Monday, September 5, 2016

आवाज कुणाचा ?

आवाज कुणाचा ?
-----------------------
तुम्ही ऐकले असेल की वाचेचे परा, पश्यंती, मध्यमा,व वैखरी असे प्रकार मानतात. त्यापैकी वैखरी ही आपण बोलतो ती भाषा किंवा तसे आवाज. परा मध्ये अगदी प्रारंभीचे (आदि) आवाज येतात. जेव्हा सर्व विश्व स्थिर होते तेव्हा आवाज शक्य नव्हता कारण आवाज ( sound) ही एक लाट ( wave form ) आहे आणि त्या कंपनासाठी काहीतरी फिरायला ( motion ) हवे. आपली   प्ऋथ्वी जेव्हा फिरायला लागली तेव्हा बिग बँग होऊन मोठ्ठा आवाज आला. आपल्याला अर्थचा आजचा आवाज ऐकायचा असेल इंटरनेटवर असे संकेत स्थळ आहे. त्यावर जावून हा आवाज ओम् सारखा आहे का हे ऐकता येते.( ओम हा आदि नाद आहे असे मानतात. ). हे आवाज जसे "परा" मध्ये येतात तसेच पंचमहाभूतांचे आवाजही त्यात येतात. जे लोक सिनेमात आवाज देतात त्यांना विचारले तर कळेल की भडकलेल्या आगीचा आवाज रिं रिं रिं असा येतो जो शनीच्या मंत्रात ओम र्हिं र्हिं ...असा येतो. मध्यमा मध्ये चित्रांचे/प्रतिमांचे रूपांतर आवाजात होते. अमेरिकेतले एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन ( v s ramchandran)एक ह्यासाठी एक उदाहरण देतात. आपण जर विचारले की किकी व बुबा हे शब्द काय दर्षवतात व दोन चित्रे दाखवली ज्यात एक काटेरी काटेरी व दुसरे ढगाळ ढगाळ असे तर शंभर टक्के लोक काटेरी चित्र म्हणजे किकी असे दाखवतात. हेच मध्यमा मध्ये घडते. आवाजांचे अनुकरण करणारे शब्द असेच चित्र उभे करतात. जसे: कावळा, ककू, गडबड, धडाड, धबधबा वगैरे. अभिनवगुप्त ह्यांचे ह्यावर तंत्रशास्त्र सविस्तर माहिती देते. मंत्रात असेच परिणाम कारक आदि आवाज असतात व त्यांचा अर्थ असतो. आपल्या दळणवळणात ( communication) ७० टक्के आवाज हे शब्द नसतात. जसे: वडिलांनी नुसते हां केले तरी ते चूप बसायला सांगताहेत हे लहान मुलालाही कळते. आवाजांना अर्थ असतो तो असा. असो !

No comments:

Post a Comment