पावण्याचा संकेत !
------------------
बॅंकॉक ला नोकरी निमित्त असताना शहरातल्या मध्यवस्तीत असलेल्या एका देवीच्या हिंदू देवळात प्रचंड थाई लोक ( हे चीनी, बौद्ध धर्माचे ) येत असत. एक दोघांशी ओळख झाल्यावर असे का विचारल्यावर त्यांनी चक्क कबूल केले की तुमचे देव फार पॉवरफुल असतात म्हणून. आता पॉवरफुल कसे, तर तिथे ठेवलेल्या आकड्याच्या काड्या असतात एक नळकांड्यात व त्या हे दर्शन झाल्यावर खुळखुळवत पाडतात व त्या आकड्यावर ते सट्टा खेळतात व तो हमखास लागतो म्हणून तुमचे देव पॉवरफुल !
ह्याचा खरच शास्त्रीय विचार करायचा असेल तर खूप शोध-निबंध आहेत, प्लासीबू इफेक्ट वर ते वाचावेत. प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की आपण जी औषधे घेतो त्याने बरे वाटेल ह्या विश्वासावरच आपले आजार बरे होतात. औषधे केवळ ४० टक्केच लागू होतात, बाकीचे श्रेय आपल्या अपेक्षेला असते. अजून वाचायचे असेल तर मुसलमानांचा फर्टिलिटी रेट दर बाई मागे ३.१ मुले व हिंदूंचा फर्टिलिटी रेट दर बाई मागे २.३ मुले असे का ह्यावरचे शोध निबंध वाचावेत. चार बायका असल्या तरी हा रेट दर बाईमागे मोजल्याने त्याचा संबंध राहत नाही. हिंदुचेच हे मुसलमान झालेले आहेत, मग हे ज्यास्त का फळतात ? तर संशोधन सांगते की तशा त्यांच्या अपेक्षा असतात म्हणून.
तर खरे दैवत अपेक्षा हे आहे ! कुठल्याही मोटीव्हेशनिस्टला विचारा तो सांगेल की जोवर तुम्ही काही मागत नाही तोवर काही प्रगती होत नाही. अपेक्षा हे दैवत हे सगळ्यात ज्यास्त पावणारे आहे.
-----------------------
No comments:
Post a Comment