Tuesday, August 30, 2016

संस्कृतीची दुडकी चाल !

संस्कृतीची दुडकी चाल !

--------------------------------

आपल्याला वाटते खरे की कलाकृतीचा आपल्यावर काही ढिम्म परिणाम होत नाही. पण.....

आज ६०-६५ वर्षे झाली त्या गोष्टीला. मी आठ दहा वर्षांचा असेन. हैद्राबादला त्या काळी आमच्याकडे पंधरा वीस जण होते राहायला. त्यात ११चि एक क्रिकेट टीम विद्यार्थ्यांचीच होती. माझी आजी गं.भा. होती. म्हणजे केशवपन केलेली. लाल गुलाली नेसे. स्वयपाक सोवळ्यात करी. आपले जसे केस वाढत, तसे तिचेही वाढत. तिच्या गुलालीच्या डोक्यावरच्या पदरामधून ते बाहेर येत व त्यावर आम्ही हात फिरवला की ते हाताला गुदगुल्या करीत. तिचे वाढलेले केस कापायला न्हावी गुपचूप बोलावण्याचे काम माझ्याकडे असे. त्याला बोलावताना “बुढ्ढीके बाल काटने के है” असे म्हणताना मला एक अजीब शरम येई. आजीलाही गुपचूप सगळे मोरीत करून घेणे खूपच अवघड जाई व हे सगळ्यांना दिसत होते. पण हे दर महिन्याला भोगावे लागे. त्यानंतर बरीच वर्षे गेली...त्यानंतर आमच्या घरात कोणत्याच बाईला केशवपन करावे लागले नाही.

एक छोटीशीच गोष्ट...पण किती वर्ष जायला लागली. दरम्यान त्यावरच्या प्रथेवरचे कितीतरी साहित्य येउन गेले. दर क्षणाला थोडा थोडा करीत परिणाम तर झालाच. असेच सतीचे, नरभक्षक असण्याचे...

संस्कृतीची चाल दुडकी जरूर, पण कलाकृती थोडा थोडा परिणाम करतातच. पण कळते खूप वर्षांनी !

---------------------

No comments:

Post a Comment