परंपरा आणि युरिनोमीटर
------------------------------
मध्ये एका मित्राने मला “मंडालेचा राजबंदी” जे लोकमान्य टिळकांवरचे पुस्तक भेट दिले होते. आपण म्हणतो की लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा निर्माण केली. तर प्रत्यक्ष टिळक रोजच्या वागण्यात काय परंपरा पाळीत असतील ते पुस्तकात शोधावे ह्या दृष्टीने मी ते वाचत होतो.
काळ्या पाण्याच्या शिक्षेत असताना नातेवाईक तेव्हा तुरुंगात येउन भेटणे अशक्यच. त्यांची चौकशी केवळ पत्रानेच व्हायची. त्यातही सेन्सोर वगैरे भानगडी. तर एके ठिकाणी ते चौकशी करतात की त्यांच्या पत्नीची तब्येत कशी आहे ? हे ते मोघम विचारीत नाहीत तर नेमके विचारतात की त्यांच्या लघवीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे ? त्यावर असेही सांगतात की आपल्या माडीवर एक युरिनोमीटर आहे त्याने हे मोजता येईल.
आता आजकाल आपण वैद्यकीय क्षेत्राबाबत एव्हडे चोखंदळ व आपल्याला हे युरिनोमीटर काय आहे हे माहीत नाही ? ज्या मित्राने पुस्तक दिले होते त्याचा भावूच योगायोगाने एका लॅबचा कर्ता होता. त्यालाच विचारले तेव्हा कळले की हे काचेचे छोटेसे उपकरण आहे. ह्यात लघवीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ( १.०० ते १.०३ ) मोजतात. ही वाढलेली असेल तर किडनीज नीट काम करत नाही आहेत ते कळते. ( खाली ह्याची सविस्तर माहिती दिली आहे ).
तर लोकांना गणेशोत्सवाची परंपरा घालून देणारे लोकमान्य स्वतः वैज्ञानिक दृष्टी कसे बाळगून होते हे इथे किती स्पष्ट दिसते ना ?
----------------------------
No comments:
Post a Comment