Sunday, July 17, 2016

उ चा उकल

उ चा उकल

उपोद्घात व उपसंहार हे निश्चितच अवघड शब्द आहेत, म्हणायला व लिहायला. त्यामुळे ह्यांना पर्याय असलेले शब्द आपण ज्यास्त वापरणे साहजिक आहे. पण हे शब्द अवघड का झाले असावेत ?

वा.गो.आपटे ह्यांच्या शब्द-रत्नाकर ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत. त्यापैकी ५८८८ शब्द स पासून सुरू होणारे आहेत. उ पासून सुरू होणारे शब्द आहेत केवळ १२४८ व त्याचा क्रम २१वा लागतो इतका हा शब्द नकोसा आहे.

उ पासूनचे जे १२४८ शब्द आहेत त्यात २५८ शब्द नकार, तिरस्कार दाखवणारे आहेत ( २०%). शब्दकोशात उ समोर शेरा आहे : नापसंती किंवा तिरस्कार दर्शविणारे उद्गारवाचक अव्यय. असेच संस्कृत शब्दकोशात उ समोर अर्थ आहे : an interjection of compassion, anger, L.तेव्हा उ ह्या अक्षराचे कर्तब तिरस्कार दाखवते व ते उदाहरणार्थ दाखवणारे शब्द आहेत : उकरडा, उखाळी-पाखाळी, उगारणे, उगीच, उग्र, उचकटणे, उचलेगिरी, उचापत, उच्छिन्न, उठवळ, उंडारणे, उणीव, उताडा, उतावळ, (उत्कृष्ट हे अपवाद), उथळ, उद्धट, उनाड, उधार, उपट, उपद्रव, उपसर्ग, उलट, उष्टे, उशीर, उष्मा...वगैरे.

ह्या उलट प्र पासून सुरू होणारे एकूण ८४४ शब्द आहेत व त्यापैकी २६५ ( ३१%) हे प्रशंसात्मक आहेत. त्यामुळे उपोद्घात ऐवजी प्रस्तावना हे ज्यास्त रूढ होण्याजोगे आहे. शिवाय त्यात स्तवन चा भाव आहे.

-------------------  

No comments:

Post a Comment