अजब तर्क
---------------
जे लोक काचेच्या घरात राहतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडं का मारू नयेत? राजकारणी म्हणतात, कारण मग तेही तुमच्या घरावर दगडं मारतील ना, म्हणून. आपण खून का करू नये, तर खून करणे वाईट आहे म्हणून नव्हे, तर दुसरेही आपला खून करतील म्हणून. काही धूर्त म्हणतात, आपण दगडं मारायला गेलो तर घरं काचेची असल्याने आपण मारतोय ते लोकांना दिसेल, म्हणून. हे दोन्ही तर्क चुकीचे आहेत हे कोणालाही आता पटावे. असेच भ्रामक तर्क आहेत, की तुम्ही त्यांना वेश्या म्हणालात ना तर मग आम्ही तुमच्या माणसाच्या आई, मुलीला पेश करा असे म्हटले तर तुम्हाला त्यावर आक्षेप घ्यायचा अधिकार नाही. चांगल्या माणसांनी, व वाईट माणसांनी वाईटाला वाईटच म्हटले पाहिजे,हीच नीती. वाईट माणसाला अधिकार आहे का नाही हे गैरलागू आहे. वाईट माणसाने साक्ष दिली, तर ती ग्राह्य धरून खुन्याला फाशी देतात, मग त्याने वाईटाला वाईट म्हटले तर ते तर्काला धरूनच होते!
Friday, July 22, 2016
अजब तर्क
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment