Tuesday, September 6, 2016

बिग बँग कडे !

बिग बँग कडे !

---------------------

म्हणतात की विश्व निर्माण झाले तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाला, बिग बँग ! त्यानंतर सगळे निवले. जेव्हा हा बिग बँग झाला तेव्हा जीव सृष्टी नव्हती म्हणतात. कदाचित म्हणूनच लोकांना मोठ्ठ्या आवाजाचे आकर्षण असावे !

आपल्या ढोल ताशांच्या आवाजाचे काय घेवून बसलात ? तुम्ही परदेशातल्या कनसर्टस् ऐकल्या तर जीवाचा थरकाप उडेल, इतका प्रचंड मोठा आवाज ! आणि त्याही वर किंचाळून दाद देणे !

आजकाल कुठलीही सभा, संमेलन असू दे, आवाज ऐकू येत नाहीय असे तर कधीच होत नाही. पूर्वी सिनेमा दाखवणारा आवाज चालू करायचा विसरायचा व मग पब्लिक ओरडायचे “आवाज !” अन् आवाज चालू व्हायचा. आवाज आवाज असे ओरडावे लागल्याचे कित्येक वर्षात स्मरत नाही.

सूर्याच्या प्रकाशात जशी एक उर्जा असते, तशीच आवाजात उर्जा असते. माझा असा संशय आहे की ज्या लोकांनी बिग बँग पाहिलेला नाही त्यांची अशी चाल असावी की सर्व विश्वातून एव्हढा आवाज व्हावा की त्याने परत एकदा बिग बँग व्हावा !

एरव्ही बायकांचे बोलणे किती नाजूक, पण आताशी....  

........बेबी को बेस पसंद है !

----------------------------

No comments:

Post a Comment