ठुल्ला
न्यायाधीशांनी खरे तर हा प्रश्न केजरीवाल ह्यांना विचारलाय की “ठुल्ला” म्हणजे काय ? ....पण आपण अर्थ सांगायला काय हरकत ?
भाषाशास्त्र सांगते की नुसत्या शब्दांना अर्थ नसतो, सगळा समाज, संस्कृती मिळून त्याला तो अर्थ देतात व तो अर्थ कुठल्याही नियमाशिवाय येतो. खरे तर शब्द ह्याची व्याख्याच अशी करतात की अक्षरांचा असा समूह की ज्याचा काही तरी अर्थ होतो. आता “ठुल्ला” हा शब्दकोशात सापडत नाही म्हणून तो शब्दच नाही असे आपण म्हणू शकत नाही, कारण त्याला अर्थ आहे. काय अर्थ असावा ?
अभिनव गुप्त ह्यांच्या तंत्र-शास्त्र प्रमाणे प्रत्येक अक्षराला अर्थ असतो व त्याचे एक दैवतही असते. ठ ह्या अक्षराचे दैवत आहे “शिस्न”. ठ पासून सुरू होणारे एकूण ३०७ शब्द आहेत ( वा.गो.आपटे ह्यांच्या शब्द-रत्नाकर ह्या शब्दकोशात ). त्यापैकी २०० नकारी अर्थाचे आहेत. म्हणजे ७० टक्के. म्हणजे ठुल्ला हे नकारी असणे ज्यास्त संभवनीय. ( अर्थात अपवाद आहेत : ठराव, ठरवणे, ठणठणीत, वगैरे ).
हिंदीत शिस्नला बोली भाषेत “बुल्ला” असेही म्हणतात. ह्या शब्दात ल्ला चा इतका दाट परिणाम आहे की बु ऐवजी दुसरे कुठलेही अक्षर टाकले तरी अर्थात वाईटाची झांक राहते. ( ती फक्त अजून एकदा नकारी करणारे अक्षर अ जोडून त्याचा अल्ला केल्यावरच दूर सरते.).
आपण नवीन शब्द करतो तेव्हा त्याला सर्वानुमते एक अर्थ येतो. आणि ठुल्ला ला नक्की वाईटच अर्थ आहे एवढे नक्की !
--------------------
No comments:
Post a Comment