Sunday, July 17, 2016

नेति नेति नास्तिक

नेति नेति नास्तिक

----------------------- 

म्हणतात की देवाची व्याख्या करताना न + इति = नेति नेति असे म्हणतात. म्हणजे देव कसा ? तर असा नाही, असा नाही ...असा !

उदाहरणच घ्यायचे तर आपल्या डोळ्याने पाहण्याचे घ्या. म्हणे आपल्या डोळ्यात दोन भोके आहेत, जिथे आपल्याला न दिसले पाहिजे व प्रत्येक देखाव्यात ही दोन भोके दिसली पाहिजे होती. पण असे होत नाही कारण म्हणे मेंदूत अशी न्युरोन मंडळी बसली आहे की जी आपल्याला पटवते की असेच सगळीकडे दिसते आहे व भोक बिक काही नाही. हे असे होते हे कळले, पण हे न्युरोन हे कसे पटकन करतात ते अजून कळले नाही म्हणतात. असेच म्हणे आपल्याला दोन मितीतच दिसते, पण मेंदूत ते तीन मितीत परिवर्तीत होते. कसे ?  कदाचित त्यालाच ठावूक !

जिथपर्यंत कळते तिथपर्यंत मेंदूचा जय ! आणि जिथे समजत नाही तिथे ? कदाचित त्यालाच ठावूक !

एखादी गोष्ट केवळ काही मिलि सेकंड पाहिली आणि क्षणात ती कळली, असे होते खरे. पण कसे हे होते ? कदाचित त्यालाच ठावूक !

---------------------

No comments:

Post a Comment