Monday, August 15, 2016

खाज

-----------------
खाज
-------
सायकोलिग्विंस्टिक्स मध्ये आपण जे शब्द उच्चारतो/मनात आणतो त्याबरोबर मेंदूत जी सिनॅप्सेस ( न्युरॉन्सच्या ठिणग्या ) तयार होतात त्याच्या पॅटर्न्सचा अभ्यास करतात. त्यावरून त्यांनी शोधले आहे की आपण जेव्हा नामे, सर्वनामे, विशेषणे वगैरे उच्चारतो तेव्हापेक्षा जेव्हा क्रियापदे उच्चारतो तेव्हा दाट पॅटर्न्स तयार होतात. त्यावरून वाक्यात क्रियापदांचे दाट महत्व आहे हे सिद्ध होतेच शिवाय क्रिया करण्याकडे व त्याकडे लक्ष देण्याकडे आपले खासे ध्यान असते हे दिसून येते. त्यामुळे सगळ्याच क्रिया करताना आपला मेंदू अति सजग असतो व त्याला त्याची जाणीव असते हे ओघाने आलेच.
तर अशा क्रियांपैकीच एक आहे खाजणे वा खाजवणे. त्वचेच्या आत जे रिसेप्टर्स असतात ते त्वचेवर काय चालले आहे त्याची बातमी मेंदूला पोचवतात व त्यावर काय करायचेय तो निरोप मेंदूकडून दुसरी मज्जा घेऊन येते. त्वचेवर दाब पडणे, तपमान जास्त गरम वा थंड असल्याचे समजणे/भाजणे, जखम झाल्यास त्याची तीव्र वेदना होणे, अशा संवेदना होतात. व त्यावरचे उपायही आपला मेंदू त्वरित करतो. वेदना झाल्यास जिथे वेदना होतेय तो भाग दूर जाण्याची कृती घडते. विस्तवात बोट आले व ते भाजले तर ते आपल्या नकळत विस्तवापासून दूर जाते. त्यामानाने जेव्हा खाज उत्पन्न होते तेव्हा त्यावरच्या शमनासाठी खाजवणे ( स्क्रॅच ) होते. वेदनेपेक्षा खाज आपल्याला कमी दु:खाची किंवा कमी महत्वाची वाटत असली तरी त्यावर दूर सारण्याऐवजी आपल्याला तिथे खाजवूनच शमवावी लागते. म्हणजे उपाययोजनेत जास्त मेहनत मेंदूला घ्यावी लागते अशी असते खाज.
अशा महत्वाच्या संवेदनेला आपण जो शब्द योजतो, खाज, तो तरी कसा हे पाहू. मुळात क पासून बरेच प्रश्नार्थी शब्द आपण करीत असतो. जसे : का, केव्हा, कशाला, कधी वगैरे. त्या क च्या योजनेपेक्षाही जरा जोरकस शब्द आपण त्यात ह ( ह्याला महाप्राण म्हणतात ) मिसळून ख करतो. ख चा अर्थच आपण आकाश असा करतो. म्हणजे खाज ही संवेदना कोणाला आकाशाएवढी वाटावी हे फारच संवेदनशीलतेचे वाटते. शिवाय ज ह्या अक्षराने जन्मणे प्रतीत होते. जसे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला ( कुसुमाग्रज म्हणजे कुसुमच्या आधी जन्मलेला, तिचा मोठा भाऊ ). म्हणजे ह्या शब्दात आकाश आहे व जन्मणेही. ख पासून शब्दकोशात साधारण ७१ क्रियापदे आढळतात ( १) खंकारणे २) खंकाळणे ३) खंगणे ४) खंगाळणे ५) खचणे ६) खटखटणे ७) खंटणे ८) खटपटणे ९) खटारणे १०) खट्याळणे ११) खडखडणे १२) खडकवणे १३) खंडणे १४) खडबडणे १५) खडसणे १६) खडसाविणे १७) खणणे १८) खतावणे १९) खदखदणे २०) खपणे २१) खमकाविणे २२) खरकटणे २३) खरखरणे २४) खरडणे २५) खरवडणे २६) खर्चणे २७) खलबलणे २८) खवखवणे २९) खवणे ३०)खवळणे ३१) खसखसणे ३२) खळखळणे ३३) खाणे ३४) खाकरणे ३५) खाजणे ३६) खाजविणे ३७) खांडणे ३८) खाणणे ३९) खांदणे ४०) खापणे ४१) खारणे ४२) खालणे ४३) खालावणे ४४) खिचणे ४५) खिजविणे ४६) खिसणे ४७) खिळणे ४७) खिळविणे ४८) खुटखुटणे ४९) खुंटणे ५०) खुडखुडणे ५१) खुडणे ५२) खुणाविणे ५३) खुपणे ५४) खुपसणे ५५) खुरडणे ५६) खुरपणे ५७) खुलणे ५८) खुलविणे ५९) खेंकसणे ६०) खेंचणे ६१) खेटणे ६२) खेळणे ६३) खेळविणे ६४) खोकणे ६५) खोचणे ६६) खोडणे ६७) खोदणे ६८) खोलणे ६९) खोवणे ७०) खोळंबणे ७१) खोळंबविणे ). ह्या क्रियांपैकी खाजणे/खाजविणे ही क्रिया जास्त जबरदस्त आहे हे लगेच ओळखू येईल. हे कर्तब ख व ज चेच म्हणायला हवे.
------------------------------
आताशी लोकांना खरूज होत नाही म्हणून खरुजेचे भयंकर स्वरूप लक्षात येत नाही. पूर्वी गोवर, कांजण्या, देवी आलेल्या मुलांना अंगभर भयंकर फोड येत व त्याला इतकी खाज येई की मुले ती खाजविताना फोड फुटून अंगभर इन्फेक्शन होई, ताप येई. त्यावर उपाय म्हणून मुलांच्या हाताभोवती कापड गुंडाळून ठेवावे लागे. आजही बरेच  त्वचारोग हे अति-खाजवण्याने होतात हे कोणीही डॉक्टर सांगील. खाजवण्याच्या वरची पायरी म्हणजे कंड. ह्या शब्दातही पहा ड चा तिरस्कार कसा कारणी येतो. ----( आता म्हणशील, यापेक्षा उकरून काढलेली खाज बरी ! )

Sunday, August 14, 2016

आपल्या भाषेची ठेवण!

आपल्या भाषेची ठेवण !
“शुद्ध-लेखन” का “शूद्ध-लेखन” असा बांका प्रसंग वेळोवेळी येतो. तर ह्याबाबत आपल्या मराठी भाषेची मुळात काय ठेवण आहे ते बघितले तर गंमत वाटेल .
मराठी शब्दकोश “शब्दरत्नाकर” ( ले:वा.गो.आपटे), ज्यात ६०,५५९ शब्द दिले आहेत त्यात खालील प्रमाणे आढळते:
अ पासून सुरू होणारे शब्द : ३१२९
आ पासून सुरू होणारे शब्द : १३७०
इ पासून सुरू होणारे शब्द : २२४;
ई पासून सुरु होणारे शब्द : ३८
उ पासून सुरु होणारे शब्द: १२४८
ऊ पासून सुरु होणारे शब्द : ५३
ए पासून सुरु होणारे शब्द : २८९
ऐ पासून सुरू होणारे शब्द : ६०
ओ पासून सुरू होणारे शब्द : २६८
औ पासून सुरू होणारे शब्द : ६१
अं पासून सुरू होणारे शब्द : ३२२
क पासून सुरू होणारे शब्द : ११५५
का पासून सुरू होणारे शब्द: ७३५
कि पासून सुरू होणारे शब्द : १३६
की पासून सुरू होणारे शब्द : ३८
कु पासून सुरू होणारे शब्द : ५७२
कू पासून सुरून होणारे शब्द : ३०
के पासून सुरू होणारे शब्द : १४०
कै पासून सुरू होणारे शब्द : ३८
को पासून सुरू होणारे शब्द : ३५०
कौ पासून सुरू होणारे शब्द : ४०
कं पासून सुरू होणारे शब्द : १७
ख पासून सुरू होणारे शब्द : ५२५
खा पासून सुरू होणारे शब्द : २८०
खि पासून सुरू होणारे शब्द : ७०
खी पासून सुरू होणारे शब्द : ४
खु पासून सुरू होणारे शब्द : १२५
खू पासून सुरू होणारे शब्द : १४
खे पासून सुरू होणारे शब्द : ७०
खै पासून सुरू होणारे शब्द : १४
खो पासून सुरू होणारे शब्द : १४०
खौ पासून सुरू होणारे शब्द : १
खं पासून सुरू होणारे शब्द : ३२
ग पासून सुरू होणारे शब्द : ५९५
गा पासून सुरू होणारे शब्द : २४५
गि पासून सुरू होणारे शब्द : ७०
गी  पासून सुरू होणारे शब्द : ९
गु पासून सुरू होणारे शब्द : ३१५
गू पासून सुरू होणारे शब्द : २२
गे पासून सुरू होणारे शब्द : ३५
गै पासून सुरू होणारे शब्द : ३५
गो पासून सुरू होणारे शब्द : २६५
गौ पासून सुरू होणारे शब्द : ३२
गं पासून सुरू होणारे शब्द : ४८
घ पासून सुरू होणारे शब्द : २८०
घा पासून सुरू होणारे शब्द : १४०
घि  पासून सुरू होणारे शब्द : ७
घी पासून सुरू होणारे शब्द : ३
घु पासून सुरू होणारे शब्द : ७०
घू पासून सुरू होणारे शब्द : ७
घे पासून सुरू होणारे शब्द : ३०
घै पासून सुरू होणारे शब्द : ०
घो पासून सुरू होणारे शब्द : १२५
घौ पासून सुरू होणारे शब्द : १
घं पासून सुरू होणारे शब्द : ४
च पासून सुरू होणारे शब्द : ५६०
चा पासून सुरू होणारे शब्द : ३००
चि पासून सुरू होणारे शब्द : ३५०
ची  पासून सुरू होणारे शब्द : २०
चु पासून सुरू होणारे शब्द : १६१
चू पासून सुरू होणारे शब्द : २५
चे पासून सुरू होणारे शब्द : ७५
चै पासून सुरू होणारे शब्द : १६
चो पासून सुरू होणारे शब्द : ३१५
चौ पासून सुरू होणारे शब्द : ७५
चं पासून सुरू होणारे शब्द : ५७
छ पासून सुरू होणारे शब्द : १०५
छा पासून सुरू होणारे शब्द : ७०
छि पासून सुरू होणारे शब्द : ३०
छी पासून सुरू होणारे शब्द : १
छु पासून सुरू होणारे शब्द : ८
छू पासून सुरू होणारे शब्द : १
छे पासून सुरू होणारे शब्द : १७
छै पासून सुरू होणारे शब्द : ०
छो पासून सुरू होणारे शब्द : ७
छौ पासून सुरू होणारे शब्द : ०
छं पासून सुरू होणारे शब्द : ५
ज पासून सुरू होणारे शब्द : ५२५
जा पासून सुरू होणारे शब्द : ३१५
जि पासून सुरू होणारे शब्द : १५७
जी पासून सुरू होणारे शब्द : ५१
जु पासून सुरू होणारे शब्द : ८०
जू पासून सुरू होणारे शब्द : ८
जे पासून सुरू होणारे शब्द : ६५
जै पासून सुरू होणारे शब्द : ९
जो पासून सुरू होणारे शब्द : १००
जौ पासून सुरू होणारे शब्द : ४
जं पासून सुरू होणारे शब्द : ४१
झ पासून सुरू होणारे शब्द : १७५
झा पासून सुरू होणारे शब्द : १०५
झि पासून सुरू होणारे शब्द : ४५
झी पासून सुरू होणारे शब्द : ७
झु पासून सुरू होणारे शब्द : ७०
झू पासून सुरू होणारे शब्द : ८
झे पासून सुरू होणारे शब्द : २१
झै पासून सुरू होणारे शब्द : ०
झो पासून सुरू होणारे शब्द : ६०
झौ पासून सुरू होणारे शब्द : ०
झं पासून सुरू होणारे शब्द : ७
ट पासून सुरू होणारे शब्द: १४०
टा पासून सुरू होणारे शब्द : ८५
टि पासून सुरू होणारे शब्द : ६५
टी पासून सुरू होणारे शब्द : ८
टु पासून सुरू होणारे शब्द : २४
टू पासून सुरू होणारे शब्द : ४
टे पासून सुरू होणारे शब्द : ५०
टै पासून सुरू होणारे शब्द : ०
टो पासून सुरू होणारे शब्द : ९०
टौ पासून सुरू होणारे शब्द : ५
टं पासून सुरू होणारे शब्द : १०
ठ पासून सुरू होणारे शब्द : ६५
ठा पासून सुरू होणारे शब्द : ७०
ठि पासून सुरू होणारे शब्द : २५
ठी  पासून सुरू होणारे शब्द : ४
ठु पासून सुरू होणारे शब्द : १९
ठू पासून सुरू होणारे शब्द : १
ठे पासून सुरू होणारे शब्द : ६०
ठै पासून सुरू होणारे शब्द

सुपर संपुर्ण ( संपूर्ण)

सुफल सम्प्रूण ( संपूर्ण )

-------------------------------------

माझ्याकडे काशिनाथ अनंत जोशी ह्यांनी लिहिलेले “संपूर्ण चातुर्मास” हे पुस्तक आहे. त्यावरून मला असे कळले ते असे :

कहाण्या हा आपल्या लोकवाङगमयाचा प्रकार आहे. त्याला अभिजात ललित वाङगमय हा दर्जा मिळतो. हे मौखिक वाङगमय असल्याने ते म्हणण्याचा प्रकार आहे.

कहाण्यांची सुरुवात एक आटपाट नगर होते अशी असते. त्यात आट म्हणजे रुंद व पाट म्हणजे लांब असा अर्थ आहे. आपले पौराणिक वाङगमय हे उत्तरांच्या स्वरूपात असल्याने कोणीतरी प्रश्न विचारला व त्याचे उत्तर दिले असे स्वरूप असते. श्रद्धेने आचरणाऱ्या व्रतात काय फळ मिळते ते कहाण्यांच्या निमित्ताने सांगतात. ज्या कहाण्या नंतर सोयीसाठी संक्षिप्त केलेल्या आहेत त्यांची फलनिष्पत्ती पाच उत्तरात सांगितलेली आहे. त्यामुळे बहुतेक कहाण्यांचा शेवट हा “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्प्रूण ” असा असतो . गणपतीची कहाणी संक्षिप्त केलेली नसल्याने तिचा शेवट “पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्प्रूण ” असेच सांगतात.

सम्प्रूण च्या पुढे कंसात संपूर्ण असे लिहिलेले असते. त्यावरून संपूर्णच बरोबर असावे असे आपण समजतो. लोकांना “संपूर्ण” म्हणणे ( “संप्रूण” पेक्षा ) जास्त सोपे जावे असाच हा उच्चार आहे. तरी मग सम्प्रूण लिहिण्याची पद्धत का केली असावी ?

“एखाद्या पदार्थात पदार्थ विरघळण्याची परिसीमा झालेला द्रव” अशा अर्थाचा एक शब्द आहे “संपृक्त”. कदाचित हे केलेले व्रत व त्याला मिळणारे फळ हे नुसतेच संपूर्ण नव्हे तर संपृक्त असावे असे कोणी कहाणीकाराने म्हणणे हे जास्त लालित्यपूर्ण ठरावे व त्यामुळेच “संपृक्त” अर्थाने संपूर्ण म्हटले गेले असावे. अर्थात हे सगळे मौखिक असल्याने पुरावा दाखवा असे कोणी विचारल्यास ह्याच उत्तरी ते “सम्प्रूण” झाल्याचे समजावे !

----------------------------

दिसणे.... एक प्रोजेक्शन!

दिसणे .....एक प्रोजेक्शन !

----------------------------------------  

मंगेश पाडगावकरांचे एक बालगीत आहे :

-----------------

सगळ्या पऱ्या

शेवटी होतात लठ्ठ

असे म्हणाला एक मठ्ठ

पऱ्यांनी दिला शाप

पुढच्या जन्मी झाला साप !

-------------------  

पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकताना प्रत्येकाचे आपल्या शरीराबद्दलचे काय भान असते ह्याबद्दल एक प्रयोग करून दाखवतात. प्रत्येकाला फरशीवर आपण काय आकाराचे आहोत त्याचे चित्र काढायला सांगतात खडूने. मग त्यावर झोपून पडताळा घ्यायचा की काढलेल्या चित्रापेक्षा आपण लहान आहोत की मोठे ? आपल्या ईगो मुळे बहुतेक सर्वच स्वतःचा आकार मोठाच काढतात असे अनुमान सर्वानुमते निघते.

हे जरी इगोचे कर्तब असले तरी चारचौघासारखे दिसावे असे वाटणे हे काही फार चुकीचे म्हणता येणार नाही. पण...काळा माणूस काळाच दिसतो व ते त्याला त्या त्या समाजाच्या समजुतीने ते खटकते. मी वेस्ट इंडीजला असताना, आमच्या ऑफिसात खूप बाया होत्या व त्या ठार काळ्या होत्या. पण एकीलाही त्याचे वैषम्य नव्हते. कारण तिथे “हम काले  है तो क्या हुवा...” हे वाटणे आता खूपच सामाजिक झाले आहे. पण आपण काळे आहोत ही खंत जाता जात नाही हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. मग ही खंत जाते कशी ?

स्वर्गाचे वर्णन करणाऱ्या एका कादंबरीत असे कल्पिले होते की तुम्हाला ज्याला पहायचे आहे त्याची इच्छा असली तरच तुम्ही त्याला दिसू शकाल व तो तुम्हाला दिसेल. व असे म्हटले होते की शरीर हे शेवटी तुमच्या आत्म्याचे प्रोजेक्शन आहे. तुम्ही प्रोजेक्ट कराल तेव्हा दिसेल. आपले शरीर जेव्हा पाहण्यासारखे नसते तेव्हा ते प्रोजेक्टच करू नये असे आपल्याला वाटत असते. ते दिसूच नये असे वाटण्यासाठी काय करावे ?

तर दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीचा ध्यास घ्यावा. अगदी वेड्यासारखा. आणि हे वेड इतके ताणावे की दिसणे अगदी खिजगणतीतही येउ नये ! मग आपण आपल्याला दिसणार नाही !

---------------------------

सुपर संपुर्ण ( संपूर्ण)

सुफल सम्प्रूण ( संपूर्ण )

-------------------------------------

माझ्याकडे काशिनाथ अनंत जोशी ह्यांनी लिहिलेले “संपूर्ण चातुर्मास” हे पुस्तक आहे. त्यावरून मला असे कळले ते असे :

कहाण्या हा आपल्या लोकवाङगमयाचा प्रकार आहे. त्याला अभिजात ललित वाङगमय हा दर्जा मिळतो. हे मौखिक वाङगमय असल्याने ते म्हणण्याचा प्रकार आहे.

कहाण्यांची सुरुवात एक आटपाट नगर होते अशी असते. त्यात आट म्हणजे रुंद व पाट म्हणजे लांब असा अर्थ आहे. आपले पौराणिक वाङगमय हे उत्तरांच्या स्वरूपात असल्याने कोणीतरी प्रश्न विचारला व त्याचे उत्तर दिले असे स्वरूप असते. श्रद्धेने आचरणाऱ्या व्रतात काय फळ मिळते ते कहाण्यांच्या निमित्ताने सांगतात. ज्या कहाण्या नंतर सोयीसाठी संक्षिप्त केलेल्या आहेत त्यांची फलनिष्पत्ती पाच उत्तरात सांगितलेली आहे. त्यामुळे बहुतेक कहाण्यांचा शेवट हा “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्प्रूण ” असा असतो . गणपतीची कहाणी संक्षिप्त केलेली नसल्याने तिचा शेवट “पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्प्रूण ” असेच सांगतात.

सम्प्रूण च्या पुढे कंसात संपूर्ण असे लिहिलेले असते. त्यावरून संपूर्णच बरोबर असावे असे आपण समजतो. लोकांना “संपूर्ण” म्हणणे ( “संप्रूण” पेक्षा ) जास्त सोपे जावे असाच हा उच्चार आहे. तरी मग सम्प्रूण लिहिण्याची पद्धत का केली असावी ?

“एखाद्या पदार्थात पदार्थ विरघळण्याची परिसीमा झालेला द्रव” अशा अर्थाचा एक शब्द आहे “संपृक्त”. कदाचित हे केलेले व्रत व त्याला मिळणारे फळ हे नुसतेच संपूर्ण नव्हे तर संपृक्त असावे असे कोणी कहाणीकाराने म्हणणे हे जास्त लालित्यपूर्ण ठरावे व त्यामुळेच “संपृक्त” अर्थाने संपूर्ण म्हटले गेले असावे. अर्थात हे सगळे मौखिक असल्याने पुरावा दाखवा असे कोणी विचारल्यास ह्याच उत्तरी ते “सम्प्रूण” झाल्याचे समजावे !

----------------------------

निरागस

निरागस

निरागस म्हणजे इनोसेंट !

इनोसेंट-पणात राग नसण्यापेक्षा एक असे लहानपणाचे वैशिष्ट्य असते की ज्यात मोठ्या माणसांच्या छद्मीपणा ऐवजी, तोंड-देखलेपणा ऐवजी सहज सुंदर भाव असतो. ते कसे नुकते उमललेले त्यावर कसलेही रोपण न केलेले सहज असे दिसणे असते.

म्हणून निरागस ह्या शब्दाची फोड नि + रागस अशी न देता संस्कृत कोशात निर् + आगस अथवा निर् + आगम अशी देतात. आता आगसणे ह्या शब्दाचा मराठी शब्दकोशातला अर्थ आहे पक्व होणे. म्हणजे निरागस म्हणजे पक्व होण्या अगोदरची अवस्था, जी लहान मुलांप्रमाणे असते, असे होते.

सुरांमध्ये सूर निर्भेळ, पक्का, दुसऱ्या कोणत्याही सुरांचा परिणाम न झालेला असा लागणे, हे फार महत्वाचे मानतात व म्हणूनच जेव्हा “सूर निरागस हो” असे कोणी म्हणतो तेव्हा केवळ निखळपणाचे ते मागणे असते !

-------------------------

Friday, August 12, 2016

वेडेपणा आणि सर्जकता

वेडेपण आणि सर्जकता

आजच्या युगात सर्वमान्य झालेले सर्जकतेचे माप म्हणजे आयफोन ! आणि त्याचा जनक आहे स्टीव जॉब ! तसेच त्याच्या बरोबर असलेले मित्र !

त्याने सर्जकतेसाठी हर प्रयत्न केले होते, ज्यात अगदी ड्रग्ज घेणे सुद्धा आले. त्याच्या आयुष्यात शेवटी शेवटी त्याचा एक सहकारी वेडा झालेला होता व रस्त्यात भटके. त्याने एकदा कोणाच्या घरावर दगडं मारले म्हणून त्याला अटक झाली होती. त्याची ही अवस्था पाहून स्टीव्हचे इतर मित्र त्याच्याकडे आले व म्हणाले की तसे आपण सगळेच वेडे आहोत. पण ह्याला असे पोलिसांनी पकडावे डांबावे हे काही चांगले नाही, तरी तू तुझे वजन वापरून त्याला सोडव. स्टीव्हने त्यावर एक दिवस विचार केला व शेवटी तो त्याला सोडवून घरी घेवून आला.

आजच्याच पेपरात एका युनिव्हार्सिटीतले संशोधन आले आहे की सर्जकतेच्या पलीकडे जावून ज्यांनी समुदायांना प्रवृत्त केले असे पुढारी जसे अब्राहम लिंकन, मार्टिन लुथर किंग, महात्मा गांधी, चर्चिल वगैरे पुढारी हे त्यांना भावना-विकार असलेले होते !

म्हणजे वेडेपण नुसतीच सर्जकता नाही तर पुढच्या वाटाही दाखवते !

--------------------