Sunday, August 28, 2016

मी च युगे युगे....

---------------------------------------
मी च युगे युगे...संभवा !
-----------------------------
युगे न्‌ युगे सगळी माणसे कशी सारखी असतात ! सगळी माणसे लग्ने करतात, संसार करतात, घरे बांधतात, घरे सोडून जातात, घडया बसवतात, घडया विस्कटतात, मळलेली वाट तुडवतात, नवी वाट करतात ! सगळे कसे एकासारखेच दुसरे ! जणु मीच आहे त्यांच्यात !

फरक एवढाच की तीनशे खोल्यातून जिथे प्रतिभाताईंचा "मी" मराठीत बोले, तिथे आता प्रणवदांचा "मी" बंगालीत बोलतोय ! राहूलचा "मी" जिथे मुस्लिमांची सलगी करू पाहतोय, तिथे मोदींचा "मी" मशीदी दुरुस्त करून देऊ का म्हणू पाहात आहे.
मी-मराठी लोकांची मुले लग्ने झाली की वेगळी राहायला लागत तशीच, आजकाल मी-गुज्जूंची मुलेही वेगळी पडताहेत.
अमेरिकेतली "मी"मंडळीही इथल्याचसारखी बाळंतपणाला सुनेच्या आईवडिलांना बोलवीत आहेत, व नंतर मुलाचे आईवडील जाऊन वाढलेल्या नातवाचे कौतुक करीत आहेत. ह्या सारखेपणाचा कंटाळा येऊन इथला कोणी "मी"आयुष्य उधळून देतोय, तसेच तिथला कोणी "मी" हातात बंदूक घेऊन प्रहार करीत आहे. सारखा असलेलाही मी आणि बंडखोरी करणाराही मीच्‌ !
युगे न्‌ युगे हा मीच सगळीकडे संभवतो आहे. संभवामि युगे युगे !
-----------------------------------------------------

No comments:

Post a Comment