-------------------------------
स्वीटहार्ट
-----------------
"ए पर्सन इन रोमॅंटिक रिलेशन विथ" असा ढोबळ अर्थ असला तरी अर्थ म्हणजे वापर ( meaning is use ) ह्या न्यायाने, स्वीटहार्टचा वापरातला अर्थ वेगळाच होतो. ह्याचा नेमका अर्थ "स्वीटहार्ट-कॉन्ट्रॅक्ट" ह्या एका कायदेशीर बाबीवरून समजतो. कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये "समतोल" ( दोन्ही पक्षांना समान फायदे असावेत) असावा, असे कायद्याचे एक कलम आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर विलंबाला दंड (पेनाल्टी ) असेल , तर त्याउलट समतोलासाठी, काम लवकर झाले तर त्यासाठी इन्सेंटिव्ह ( प्रोत्साहन ) असायला हवेत असे कॉन्ट्रॅक्टचे नियम सांगतात. समजा प्रोत्साहन नसेल आणि नुसता एकतर्फी दंडच असेल तर काय होते ? तर ते कॉन्ट्रॅक्ट "स्वीटहार्ट-कॉन्ट्रॅक्ट" होते. म्हणजे प्रत्यक्षातल्या "स्वीटहार्ट"ला जसा समतोलाचा न्याय लागू होत नाही, सगळे तिच्याच कलाने होते, तसे दोन पक्षांपैकी एका पक्षालाच ह्यात फायदा होतो व म्हणून कायद्यात त्याला स्वीटहार्ट-कॉन्ट्रॅक्ट म्हणतात व ते कायदेशीर होत नाही. ( अर्थात भारतात हे कोणी पाळीत नाही, पण कायद्याच्या दृष्टीने हे अन्यायकारक समजतात) .
ह्याच अर्थछटेच्या फरकाने अमेरिकेत ( वा पश्चिमेत ) प्रेयसीला वा बायकोला "स्वीटहार्ट" म्हणण्याची चाल आहे. म्हणजे तिला असे आपण भासवतो की बाई, सगळे तुझ्याच कलाने मी घेत आहे. तू स्वीटहार्ट आहेस. नुसत्या प्रियकर/प्रेयसीत हा अर्थ येत नाही !
----------------------------------
Saturday, September 17, 2016
स्वीटहार्ट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment