Saturday, September 17, 2016

चला वेड पाघरून पेडगावला जाऊ या ...

-------------------------------------------------------
चला वेड पांघरून पेडगावला जाऊ या.....
----------------------------------------
राम जेठमलानी ह्यांना कमीत कमी आसारामांच्या वकीलपत्राचे १० कोटी तरी मिळाले असतील. आता एवढया खर्चाने ते काय सांगू पाहात आहेत ?
तर, वेड हे इतके सर्वव्यापी असेल ? तुम्ही ही पोस्ट वाचणारे पाचवी व्यक्ती असाल तर तुम्ही त्यातलेच एक असू शकाल. कारण पाचात एकाला वेड लागलेले असते.
प्रथम वेड ह्या गोष्टीबद्दल जो धब्बा ( टॅबू ) आहे तो घालवू या. सोप्या मार्गाने. टेड ह्यांचे अनेक शैक्षणिक व्हिडीओ आहेत, त्यापैकी एका वेडाबाईने शहाणे झाल्यावरचा हा व्हिडीओ पहा. ( खाली दिला आहे, त्यावर क्लिक करून पहा, ८ मिनिटांचा आहे. ).
खर्‍या खोट्याच्या भानगडीत न पडता आता जगातले जे टॉपचे १० मानसिक रोग आहेत, त्यांची ही जंत्री वाचा :
१) ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स:
ह्या रोगात लहान बाळांची वाढ नीट होत नाही. त्यांना पाहण्यात फोकस न होण्याने अडथळे येतात. ऑटिझम असलेली मुले इतर मुलांसारखी धसमुसळी नसून हळूबाई असतात. त्यांच्या वाढीत ह्यामुळे अनेक अडथळे येतात. अमेरिकेत ह्याने अनेक बालके ग्रासलेली असून दोन जुळ्यामधल्या एकाला ऑटिझम झालेले मी स्वत: तिथे एका घरातले मूल पाहिलेले आहे.
२) स्कीझोफ्रेनिया :
भास होणे, लोक आपल्याविरुद्ध कट करताहेत, आपल्याबद्दलच बोलत आहेत असे वाटणे, दोन प्रकारची व्यक्तिमत्वे एकाच व्यक्तिमत्वात असणे, लोकांबद्दल संशय येणे वगैरे. देवराई सिनेमात ह्याबाबतची सर्व माहीती मिळते.
३) बायपोलर डिसऑर्डर:
अतिउत्साह ( मॅनिक ) ते निरुत्साह ( डिप्रेशन ) असे मूडस्‌ सारखे बदलत जाणे. ह्या पायी व्यक्तींतल्या संबंधावर परिणाम होणे, शाळेत अभ्यासावर परिणाम होणे वगैरे.
४) पॅनिक डिसऑर्डर :
हार्ट ऍटॅक सारखीच ह्यात ह्रदयाचे ठोके/धडधड वाढते , अशक्तपणा येतो, ओकार्‍या येतात, श्वास कोंडतो, घाम येतो, हाताला झिणझिण्या येतात, छातीत दुखते वगैरे हे ऍटॅक्स खरे असून प्रचंड भीतीपायी आलेले असतात.
५)  OCD, PTSD, GAD वगैरे ऍंक्झायटी डिसऑर्डर्स
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर ( OCD ) : ह्यात अगदी सारखे एकच विचार मनाला कोरत राहतो. कोणाला स्वच्छतेचे इतके भूत मानगुटी बसते की ते सारखे सगळे स्वच्छ करीत राहतात, सारखे हात धुतात, वगैरे. आपले वागणे आपला ताबा घेते.
पोस्ट-ट्राउमॅटिक-स्ट्रेस-डिसऑर्डर ( PTSD ) : एखाद्या "हादसा" नंतर काही काळाने जे बचावलेले असतात त्यांना त्यावेळी वाटलेली भीती काही काळानंतर वाटत राहते व ती मन पोखरत राहते, ताण देते.
जनरल-ऍंक्झायटी-डिसऑर्डर ( GAD ) : नेहमीच्याच काळज्या पण त्या सातत्याने सारख्या वाटत राहतात ( सहा महिने तरी ) . त्यांना सारखे काही तरी भयाण घडणार आहे असे वाटत राहते. माणसे चिंतोबा बनतात व स्वत:ला त्रास करून घेतात.
६) फोबिया
सभेत बोलण्याची भीती ते सापांची भीती, अशा अनेक भीतीपायी माणसे ताणात राहतात. कित्येकांना उंचावर गेल्यावरची भीती, तर काहींना बंद खोल्यांची भीती तर काहींना आपली वर्तणूक लोक पाहताहेत त्याची भीती वाटत राहते. ही भीती कित्येक आठवडे टिकते.
७) ADHD अटेंशन-डेफिसिट-हायपर ऍक्टिव्हिटी-सिंड्रोम
स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा हा रोग आहे. कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही आहेत हे पाहून लक्ष वेधण्यासाठी मग पोरे/माणसे हायपर होतात, एकाजागी टिकत नाहीत, सारखे काहीना काही करीत राहतात.
८) ईटींग डिसॉर्डर्स
ह्यात नर्व्हस मुले जास्त खायला लागतात, गलेलठ्ठ होतात तर ज्यांना ऍनोरेक्सिया होतो त्यांना न खाण्याचे वेड लागते व ती मुले शेवटी अशक्त होऊन मरतात.
९) पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स
काही मुलांना लोक नावे ठेवतील त्याची भीती वाटते व ते कोणासमोर जाण्याचेच टाळतात, बुजरे होतात, तर काही मुले इतरांचा विचारच न करता धसमुसळी व आक्रमक होतात. आत्महत्येस प्रवृत्त होणारी मुले ही अशीच इंपल्सिव्ह होतात तर काही ह्यामुळे अस्थिर होतात.
१०) मूड-डिसऑर्डर्स
मनाची भावना बराच काळ टिकली तर त्याला मूड म्हणतात. ह्यात डिप्रेशन येणे हे मोठे प्रकरण आहे. एकटेपणाच्या भावनेतून हे डिप्रेशन येते. लोक आपल्याला स्वीकारत नाहीत ह्या भावनेतूनही हे मूडस्‌ ताण देतात, खिन्न करतात. ह्या मुळे अडचणीवर मात करताना नेटाने प्रयत्न होत नाहीत व माणूस गर्तेत जातो.
------------------------------------------------------






<iframe width="560" height="315" src="//www.youtube.com/embed/mbbMLOZjUYI" frameborder="0" allowfullscreen></iframe>

No comments:

Post a Comment