अपमान कसा करावा ?
राजकारणात जेव्हा कोणी एकमेकाविरुद्ध बोलतात तेव्हा ते खरेच असते पण त्याने निष्कारण वैयक्तिक चारित्र्य हनन झाल्याचा त्यांना राग येतो. तर असा राग न येउ देता अपमान कसा करावा ?
सगळ्यात सोपे तत्व असे आहे की तुम्हाला कोणाचा बाप काढायचा असेल तर आपलाही बाप काढावा. म्हणजे समजा तुम्हाला असे म्हणायचेय की “तुझ्या बापाने असे कधी केले होते काय ?” तर इथे प्रश्न त्यालाच असून निष्कारण त्याचा बाप काढल्या गेलाय. आणि साहजिकच त्याला त्याचा राग येणार. आता त्याचा “बाप” काढायचाच असेल तर असे म्हणावे : “माझ्या बापाने तर असे कधी केले नव्हते, तुझ्या बापाने असे कधी केले होते काय ?” आता तो जर खवळला तर आपण चुचकारू शकतो की मी माझाही बाप काढलाय की !
तर आता मायावतींना ज्या गृहस्थाने “तुम्ही वेश्येपेक्षाही वाईट आहात. सकाळी एक कोटी घेवून तिकीट देता, दुपारी दोन कोटी तर संध्याकाळी तीन कोटी घेवून.” असे जे म्हटले, त्याच्याने त्यांचा अपमान झाला. आता हेच अपमान न होवू देता कसे म्हणावे ?
तर असे : “राजकारण आजकाल एक वेश्याव्यवसाय झाला आहे. निवडणुकीची तिकिटे पैसे घेवून देतात. पण मायावतीमुळे आमची अडचण होते. त्या सकाळी एक कोटी घेतात, व ते पाहून आम्ही सव्वा कोटी घेतले की त्या दुपारी दोन कोटी घेतात. आम्ही दोन घेतले की त्या तीन घेतात. हे वेश्याव्यवसायापेक्षा वाईट आहे. ”
बघा झाला का अपमान ? कारण आम्ही पण त्याच व्यवसायात आहोत हे म्हटलेय की !
-----------------------
No comments:
Post a Comment