Sunday, August 14, 2016

निरागस

निरागस

निरागस म्हणजे इनोसेंट !

इनोसेंट-पणात राग नसण्यापेक्षा एक असे लहानपणाचे वैशिष्ट्य असते की ज्यात मोठ्या माणसांच्या छद्मीपणा ऐवजी, तोंड-देखलेपणा ऐवजी सहज सुंदर भाव असतो. ते कसे नुकते उमललेले त्यावर कसलेही रोपण न केलेले सहज असे दिसणे असते.

म्हणून निरागस ह्या शब्दाची फोड नि + रागस अशी न देता संस्कृत कोशात निर् + आगस अथवा निर् + आगम अशी देतात. आता आगसणे ह्या शब्दाचा मराठी शब्दकोशातला अर्थ आहे पक्व होणे. म्हणजे निरागस म्हणजे पक्व होण्या अगोदरची अवस्था, जी लहान मुलांप्रमाणे असते, असे होते.

सुरांमध्ये सूर निर्भेळ, पक्का, दुसऱ्या कोणत्याही सुरांचा परिणाम न झालेला असा लागणे, हे फार महत्वाचे मानतात व म्हणूनच जेव्हा “सूर निरागस हो” असे कोणी म्हणतो तेव्हा केवळ निखळपणाचे ते मागणे असते !

-------------------------

No comments:

Post a Comment