-------------------------------------------------------------------------------------
अरुणोदय झाला---२१
हे असे करावे का ?
परवा पार्ल्याला एका भाषणादरम्यान मी श्री. भालचंद्र नेमाडेंवर एक आक्षेप घेतला की तुम्ही "हिंदू" चांगली खपावी म्हणून त्यात ब्राह्मणद्वेष पेरला आहे, संतांची टर उडविली आहे. त्यावर ते म्हणाले की अहो, मराठी पुस्तक खपून खपून किती खपणार व त्याच्या रॉयल्टीमधून असे किती मिळणार ? माझी सध्याची मिळणारी शिष्यवृत्तीच मुळी महिना ७० हजाराची आहे. तुम्हाला जर पुस्तक आवडले नसेल तर परत घेऊन या, मी पैसे परत देईन.
ज्या पुस्तकाचा एवढा गाजावाजा झाला, त्याच्या लेखकालाच जर त्यातून म्हणावे तितके पैसे मिळत नसतील, तर जे इतर हौशी लेखक असतात त्यांचे तर पुस्तकामागे स्वत:चेच पैसे जात असणार हे उघड आहे. जर लेखकाला पैसे मिळणे दुरापास्त असेल तर मग इतके लोक पुस्तके का काढतात, ती का छापतात, ती का विकतात ? लोकांनी आपण जे लिहिले आहे ते वाचावे त्याची प्रशंसा करावी हाच त्यांचा मुख्य हेतू असायला हवा.
मी अजूनही पायरेटेड पुस्तके हमखास घेतो. अगदी त्यांचे छुपे अड्डे असतात तिथे जाऊन घेतो. त्यात एक फायदा असा असतो की पुस्तक हमखास चांगले असते. वाईट पुस्तकासाठी पायरसी करण्याचे कोण अकारण कष्ट करणार ? आणि त्याच मजकूराचे किती कमी पैसे मोजावे लागतात, वाचण्यासाठी . जे इंग्रजी पुस्तक चारशेला घ्यायचे ते पायरेटेड मध्ये शंभरात मिळते. मुळात पुस्तके इतकी महाग का असावीत ? म्हणतात की पुस्तकाचा जेव्हढा खर्च येतो त्याच्या पाचपट विक्रीची किंमत ठेवावी लागते. पण लोकांनी वाचावे अशी लेखकाची प्रबळ इच्छा असते, तर प्रकाशकांनी किंमत ज्यास्त ठेवल्याने ती वाचू नयेत हा परिणाम/हकीकत होतो. मला प्रथम चेतन भगत त्याच्या भाषेसाठी नाही तर त्याच्या पुस्तके ९० रुपायात देण्यामुळे आवडला होता ( रूपा प्रकाशन, दिल्ली ). मी डॉ.नरेंद्र जाधवांच्या "आम्ही आणि आमचा बाप" ह्या पुस्तकाला प्रथम मानले ते, ते त्याच्या एकमेव पायरेटेड मराठी पुस्तक असल्याने. नंतर ग्रंथालीने त्याची जन-आवृत्ती अवघ्या ६० रुपायात काढली, तेही मला खूप भावले.
आता तर मला संगणकावर हवे ते नवे, जुने, पुस्तक फुकटच मिळवायचा नाद लागलाय. एक संकेत-स्थळ आहे : गटेनबर्ग.कॉम नावाचे. ह्यावर इंग्रजीतली लाखो पुस्तके फुकट उतरवून घेण्यासाठी आहेत. मेल्यानंतर ६०/७० वर्षांनी कोणत्याही लेखकाचे पुस्तक कोणीही, (कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन न करता), हे करू शकतो. आजकाल मराठीतही अशी पुस्तके संगणकावर फुकट मिळतात. अजून एक फारसे माहीत नसलेले एक संकेत-स्थळ आहे : लायब्ररी.एन्यू नावाचे. हे अमेरिकेतल्या एका विद्यापीठाचे स्थळ आहे. ह्याला लोक आपल्याकडची पुस्तके संगणकावरून पाठवतात व ती आपण फुकट उतरवून घेऊ शकतो. कितीतरी नवी कोरी, ताजी पुस्तके मी त्यातून घेतलेली आहेत.
आता आपले मराठी मन धास्तावायला सुरुवात होईल. हे बेकायदेशीर तर नाही ? हे करावे का ? तर ह्यावरचे "फेअर यूज" नावाचे एक कायद्याचे पुस्तक मी त्याच संकेतस्थळावरून ( फुकटच !) उतरवून घेतले. टीका, अभ्यास, प्रसार-माध्यमात मत मांडणे ह्या सर्व प्रकारासाठी कायदेशीर मुभा आहे असे हे पुस्तक सांगते. अमेरिकेत, विशेषत: गाण्यांसाठी, ह्यावर खूप खटले झालेत. शेवटी जी संकेत-स्थळे ही गाणी ठेवतात त्यांनाही वेठीस धरण्यात आले. आठ-दहा वर्षांच्या पोरांसोरांवरही खटले केले, प्रकाशक कंपन्यांनी. पण आजकाल हा प्रकार इतका बोकाळलाय की कायदेशीर काहीच कारवाई संभवनीय होत नाही. मजकूर नुस्ता उपलब्ध करून देणे हा काही गुन्हा होत नाही. शिवाय ह्यातून संकेतस्थळांना काही धंदा होत नाही. उलट साहित्याचा प्रसार करण्याचे उच्च कोटीचे काम आपसुक होते. एक डिजिटल कॅमेरा (किंवा मोबाईल) असेल तर फुकटात पुस्तकाची चित्रे ( सर्व पानांची ) काढून ती सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतात.
मला खूप दिवसांपासून विंदा करंदीकरांचे "एरिस्टॉटलचे काव्यशास्त्र" हे पुस्तक वाचायचे होते. मौजेचे प्रकाशन. कुठे मिळाले नाही. आयाआयटीतल्या काही विद्यार्थ्यांना हे पुस्तक अभ्यासासाठी हवे होते. त्यांना एक प्रत मिळाली. त्याची त्यांनी झेरॉक्स केली व त्याचबरोबर दोनशे रुपायात पीडीएफ फाइल झाली, जी आम्ही चारपाच जणांनी वाटून घेतली, तर केवळ ५० रुपायात पुस्तक पडले. आता मी हे एखाद्या संकेतस्थळावर ठेवले तर हजारो जण ते उतरवून घेऊ शकतील, फुकटात. कायद्याने पाहिले तर हे सगळे बेकायदेशीरच वाटेल . पण, श्रीपु किंवा सध्याचे मौजेचे मालक ह्यावर केस करण्यापेक्षा वाचणार्यांना प्रोत्साहन म्हणून धन्यवादच देतील. विंदांनीही हरकत घेतली नसती. ( आणि हे पुस्तक वाचून माझा असा काय धंदा झाला बरे ? ).
म्हणतात की जेव्हा चहा भारतात विकायला सुरुवात केली तेव्हा तो कोणी विशेष खरेदी करीत नसत. मग गावोगाव माणसे पगारी नेमली, जी त्या त्या ठिकाणी चहा बनवीत व लोकांना फुकट प्यायला देत. कालांतराने लोक चहानशीन झाले व चहाचा धंदा फळफळला. सध्याचा मराठी लेखक हा लेखनाच्या उत्पन्नावर जगूच शकत नाही, इतके ते नगण्य असते. तो अथवा त्याच्या प्रकाशकाला १०० ( समजा ) इंटरनेटवरून फुकटात पुस्तके घेणार्यांविरुद्ध खटले भरायचे म्हटले तर केव्हढा द्राविडी प्राणायाम ! त्यापेक्षा तो पुस्तक वाचणार्याला धन्यवादच देईल.
आणि मार्केटही हळू हळू बदलते आहे. वर्तमानपत्रे, मासिके, एरव्ही आपल्याला कोणी मोफत देत नाहीत . पण इंटरनेटवर हवे ते फुकट वाचता येते, उतरवून घेता येते. उलट त्यामुळे त्यांचा खप वाढतोच असे दिसून येते. आजकाल तर अमेरिकेत पुस्तक (रिलीज) प्रकाशित करताना त्याचबरोबर त्याची ई-बुक आवृत्तीही प्रकाशित करतात, ज्यामुळे छापील पुस्तक ज्यास्त खपते. फुकटात हे मिळाल्याने प्रकाशकाचा जर खर्चच होत नसेल व म्हणून नुकसान होत नसेल तर वाईट काय तर फक्त लेखकाची रॉयल्टी तेव्हढी बुडते. पण किती असते रॉयल्टी ? माझ्या वडिलांची पाच सहा पुस्तके (अगदी मौजेची ) होती. पण रॉयल्टी यायची अवघी १२३रु.५० पैसे. त्यांचे वाचणार्याला ती त्यांनी नक्कीच माफ केली असती .
हे असे करावे का ?
-------------------------------------------------------------------------------------
Tuesday, May 31, 2011
Tuesday, May 3, 2011
अरुणोदय झाला----२०
कवी का गीतकार ?
आपल्याकडे फारा दिवसांपासून एक वाद आहे की ग.दि.मा. वा जगदीश खेबुडकर ह्यांना कवी म्हणायचे की गीतकार ? कोण मोठा ? कवी का गीतकार ?
भाषाशास्त्रात "रेजिस्टर ऑफ लॅंग्वेज" नावाचा एक शैलीप्रकार आहे. जसे: समजा आपण कोणाला प्रेमपत्र लिहितो आहे तर त्याची भाषाशैली अगदीच वेगळी, मृदू, मुलायम, रोमॅंटिक, खाजगी अशी असते. आणि समजा एक वकील एक नोटीस लिहितो आहे, तर त्याच्यातली भाषाशैली ही खासच थेट वळणाची, नेमकी व कोरडी असते. आता कादंबरी, लघुकथा, कविता, गीते, निबंध, लघु-निबंध, संशोधनपर निबंध वगैरे साहित्याचे वेगवेगळे वाण आपण पाहतो. प्रत्येकाची शैली ही खास वेगळीच असते व ती त्या त्या वाङमयप्रकाराला साजेशीच असते, असावी लागते. ह्या पैकी आजच्या वादाला घेऊ : कविता आणि गीते.
गीते अर्थातच, गेय असावी लागतात. अर्थात एक अपवाद म्हणून कधी कधी अजिबात न गाता येणारी गीतेही गाजून जातात. पण ते अपवादच. ( वेस्ट-इंडीज येथे कॅलिप्सो गाण्यांची परंपरा आहे. दरवर्षी कार्निव्हलला स्पर्धा आयोजून ते एक कॅलिप्सो-किंग व कॅलिप्सो-क्वीन निवडतात. त्या गाण्यात एक चायनीज माणूस एक विचित्र गाणे, जे अजिबात गाता येत नव्हते, गायला. त्याला चायनीज कॅलिप्सो-किंग म्हणत लोकांनी प्रचंड हास्यकल्लोळ केला. गाता न येणारं गीत हा तसा विनोदच ! ). गीतात गेयतेसाठी छोटे छोटे शब्द, सोपा अर्थ असलेले शब्द, आणि यमके, अनुप्रास, असे आवाजी अलंकार ह्यांचे प्राबल्य असते. कित्येकवेळा केवळ गीतासाठी काही विचित्र आवाज असलेले शब्दही योजतात. जसे: किशोरकुमारचे डुडलींग--डिडली ए---या--हू--वगैरे. गीतांची योजना सिनेमात वा भावगीतात एक प्रकारचा मूड, भाव, वातावरण, निर्माण करण्यासाठी असते. त्यामुळे त्यात अगम्य शब्द, अर्थ न निघणारे शब्द, असून चालत नाही. शिवाय काही काही कठोर आवाजाचे शब्द वापरता येत नाहीत. वीरश्रीची गीते असतील तर त्यात वेगळेच साहस निर्माण करणारे शब्द वापरावे लागतात.
त्या मानाने कवितेला काही बंधने नसतात. कविता कशीही करू शकता. पूर्वी वृत्तात कविता करणे आवश्यक असे. किंवा भक्तिभावाच्या कविता अभंग वा ओवी ह्या वृत्तातच असत. आजकाल असे काही बंधन नसते. आजकाल बहुतेक कवितेचा मामला हा मुक्तछंदात कुठल्याही निर्बंधाविना असतो. शिवाय कवितेचा अर्थ समजलाच पाहिजे असे बंधनही नसते. किंबहुना जेवढी कविता दुर्बोध तेवढा तिचा दर्जा चांगला, असा सामान्यांचा संशय असतो. कवितेला मूड, भाव, वातावरण निर्मिती वगैरेचेही उत्तरदायीत्व नसते. कविता फक्त असावी लागते. कशी का असेना. ह्या वर्णनावरून सगळी गीते ही कविता ह्या प्रकारात मोडू शकतात पण सगळ्या कविता गीतात घेता येत नाहीत. काही मोजक्याच कवितांना गीतेही म्हणता येईल.
संगीतकाराच्या चाली बरहुकूम, ताल-लयाला धरून, गीते लिहिणे, हे सर्जन प्रक्रियेत खूपच कसबाचे काम आहे. त्यामानाने कविता जन्माला घालणे हे फारच सोपे काम असते. ( म्हणूनच कुठल्याही साहित्य-संमेलनात कवी व काव्य-वाचनवाले प्रचंड प्रमाणात असतात, दुसर्या कुठल्याही साहित्यप्रकाराच्या तुलनेत.). ते सगळ्यांनाच जमणे फार अवघड. तसेच गीते समजणे, त्यांचे रसग्रहण करणे हे जरा कौशल्याचे काम आहे. गेयतेचे अंग सगळ्याच ऐकणार्यांना असते, असे नाही. बहुसंख्यांना त्यात फारसे गम्य नसते.
साहित्याचे प्रयोजन तुम्हाला अभिव्यक्ती करू देण्याचे असते. तुम्ही तुम्हाला काय वाटते ते लिहू शकाल, ते साहित्य. गीते लिहिणे हे खूपच कसबाचे व कठिण काम खरेच, पण ते एका विशिष्ट हेतूपायी योजलेले सर्जन असते. ते कविते सारखे सहजी स्फुरलेले व सर्जकाला मुभा देणारे असत नाही. त्यामुळे ते अटी-तटी-चेच ठरवण्याचा सामान्यांचा कल असतो. पूर्वी मात्रा-वृत्तात कविता लिहिणे हे सर्जनापेक्षा कसबाला वाव देणारे असे. म्हणूनच ते आता बाद करण्यात आले आहे. चित्रकलेत सुद्धा हुबेहुब रेखाटण, हे ज्यास्त कुसरीचे काम आहे, ते दिसायलाही मोहक असते. पण आजकालच्या आधुनिक चित्रकलेत म्हणूनच त्याला मानाचे स्थान देत नाहीत. आडव्या-तिडव्या रेघा, रंगांचे वाट्टेल तसे पुंजके व मन मानेल तो विषय ( तोही समजेलच असा काही नेम नाही ), असे आजकालच्या चित्रकलेचे झाले आहे. ह्याच कला मुळे ( ट्रेंड ह्या अर्थी ), साहित्यात बंधने असलेले अविष्कार, आजकाल मान्यता पावत नाहीत. हे इतके टोकाला जाते की वाचकाला कधी कधी एखाद्या कलाकृतीला कथा म्हणावे, निबंध म्हणावे, का कादंबरी म्हणावे असा संभ्रम पडू शकतो.( जसे श्याम मनोहर यांच्या कादंबर्या ). पण ज्यांच्याकडे साहित्याची व्यवस्था सोपविलेली असते त्यांना ह्या संभ्रमापेक्षा सर्जकांच्या मुक्त आविष्काराचे ज्यास्त अप्रूप असते व महत्वही असते व त्याचीच तळी ते उचलून धरतात. ते त्यांच्या सोयीचे असते.
पण सुदैवाने साहित्य हा प्रकार अजून तरी कोणा एका गटाकडे गेलेला नाहीय. त्यामुळे आपल्याला वाखाणायचे तर आपण एखाद्या गीतकाराला अप्रतीम कवी म्हणू शकतो व तसा सन्मानही देऊ शकतो. तो तसा ग.दि.माडगूळकर व जगदीश खेबुडकर ह्यांना रसिकांनी दिलेला आहेच. साहित्याचे शास्त्र गुंडाळून ठेवून ! तर काय हे दोघेही फार मोठे गीतकार व कवी आहेतच !
--------------------------------------------------------------------------------------

Saturday, April 9, 2011
अरुणोदय झाला----१९
लिंगाचे बिंग
ह्या २०११ च्या जनगणनेत दर १००० पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, त्याचे आकडे आले आहेत. त्यात भारताची सरासरी आहे दर १००० मागे ९४० स्त्रिया. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण आहे दर १००० मागे ९२५ स्त्रिया . म्हणजे मराठी स्त्रिया, पुरुषांपेक्षा संख्येने इतक्या कमी आहेत. अमेरिकेत ह्या उलट ह्या वर्षी हा आकडा आहे १०२५. म्हणजे पुरुषांपेक्षा कितीतरी ज्यास्त.
मराठी भाषेत पुरुषवाचक शब्द किती व स्त्रीवाचक शब्द किती असे कोणी अजून मोजून पाहिलेले नाही. शब्दकोशात प्रत्येक शब्दाचे तो पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक, अशी नोंद कंसात दिलेली असते. जसे : १) सळ ( पु ): तलवारीचे म्यान; तिच्या मुठीला अडकवण्याची दोरी; घडीचा मोड, दुमड , सोन्याची लगड, पीक कापल्यानंतर उरणारा बुडखा २) सळई ( स्त्री ) : शलाका ; धातूची बारीक काडी; गणना करताना संख्या समजण्यासाठी काढून ठेवलेला भाग; लोखंडाचे कडे बसविल्यावाचून असलेले मुसळाचे लाकूड; जनानी मुकट्यावरच्या उभ्या रेघा.
वा.गो.आपटयांच्या "शब्दरत्नाकर" ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत, पैकी स पासून सुरू होणार्या शब्दांचा गट हा सगळ्यात मोठा असून त्यात ५८८८ शब्द आहेत. आता ह्यापैकी पुरुषवाचक व स्त्रीवाचक शब्द मोजले ( एक मोठा नमुना म्हणून ) तर ते भरतात: पुरुषवाचक : १३३९ तर स्त्रीवाचक : ९३६. आता लिंगभेद जसा दर १०००वर मोजतात तसे स्त्रीवाचक शब्दांचे प्रमाण काढले तर ते भरते : दर १००० पुरुषवाचक शब्दांमागे : ६९९ स्त्रीवाचक शब्द. नशीब आपल्या भाषेचे नाव "मराठी" हे स्त्रीवाचक आहे व "भाषा" हेही स्त्रीवाचक आहे. तरीही स्त्रीवाचक शब्द ( हा मात्र पुरुषवाचक) असे कमी आहेत.
कधी कधी वाटते की शब्दकोशात काय, शब्द असतात भरपूर, पण आपण वापरतो त्यातले मोजकेच. तर मग त्यापैकी आपण किती पुरुषवाचक वापरतो व किती स्त्रीवाचक वापरतो हे रॅंडमली पहावे तर असे आढळून आले:
मंगला गोडबोले : पुस्तक "आडवळण"( पृ.३३ )--पु:३६;स्त्री:१९ ( दर १००० मागे ५२७ स्त्रीवाचक शब्द )
शांता शेळके : पुस्तक "सांगावेसे वाटले म्हणून" ( पृ.५७ ) पु:४३;स्त्री:२० ( दर १००० मागे ४५६ स्त्रीवाचक शब्द )
अशोक रा. केळकर : पुस्तक "वैखरी" ( पृ.९२ ) पु: २०; स्त्री: ५० ( दर १००० मागे २५०० स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "तुकाराम गाथा" ( पृ.११ ): पु: ८३; स्त्री: २२ ( दर १००० मागे २६५ स्त्रीवाचक शब्द )
भालचंद्र नेमाडे : पुस्तक "टीकास्वयंवर" ( पृ.३४ ) : पु: २६; स्त्री: २४ ( दर १००० मागे ९२३ स्त्रीवाचक शब्द )
ज्ञानेश्वर नाडकर्णी: पुस्तक "अश्वत्थाची सळसळ" ( पृ.३५ ) पु:२३; स्त्री: २३ ( दर १००० मागे १००० स्त्रीवाचक शब्द )
एक केळकरांचा अपवाद वगळला, तर स्त्रीवाचक शब्द आपण कितीतरी कमी वापरतो असे दिसते.
संपत्तीदर्शक, मालमत्तादर्शक असे शब्द जमा केले व त्यात स्त्रीवाचक किती हे पाहिले तर चित्र असे दिसते : खालील ७७ शब्दात पुरुषवाचक आहेत: १७, तर स्त्रीवाचक आहेत: ३७ ( नपुसक : २२) ( माल, संपत्ती, स्थावर, मिळकत, पैसा, रोकड, धन, मालमत्ता, वित्त, बंगला, गाडी, जमीन, शेती, शेत, प्लॉट, भूखंड, फ्लॅट, सदनिका, बॅंक, नोट, चिल्लर, कपडे, दागिने, अलंकार, सोने, वळी, हार, अंगठी, पाटली, बांगडी, जमा, फर्निचर, हिरा, चांदी, माणिक, मोती, कोठार, रत्न, वाडा, बंगली, देवडी, वस्त्र, मेजवानी, जहागीर, मोहरा, सिक्के, गोधन, स्त्रीधन, घर, शेअर्स, गुंतवणूक, भांडवल, पत, नगद, मान/मरातब, श्रीमंती/गरीबी, गडगंज, विपुल/ता, वाडी, कंपनी, उद्योग, उद्योगपती, उद्योजिका, खाते, आंदण, बक्षीस/सी, भेट, आहेर, मानपान, पगडी, जमा/डिपॉझिट, लाच/लुचपत, वास्तू, महाग, महागाई, दान, दाता )
लिंगाचे बिंग असे उघडे पडते, मराठी भाषेत !
---------------------------------------------------------------------------------------

Sunday, March 13, 2011
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुणोदय झाला----१७
सु-संस्कृत मराठी माणूस !
परवा म.टा.त अवधूत परळकरांचे एक पत्र आले. त्यात त्यांनी जनगणनेत, मला संस्कृत भाषा येते, असे नोंदवण्याविरुद्ध मत दिले आहे. त्यांचे म्हणणे की ते संस्कृत शिकले असले तरी आता बोलू शकत नाहीत, त्यामुळे संस्कृत भाषा येते, असे नोंदवणे त्यांना फसवणूकीचे वाटते. तर ही खरेच फसवणूक का भाषा-व्यवहाराबद्दलचे अज्ञान, गैरसमज ?
मेंगलोरी माणसे तुळू बोलतात, पण तुळू ला स्वत:ची लिपी नाही. काही जण कन्नड वापरतात तर काही तेलुगु. लोक तुळू बोलतात पण कित्येक ती वाचू शकत नाहीत. मग ती भाषा आहे की नाही ?
अमेरिकेतली पुढची पिढी आणि इथल्या संगणकवाल्यांचीही, अर्थातच मराठी बोलू शकत नाही. पण तिन्ही सांजा झाल्या की तिथेही बहुतेक मराठी घरातून "शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा..." ही प्रार्थना मुले हमखास म्हणतात. महाराष्ट्रात तर ज्यास्तच प्रमाणात हे म्हटल्या जाते. त्याशिवाय "शांताकारं भुजगशयनं..." हेही म्हणतात. हे सर्व संस्कृत आहे हेही कित्येकांना माहीत नसते. आपल्याला "जन गण मन..." ह्या राष्ट्रगीताशिवाय "वंदे मातरमं, सुजलां सुफलां, मलयज शीतलां...." हे गीत म्हणता येतेच. हे तर राष्ट्रगीतच होणार होते. भारताच्या पैशावर अशोक स्तंभाखाली व नाण्यांवर आपण लिहितो "सत्यमेव जयते". लग्नात आपण म्हणतो, "कुर्यात सदा मंगलम.." आशिर्वाद देताना "अष्ट पुत्रा सौभाग्यवती भव" म्हणतो. कित्येक मुले "रामरक्षा " म्हणतात, जी संस्कृतात आहे. "अर्थ-संकल्प, विद्यापीठ, ज्ञानपीठ, चांद्रयान, वृद्धाश्रम, प्राचार्य, ..." ही सगळी मानाची नावं, पदं, संस्कृतातली आहेत.
ज्ञानेश्वरी, तुकाराम-गाथा, वगैरे टिकलेले संत-साहित्य हे लोकांनी म्हटले, पाठ केले, पारायणं केली म्हणूनच टिकली आहेत. आज कुठल्याही मान्यवर लेखकाचे साहित्य त्याच्या हयातीत, वा फार तर, एका शतकात, विस्मरणात जाते. कारण त्याचे कोणी पारायणं करीत नाही. कित्येक संस्कृत म्हणी, सुभाषिते, मराठी साहित्यात इतक्या अंगवळणाच्या झाल्या आहेत की त्या मराठीच आहेत असे आपण समजतो. जसे: शुभस्य शीघ्रमं, शुभास्ते पंथानां, चक्षुर्वै सत्यम, तमसो मा ज्योतिर्गमया..., त्वमेव माता च पिता त्वमेव..., वक्रतुंड महाकाय..., यथा राजा तथा प्रजा...,सदरक्षणाय खलनिग्रहणाय ( पोलीसांचे ब्रीद-वाक्य ), अहिंसा परमो धर्म:..,यथा काष्ठं च काष्ठं च...., अतिपरिचयाद अवज्ञा, जीवेत शरद शतम, पिंडे पिंडे मति भिन्न:, वगैरे.
प्रसिद्ध भाषाशास्त्री श्री.अशोक केळकर त्यांच्या "रुजुवात" ह्या पुस्तकात म्हणतात की वाणीचे तीन प्रकार असतात, बोलणे, म्हणणे आणि गाणे. त्यात ते असेही म्हणतात की म्हणणे हे बोलण्यातच मोडते. हे आपल्याला सहजी ध्यानात येत नाही. जसे समजा आपण पोलीस आहोत व हिंदी सिनेमातल्यासारखे आपल्याला म्हणायचेय "कानून के हाथ बडे लंबे होते है" आणि त्या ऐवजी आपण पोलिसांचे ब्रीदवाक्य जर म्हणालो ( सदरक्षणाय, खल निग्रहाणाय ) तर आपण असेच बोललो की पोलीस हे सज्जनांची रक्षा करतात तर खळांना/दुष्टांना नियंत्रणात ठेवतात.. तर हे संस्कृतात म्हणणे म्हणजे एक प्रकारचे बोलणेच होते. किंवा आपल्याला म्हणायचेय की तुम्ही कितीही बनवाबनवी करा शेवटी विजय हा सत्याचाच होणार. हेच म्हणण्यासाठी जर आपण संस्कृत वचन म्हटले की, सत्यमेव जयते, तर आपण हेच तर बोललो असे झाले की नाही. मग झाले की, मला तर संस्कृत बोलता येते हे सहजी दिसून येते.
एवढे आपण जर संस्कृत प्रत्यक्षात म्हणत असूत तर, तुम्ही नोंदवा अथवा न नोंदवा, तुम्ही सु-संस्कृत म्हणूनच गणल्या जाणार व संस्कृत तगणारच !. नोंदवल्यास न जाणो, पुढे कोणाला सदबुद्धी झाली तर, संस्कृत भाषेसाठी अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळायचा . मग कोणा सु-संस्कृत राजकारण्याला "भ्रष्टाचार" ह्या मूळ संस्कृत शब्दाचे आचरण करावे लागायचे !
----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, March 3, 2011
अरुणोदय झाला----१६
ऐका हो ऐका ! भाषेचे मूळ !
माणसाकडे पाहणे, ऐकणे-बोलणे, स्पर्शणे, चाखणे व वास घेणे, एवढया संवेदना होत्या. ह्यापैकी त्याला एखाद्या संवेदनेची, भाषेसाठी म्हणजे एकमेकांशी संदेशवहनासाठी, निवड करायची होती. ह्यात चाखणे आणि स्पर्शणे ह्या अवगत असलेल्या संवेदना अर्थातच पहिल्याच फेरीत बाद होतात. अर्थात आंधळ्या माणसांसाठी मग स्पर्शाने ओळखायची ब्रेल लिपी वापरण्यात आली खरी, पण भाषा मात्र तो बोलत असेल तीच उच्चारांवरून बोलली गेली. कुत्र्यांच्या भाषेत माणूस चांगला की वाईट ते बहुतेक चाटूनच, वा वासावरून वाचतात. तसे आपण मात्र करू गेलो तर हास्यास्पद होईल. जमणार तर नाहीच. ( शिवाय चाखूनच ठरवायचे तर चांगले पदार्थ पटकन संपून गेले असते, व उरला असता सर्वत्र कडवटपणा व दुर्गंध ! ).
पाहण्याचे आपल्या संवेदनात फार प्राबल्य आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहात नाही तोवर पटतही नाही. एवढेच काय सत्याच्या प्रकारामध्येही सर्वात उच्च कोटीचे सत्य म्हणजे "चक्षुर्वै सत्यम"! आपल्याला सर्व दिसायला चांगले असावे लागते. "आय विटनेस" असला तर नक्कीच खुन्याला फाशी ! एवढा पाहण्या-दिसण्याचा दरारा ! पण वृद्धापकाळी दिसायला कमी झाले तर केवढा त्रास ! मग का बरे, आपण ही संवेदना, संदेशवहनासाठी वापरली नाही. तर अडचणी अशा आल्या की रात्री दिसत नाही. शिवाय दिसणे सुद्धा म्हणतात एका विशिष्ट कोनातच ( एकूण ८० अंशातच दिसते ! ) व पुढचेच दिसते. मागचे दिसले नाही तर नाही का आपण म्हणत, की काय माझ्या पाठीला डोळे लावू का ? शिवाय जे दिसले ते तसेच दुसर्याला सांगायचे म्हणजे एकतर हावभाव करून सांगायला पाहिजे किंवा चित्र काढून दाखवायला पाहिजे. बरे सगळ्यांनाच चित्रकला अवगत होत नव्हती. त्यांना गणपतीने दर्शन दिले असे सांगण्यासाठी गणपतीचे चित्र काढावे लागे. ते जर हुबेहुब आले तर ठीक, कळेल, पण दिव्य कलेने ते माकडासारखे दिसले तर समोरचा ह्याला बहुतेक माकडच दिसले असावे, असे समजून माकडाला पकडण्यासाठी जाळे घेऊन यायचा ! आणि हावभाव एवढे करावे लागले असते की आजकाल गुडघे बदलतात, तसे दोन तीन जोडया हात एका आयुष्यात सहज लागले असते !
शिवाय दिसते ते, सर्व दृश्य एकदम सगळीकडचे, दिसते. "मी ताजमहाल पहात असताना तिथल्या पायरीवर पडलो" असे चित्राने सांगायला जावे व पाहणार्याने त्यातला फक्त ताजमहाल पाहूनच "व्वा व्वा " करावे म्हणजे कसला संदेश पोचणार ? मी दिल्लीहून आग्र्याला गेलो, तिथे ताजमहाल पाहिला, तिथल्या पायरीवर....असे मालिकेदार संदेश द्यायचे, तर फक्त कॉमिक्सचीच राष्ट्रीय भाषा झाली असती.
ह्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ऐकणे-बोलणे हे खूपच सोयीस्कर पडते. आपल्याला कुठलेही ऐकू येते. मागचे पुढचे वगैरे. शिवाय अंधारातही ऐकू येणे-बोलणे चालूच असते. आणि मुख्य म्हणजे ऐकणे बोलणे एकानंतर एक अशा क्रमाने घडते. त्यामुळे संदेशवहनाला चांगला थेट आकार मिळतो. खरे तर बोललेले वार्यावर लगेच विरून जाते, पण मग भाषेने लिपीचा शोध लावून त्या उच्चाराला भाषेत पकडून ठेवायची व्यवस्था झाली. तसेच कुठल्याही रेकॉर्ड-प्लेयर शिवाय, एक माणूस बोलला वा त्याने लिहिले तर तेच दुसरा माणूस, लिहिलेले आहे ते वाचून तसे म्हणूही लागला.
ऐका हो ऐका ! ऐकण्या-बोलण्याचा असा विजय झाला ! ( असं ऐकलं आहे ! )
----------------------------------------
अरूण अनंत भालेराव

Thursday, February 10, 2011
अरुणोदय झाला---१५
बनाना रिपब्लिक
जरा कुठे गोंधळ, गडबड, माजली की आजकाल हमखास शब्द वापरला जातो की हे कायद्याचे राज्य आहे का "बनाना रिपब्लिक"? काय आहे बनाना रिपब्लिक ?
बनाना म्हणजे केळी. केळी नेहमी घडात असतात. घड आठ दहा डझनांचा तरी असतो. एकटे केळ घडात असते तोंवर बिनधोक असते. एकटे पडले की ते सोलल्या जाते, खाल्ल्या जाते. ह्याच मानसशास्त्राचा अवलंब करून बरीच राज्ये अशी चालविली जातात की खरे राज्य लष्कराच्या एका प्रमुखाचे असते. बाकी लष्कर-प्रमुख त्याला मदत करतात, एकी ठेवतात. जणु केळ्यांचा घडच. ते त्यांच्यातल्या कोणाला एकटे न पडू देता आपला कार्यभाग साधतात. सर्व नीती, वागणे असे असते की सगळे एकमेकाला साह्य करीत व्यवस्था चालू ठेवतात.
अमेरिकेत पूर्वी केळी जमेकाहून, ग्वाटेमाला, होंडुरास इथून येत. ह्या केळींच्या निर्यातीवरच तिथले राज्य चाले. ह्यात मग जमीनदार लोक महत्वाचे असत. ७५ टक्के जमीन एक दोन टक्के लोकांकडे असे. बहुजन शेतकरी अगदी नगण्य जमीनीचे मालक असत. केळीची लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात होई. त्यासाठी जमीनदार वर्ग ठरवील तसे सरकार वागे. हा व्यवहार इतका प्रचंड व महत्वाचा झाला की अमेरिकेने हे जमीनमालक रशियन-धार्जिणे होऊन त्यांना मिळतील असे दाखवून ग्वाटेमालाचे राज्य उलथूनही पाडले होते.
अमेरिकेचा एक लेखक ओ.हेनरी ह्याने प्रथम त्याच्या कथांत बनाना रिपब्लिक हा शब्द वापरला होता. नंतर प्रसिद्ध नोबेल पुरस्कार-प्राप्त कवी पाब्लो नेरुदा ह्यांनीही "बनाना" नावाची प्रसिद्ध कविता लिहिली होती.
सगळा देश मिळून शेतीचा व्यवसाय करतोय, त्याचे उत्पन्न येईल ते म्होरके लोक आपापसात वाटून, लुटून घेतात, व देशाला जे कर्ज वगैरे होते त्यात मात्र त्यांचा सहभाग नसतो, असे बनाना रिपब्लिकचे धोरण असते.
सध्याच्या घोटाळ्यांच्या संदर्भात, शेतकर्यांच्या कष्टानंतरही होत राहणार्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, व हताश कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीला पाहून आपले "बनाना रिपब्लिक" कधी होतेय ह्याची चिंता आहे का ? काय म्हणता ? झालेय आधीच !
अरुण अनंत भालेराव

Monday, January 10, 2011
अरुणोदय झाला---१४
विकी-लीक्स फिकी ?
सत्याचे मोठे गमतीचे असते. जोपर्यंत ते माहीत नसते तोपर्यंत त्याचे वेडच असते. पण एकदा उघड झाले की तीच माणसे त्याला तोंडीही लावीत नाहीत. विकी-लीक्स चे असेच होत आहे, होणार आहे.
खरे तर ह्यांची खूप लीक्स अगोदरच लोकांना माहीत होती. आता राहूल गांधी हिंदू दहशतवादाचा बाऊ करणार नाहीत तर कोण करणार ? त्यांनी तो केला तर असे काय मोठे होते ? अमेरिका अफगाणिस्तानाच्या लढाईत नको तिथे निरपराध माणसे मारते हे काय नवीन आहे ?
ह्या खळबळजनक लीक्स नी काहीच कसे जनमानस हलत नाही ? जनमानसात चाललेय तरी काय ? जनमानस तयार तरी कसे होते ?
महात्मा गांधी आयुष्यभर सत्याच्या त्वेषाने जीव टाकत राहिले. अगदी सत्याचे प्रयोग करीत राहिले. ज्या जनमानसाने ह्या नंग्या फकीराला परमोच्च स्थान दिले त्याच्या लेखी तरी त्यांची प्रतिमा आता सच्ची आहे का ? भारतातल्या हिंदूंना वाटते की त्यांनी मुसलमानांची उगाच जरा ज्यास्त बडदास्त ठेवली तर पाकिस्तानातल्या मुसलमानांना वाटते की हे तर कटटर हिंदूच होते. सत्याच्या सत्याग्रहीचे असे चित्र जनमानसात असावे ? बरे जे कधीच खरे नव्हते ते मात्र जनमानसात कोरलेच जाते. जसे गोळी लागल्यावर त्यांचे "हे राम !" म्हणणे. त्यांच्या स्वीय सहायकाने लिहून ठेवलेय की असे ते काही म्हणालेच नव्हते, तरी लोक ते मानायला तयार नाहीत.
शिवाजी महाराजांचेही असेच आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणल्यावर तिला मानाने सोडून देताना तिचा मातेसमान मान केला ( आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही इतके सुंदर झालो असतो ) असे आपण तमाम मानतो. पण इतिहासकार म्हणतात असे काही घडलेच नव्हते. त्याला काही पुरावा नाही. म्हणजे जे झालेच नाही ते जनमानसात लीलया कोरले जाते.
सोनिया गांधी पंतप्रधान नसल्या तरी त्यांच्याशिवाय पान किंवा पगडी हलत नाही हे लोकांना माहीत आहेच. तरीही त्या बिचारीच वाटतात. आता तुम्ही कितीही आकडेवारीने सिद्ध केले की इतके इतके पैसे त्यांनी स्विस बॅंकेत नेले, तरी त्याचा काही उपयोग नाही. जवाहरलाल नेहरू जरा छानछोकीचे होते हे लोकांना माहीतच होते, त्यासाठी माउंटबेटनच्या मुलीने आत्मचरित्रात त्यांचे माझ्या आईवर प्रेम होते असे लिहिले तरी काय झाले ? लाडक्या नेहरूंची प्रतिमा जराही डागाळली नाही. म्हणूनच तर ते लाडके !
शिकार एकट्या दुकट्याने साधत नाही. त्याला सगळ्या कोलाहलाने रान पेटवावे लागते, डंके वाजवत सावजाची कोंडी करावी लागते, तेव्हा सावज आटोक्यात येते. बिचार्या विकीलीक्सला दिवस कठीण आहेत, बलाढ्य अमेरिका त्याच्या हात धुवून मागे लागली आहे, बॅंकांनी त्याची कोंडी केली आहे, आणि थोड्याच दिवसात शिकार्याचीच शिकार होणार आहे ! विकी पडतेय फिकी !

Subscribe to:
Posts (Atom)