Thursday, August 18, 2016

अॅम्नेस्टी की आॅनेस्टी?

अॅम्नेस्टी की ऑनेस्टी ?

------------------------------- 

काय गंमत असते ! आपल्याला वाटते की आपल्याला बऱ्या पैकी सगळे माहीत असते व शोधायला गेले की समजते, अरे हे तर आपल्याला माहीतच नव्हते !

असेच आहे ह्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे. ह्याचे सध्याचे डायरेक्टर म्हणे कोणी सलील शेट्टी म्हणून आहेत, बेंगलोरचे. आणि त्यांना म्हणे पगारच आहे वर्षाचा तीन लाख पौंड. म्हणजे अडीच कोटी रुपये. अॅम्नेस्टीचे इंग्लंड मध्ये म्हणे ५०० पगारी लोक आहेत व ह्याने त्यांची बदली केलीय व त्यामुळे सगळे नाराज आहेत . त्यांच्या अगोदर बांगला देशची कोणी आयरीन खान म्हणून होती म्हणे २०१० पर्यंत. तिला असाच पगार तर होताच पण म्हणे की ती खुर्ची सोडायलाच तयार नव्हती व मग तिला काही मिलियन डॉलर द्यावे लागले म्हणे !

अॅम्नेस्टीच्या ट्वीटर वर चक्क जाहिरातच आहे की येताय का पगारी ?

------------------------

No comments:

Post a Comment