Thursday, July 7, 2016

दूधदुभतं

दुधदुभतं
-----------
दूध व दुधाचे प्रकार ( जसे. दही, ताक, लोणी, तूप, बेरी ) ह्यांना मिळून दुधदुभतं असा शब्द आपण वापरतो.
साधित शब्दांचा एक प्रकार अभ्यस्त शब्द म्हणून आहे. त्यात एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांचा अभ्यास ( =पुनरावृत्ती किंवा द्वित्व ) करतात. जसे : हळूहळू, शेजारीपाजारी, दगडबिगड. पंजाबी भाषेत असे फार वेळा केले जाते. जसे : शादी-बीदी ; दारू-शारू ; वगैरे. अशा करण्याने शब्दाला उठाव येतो.
पूर्णाभ्यस्त शब्दात एकच शब्द दोनदा येतो : जसे : जे जे ; ते ते; लाललाल ; घेईघेई ; समोरासमोर ; हळू हळू वगैरे
अंशाभ्यस्त शब्दात एक शब्द थोडा बदलून येतो पण बदललेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो. जसे : बारीक सारीक ; उरला सुरला ; आडवा तिडवा वगैरे.
अनुकरण वाचक शब्दात ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती असते. जसे : बडबड ; कडकडाट ; गडगडाट ; फडफड वगैरे.
दुधदुभतं मधले दुभते हे समूहवाचक असून त्याला स्वत:चा वेगळा अर्थ आहे. जसे : दुभती गाय ; दुभते जनावर ; दुभते ( दूध, दही, ताक, लोणी, तूप, बेरी वगैरे.).
-------------------

No comments:

Post a Comment