----------------------------------------
हेल्प द गुड "गाय" !
---------------------------
मालवणीतल्या एका गवळ्याकडे दहा गाई होत्या. तो रोज त्यांना चरायला सोडी व त्या नेमाने संध्याकाळी परतत. एकदा त्याच्या सहा गाई परतल्याच नाहीत. त्याला संशय आला व त्याने चोरांना पकडण्यासाठी उरलेल्या चारही गाईंना चरायला सोडले व त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले. अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी चोरटे आले व त्यांनी एका गाईला चार्याचे आमिष दाखवत कोपर्यात नेऊन बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. ते चोरटे तिला टेंपोत चढवीत असतानाच पोलीस आले व त्यांनी चोरट्यांना पकडले.
गाय परळच्या जनावरांच्या दवाखान्यात नेली असता आठ महिन्याची गाभण ( प्रेग्नंट ) असल्याचे कळले. गाभण गाईला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्याने केवळ तिलाच नाही तर, तिच्या पोटातल्या वासरालाही इजा पोचली की काय ते आता डॉक्टर तपासीत आहेत. चोरटे प्रत्येक गाय २५ हजाराला विकीत असत हे ही बाहेर आले आहे.
ब्राह्मणी संस्कारांची खिल्ली उडवण्यासाठी काही आयआयटीतले लोक दरवर्षी एक दिवस "बीफ-डे" साजरा करतात. त्यादिवशी सगळे मिळून गाईच्या मटणाला ( बीफ ) शिजवतात व झोडतात. ह्या वर्षी ह्या पार्टीला जाण्याचे मला निमंत्रणही आले होते पण मी गेलो नाही त्याचे आता मला बरे वाटते आहे. ब्राह्मण-हिंदू-मुसलमान हे भेद जाऊ द्या, पण केवळ बीफ गोड लागते म्हणून आपण ह्या चोरांच्या दुष्कृत्यात सामील झालो नाही ह्याचे मला आता बरे वाटते आहे. केवळ काही हजारासाठी एका गाभण ( प्रेग्नंट) गाईला असे लुबाडायचे हे एका जनावर बलात्कार केल्यासारखेच होते.
लोकांनो, प्लीज हेल्प द गुड "गाय" !
-----------------------------------------------------
Friday, July 29, 2016
हेल्प द गुड "गाय" !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment