द्रोणाचार्यांचा अंगठा
एकलव्य हा द्रोणाचार्यांचा शिष्य होता का नाही ? तो नसेल त्यांच्या वर्गात, पण त्याने त्याच्या मनाने त्यांची मूर्ती स्थापून त्यापुढे धनुर्विद्येचे शिक्षण घेतले नव्हते का ? त्याने नुसते कबूलच नाही, तर गुरुदक्षिणा म्हणून अंगठाही कापून दिला होता, म्हणजे द्रोणाचार्यांच्या विचारांशी तो संपूर्ण सहमत होता. समजा मी इंटरनेट वर कोणा गुरूकडे शिकलो तर तोही समक्ष कुठे हजर असतो ? पण तरीही मी त्याचा शिष्यच नाही का ?
असेच नथुराम गोडसे समजा नसतील त्यावेळी आरएसएस मध्ये, पण त्यांचे विचार तसेच असतील तर ते आरएसएसचे होते का नव्हते ? जसे कोणी अप्रत्यक्षरित्या हिंसेचे समर्थन केले तरी तो हिंसेला तितकाच जबाबदार. जशी हिंसा कित्येक वेळा क्रिमिनल असते तशीच अहिंसा कित्येकवेळा क्रिमिनल असू शकते. जसे, माझ्या समोर खून होतोय, मी खुन्याला पकडू शकतोय पण अहिंसेच्या नादापायी मी ते करीत नाही, तर इथे अहिंसा क्रिमिनल नाही का होत ? मग मलाही अंगठा द्यायला पाहिजे !
संस्था विचारांचे संस्थीकरण करीत असतील व संस्था दोषी असतील तर मग विचारांचे काय ? ते नाही का सदोष ? आणि ते धारण करणारे संस्थेबाहेरचे पण दोषी ? त्यांनी नाही का द्यायचा अंगठा ?
No comments:
Post a Comment