Tuesday, August 10, 2010

अरुणोदय झाला-----९

पुस्तके आणि किंमती

जी पुस्तके अगदी हवी असतात त्यांना किंमत मोजताना काही वाटत नाही. पण आता काही एखाद्या परिक्षेसाठी वाचायचे नसते, त्यामुळे कोणत्याही पुस्तकाला कमीत कमी पैसे पडले तर बरे, असे हमखास वाटते. त्यामुळे मी बेस्ट सेलर्स "पायरेटेड एडिशन" मधली वाचतो. ह्यात छपाईची शाई कधी कधी पुसट दिसते तर कधी पाने मागे पुढे लागलेली असतात. पण शब्द अन शब्द तोच, लेखकाचाच असतो. शिवाय "पायरेटेड" पुस्तके छापणारे स्वत: खूप धोरणी असतात, जी पुस्तके प्रसिद्ध होऊ शकणारी असतात तीच पायरेट करतात.( मराठीत पायरेटेड झालेले मी पाहिलेले पहिले पुस्तक: आम्ही अन आमचा बाप-ले-नरेंद्र जाधव ). त्यामुळे हमखास चांगलीच निघतात.

हर्बर्ट रीड ह्यांचे "मीनींग ऑफ आर्ट" हे पुस्तक मी किती तरी वर्षे शोधत होतो. कुठेच मिळाले नाही. त्यामुळे इथे आल्या आल्या इथल्या लायब्ररीत तेच हुडकले आणि ते सापडलेही. आता नेहमीच्या प्रथेने विचार करीत होतो की आता हे झेरॉक्स करून घ्यावे. नातवाला हाताशी धरून घरच्या झेरॉक्स मशीनशी झटापट सुरू करणार तोच नातवाने आजोबांना सल्ला दिला की कशाला झंझट करता, अमेझॉन वर विकतच घ्या, स्वस्त पडेल. आता मला माझ्या नातवाला दाखवायचेच होते की भारतीय कंजूशीने झेरॉक्सच कसे स्वस्त पडते. पण काय आश्चर्य, अमेझॉन वर वापरलेले पुस्तक अवघे एका डॉलरला मिळाले. तिसर्‍या दिवशी पुस्तक ( नवे कोरेच म्हणाना असे ) हातात, शिवाय पाठणावळ माफ होती. मग ह्याच लेखकाची इतर दोन तीन पुस्तकेही अशीच दोन दोन डॉलरला मिळाली. दुर्मिळ पुस्तके व तीहि इतकी स्वस्तात, असा दुप्पट आनंद झाला. अर्थात अमेझॉनवरून भारतात मागवली असती तर नाकापेक्षा मोती जडच झाले असते !

खरे तर आता भारतात आल्यावर इ-बे इंडिया वर अशी दुर्मिळ पुस्तके स्वस्त मिळतात का हे बघायला हवे !

स्वस्त पेक्षाही फुकट बरी असे वाटून मग काही फार अतिप्राचीन पुस्तके गुटेनबर्ग ह्या संकेतस्थळावर जाऊन खाली उतरवून घेतली. त्यात एक ८०० पानी प्लेटोचे "रिपब्लिक" ही घेतले. अगदी चकट फू !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Arunodaya Zala---9

Books and prices

Though I love to buy good books, I don't want to spend much money on them. Especially since I do not read any books for any exam., I want to spend as little on them. I don't mind if these are used ones. Most of the Best Sellers I read in "Pirated Editions". Only drawback in those is , sometimes the ink is little faded and page numbers get jumbled up. But each word in these pirated books is original . An added advantage in reading such pirated editions is you can almost be confident that the book is good because the pirates will not spend their energies on any other book but a sure fire best seller !

Some books are hard to get. I was searching for one such book viz., "Meaning of Art" by Herbert Read. Hence the first thing I searched here was this book. And like last time, I got this rare book, this time too, in Library here. Now I wanted to get it xeroxed, to take it to India and at a nominal cost of xeroxing. With the help of my grandchildren I started tinkering with the xerox machine at home. But my grandson advised to look it up on amazon. Before I could tell him the economy of xeroxing, he said it might be cheaper as a book on amazon. And what a surprise ? I got it as cheap as at 1 Dollar and that too, delivered free. Taking inspiration from this, then I ordered few more rare books of the same author which I got for as little as 2 Dollars. The pleasure of receiving beautiful art at the cost of nothing, is a valuable experience I will cherish throught my visit in America.

While, I was wondering on amazon another website showed me a better deal . I always wanted to read the old classic "Republic" of Plato and I got it down from Gutenberg free of charge. This beats all the pleasures of good rare books and at no cost !


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

No comments:

Post a Comment