Sunday, July 10, 2016

कुत्ते कमीने

कुत्रा
------------
१)इंग्रजी---dog
२)आफ्रिकान्स---हॉन्ड
३)बंगाली--कुकूरा
४)चायनीज-को ओ
५)डच--हूंट
६)एस्परेंटो--हून ओ ( hundo )
७)फ्रेंच--चॅंव ( chien )
८)जर्मन--हुंड ( hund )
९)गुजराती--कूतरो
१०)हिंदी---कुत्ता
११)इंडोनेशियन--आनजिंग ( anjing )
१२)इटालियन--काने ( cane )
१३)जपानीज--इनु ( inu )
१४)कन्नड--नायी
१५)लॅटिन--कानिस्‌ ( canis )
१६)पोर्तुगीज--कऊ ( cao )
१७)रशियन--स ब का ( Sobaka )
१८)स्पॅनिश---पेरो
१९)तमिळ--नाय
२०)तेलुगु--कुक्का
२१)थाई--सुनाख
२२)टर्किश--कोपेच
----------------------
वर गुगल च्या Translate ह्या सोयीतून "कुत्रा" शब्द निरनिराळ्या भाषात काय आहे त्याची नोंद केलेली आहे. एकूण तपासलेल्या २२ भाषापैकी ८ भाषात ( ३६%) साधारणपणे कुकुरा, कोओ . कुक्का , कोपेच , सबका , कऊ , कूतरो , कुत्ता , असे सारखे वाटणारेच शब्द कुत्र्याला आहेत. शिवाय कानिस, काने , इनु, हेही ( १३.६%) क,न, अक्षराभोवतीचेच शब्द आहेत. तसेच हॉन्ड , हूंट , हून ओ , हुंड , हे शब्द ( १८%) ह, ट,ड, भोवतीच फिरणारे का व्हावेत हे कुतूहूल शमले तर काय वाईट ? नाहीतरी युनिव्हर्सल ग्रामर चोम्स्कींच्या मते संभवनीय असेल, तर युनिव्हर्सल भाषाही एखादेवेळी शक्यतेतली असावी. ७०% टक्क्याचे दळणवळण हे जर आवाज प्रभावित करीत असेल ( जसे टोन, पिच वगैरे ) तर आवाजाने अर्थनिर्णयन केले तर ते शक्यतेचे का असू नये ? सायकोलिंग्विस्टिक्स मध्ये जर क्रियापदांचे न्यूरॉन-पॅटर्न्स जर अधिक दाट असतील तर तो आवाजाचाच परिणाम का मानू नये ? किंवा बुबा , किकी प्रयोगाने नुसता आवाज एखाद्या गोष्टीचा स्वभाव दाखवत असेल तर त्यावर इतकी नाराजी का असावी ? भाषेने अनुनासिकत्वाला जे महत्व दिलेले आहे ते श्रुतिगम्यतेसाठी आणि श्रुतिरम्यतेसाठी असले तर आवाजाचे प्रभुत्व मानण्यात काय गैर ?

No comments:

Post a Comment