतती निर्माण करीत लोक एक नवीन पीढी तयार करतात. ह्यापेक्षा मोठी निर्मिती ती काय ? आणि कसा असतो हा करार ? तोंडी ! आणि त्याला कायद्याच्या सर्व बाबी लागू होतात. चालू आहे ना मौखिक परंपरा !
वीस पंचवीस वर्षापूर्वी शेअर बाजार,सट्टे बाजार हे सर्व तोंडी चालत. खूप दाटी होई. दलालांना लटकण्यासाठी बस मध्ये असतात तसे चामड्याचे पट्टे असत. मोठ्ठ्याने ओरडत, खाणाखुणा करीत हे सर्व चाले.मोठ मोठे लिलाव कसे होतात ? ( आयपीएल चा लिलाव आठवा ) बोली तोंडी लावावी लागते. लिलाव करणारा म्हणतो, दस लाख एक बार, दस लाख दो बार, दस लाख तीन बार, सोल्ड ! खल्लास इकडचा बंगला तिकडे ! निवडणुकींचे,क्रिकेटचे,सट्टे फोन वरून, तोंडीच असतात.
प्रत्येक माणूस भाषा शिकतो तो आईच्या तोंडून आपल्या तोंडी, मौखिक परंपरेने. गाणी तर बोलून चालून सगळा तोंडी मामला. हुशार मुलाला शिकवाल ते तोंडपाठ असते.पूर्वी परीक्षाही तोंडी असत. अजूनही डॉक्टरीची अवघड परीक्षा तोंडीच असते. पीएचडीचे डिफेन्स नावाचे भाषण व प्रश्नोत्तरे तोंडीच असतात. ग्रेट ग्रेट गुरू, लेक्चर्स देतात तोंडी. निवडणुका जिंकल्या जातात तोंडी भाषणांनी. देश चालवल्या जातो, लोकसभेत, तोंडी. माणसाचे सर्व महत्वाचे व्यवहार, जसे, शिक्षण, प्रेम, संसार, गुजगोष्टी, आरडाओरडा, त्रागा, आवाहने, आव्हाने,ऑफिसातल्या मीटींग्ज, रस्त्यावरची गजबज, मुलांचे संगोपन, नातेवाईकांशी संवाद, वगैरे ,तोंडीच होतात. म्हणजे मौखिक परंपरा आपण अजून पाळतोय तर !
आयटी ( संगणक ) युगामुळे सगळे संगणकाच्या भाषेत सांगितले तरच लवकर कळते. मौखिक परंपरा किती महत्वाची माहीती आहे ? अहो संगणकात सगळ्यात मोठी फाईल साऊंड बाइट्सचीच होते. म्हणजे मौखिक परंपराच ग्रेट !
---अरुण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२

Thursday, March 4, 2010

भारवाही तंत्राची मंत्र-गीता !
माझ्या नातवंडांना जेव्हा मी त्यांच्या आई-वडिलांचे ( म्हणजे आमच्या मुलांचे ) पहिली दुसरीतले पेपर दाखवतो तेव्हा, उलटे बी, डी, त्रिकोणात उगवलेल्या फुलाचे फ्लॉवर-पॉट,वगैरे बालसुलभ चुका पाहून त्यांना खूप हसू फुटते व मग दिवसभर नातवंडे त्यांच्या आई-वडिलांची खिल्ली उडवत राहतात. आता भले ते खूप हुशार आहेत, पण लहानपणी ते ही चुका करतच शिकले होते हा बोध मग नातवंडांना होतो.
"आऊटलायर्स" नावाच्या नुकत्याच आलेल्या माल्कम ग्लॅडवेल च्या पुस्तकात तर त्याने मांडलेय की जीनीयस अशी कोणी व्यक्ति नसते तर ज्याला खूप सराव होतो, तोच मग जीनीयस होतो. आता सचिनचेच बघा ! काय प्रचंड मेहनत ! त्याची ९३ शतके झळाळतात पण त्याने किती नाना तर्‍हेचे लाखो चेंडू सरावात झेलले ते आपल्याला माहीत नसते. गणिताचे तर हे नेहमीचे ठरलेलेच आहे. जितका सराव ज्यास्त तितका गणित कमी लचका तोडते. हुसेन आता प्रसिद्ध चित्रकार आहे पण किती असंख्य सिनेमाची पोस्टर्स त्याने रंगविली असतील ते तोच जाणे. तर सरावाची महती अशी !
तुकाराम महाराजांच्या गाथेची अशीच करावी तितकी मोजदाद कमीच भरेल. दोन लाख तीन हजार सातशे पन्नास शब्द, चार हजार पाचशे चौर्‍यांशी अभंग, एकूण २५६७० खंड किंवा चौक आणि हे सगळे वयाच्या बेचाळिस वर्षाच्या आत ! प्रत्येक चौकात एक यमक जोडी म्हणजे २५६७० यमके ह्या कवीने निर्माण केली. किती सराव, कसा हातखंडा !
आता इतका हातखंडा असलेला कवी अगदी सुरुवातीला कच्चा होता, असे कोणी म्हटले तर त्याचे कोण मानणार ? कुसुमावती देशपांडे ह्या खूप विद्वान बाई. त्यांनी साहित्य अकादेमी साठी "A History of Marathi Literature" नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात तुकारामासंबंधी लिहिले आहे :His first important work was Mantra Geeta. It was written after years of suffering and spiritual contemplation.Tukaram had studied sacred works and also composed some abhangas before he attempted this interpretation of Geeta. However, it was not a work of quality of the Jnaneshwari. It is tentative, more an expression of views of Tukaram and of contemporary conditions than than an elucidation of the Geeta. It is also unsophisticated and downright in its style, with the unadorned language of everyday usage..." सरावाने कवी महाकवी होतो हे जरी आपल्याला मंजूर असले तरी ते तुकाराम महाराजांना लागू करायला धीर होत नाही. आणि आजकाल तर हा विचार आधी कोणाची कोणती जात आहे त्यावरून ठरविला जाण्याची शक्यता. जे तुकाराम भक्त आहेत ते तर लागलीच म्हणतात की हा वेगळा तुकाराम आहे. हा कोणी नगरचा तुकाराम होता देहूचा नव्हे !
खुद्द तुकाराम महाराज लीनतेने म्हणतात :फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥ पण तुकाराम भक्तांना वाटते हा काही सन्मान नाही, असे कसे असेल ? पण सुरुवातीची रचना कच्ची असणे, ह्यात सरावाचा व नंतरच्या प्रतिभेचा बहुमानच आहे. शिवाय हे किती जिवंत कलाकाराचे दर्शन आहे. मला तरी वाटते, हाच खरा तुकाराम आहे, कारण ह्यात भारवाही तंत्राची मंत्र-गीताच सांगितली आहे !

--अरूण अनंत भालेराव
भ्र:९३२४६८२७९२
न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
३ मार्च २०१०

Tuesday, March 2, 2010

न कळे कृपावंता माव तुझी !

संत तुकाराम महाराज गजल लिहीत होते असे म्ह्टले तर दचकायला होईल. पण गजलेचे तंतोतंत कसब वापरीत त्यांनी एक गजल लिहिली आहे. ही देवाच्या सर्वांठायी असण्याविषयी असून माया ( माव ) कशी आपल्याला हे समजण्या पासून वंचित करते हे सांगणारी आहे.
ह्याचे हिंदीत भाषांतर केले तर गजल सहज दिसून येते. मूळ रचना अशी :
" कवण जन्मता कवण जन्मविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण हा दाता कवण हा मागता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण भोगता कवण भोगविता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
कवण ते रूपता कवण अरूपता ?
न कळे कृपावंता माव तुझी !
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही !
पारंपारिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.
हिंदीत किंवा उर्दूत भाषांतर केले तर असे होईल:
कौन जनमता कौन जनमाता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन दाता कौन मांगता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन भोग लेता कौन भोग देता ?
न समझे है दयालू, माया तेरी !
कौन रूपवान कौन रूपबगैर ?
न समझे है दयालू, माया तेरी !
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही !


----अरूण अनंत भालेराव
३ मार्च २०१०