जाणिवेचे तग धरणे
---------------------
मानव प्रजातीला एक प्रकारची जाणीव ( कॉन्शसनेस ) असते. ही इंद्रियांकडून कळण्यापल्याडची जाणीव असते. आजकाल तर ही जाणीव झाडांना, कीटकांना वगैरे सूक्ष्म जीवांनाही असते असे मान्यता पावले आहे.
ह्याच जाणीवेच्या असण्याने आपल्याला आसमंताची ओळख होते व त्यात अनुभवाने वावरायला सोपे जाते. ह्यातच शिकण्याचा, कळवण्याचा, एक भाग म्हणून भाषा आपण वापरतो खरे, पण भाषेतले शब्दांचे अर्थ हे नेमके नसून मोघम ( धूसर ) असतात व अॅबस्ट्रॅक्टच असावेत असे आता भाषाशास्त्र सांगायला लागले आहे. ( जसे : “चांगला” म्हणजे नेमके किती चांगला हे धूसर असल्याने आपली किती सोय होते ना ? ).
कदाचित् माणसाला तग धरण्यासाठी ( सर्व्हाईव्हल ) ही “जाणीव असणे”, मदत करीत असेल. जसे जेव्हा आपण झाडांवर राहात होतो तेव्हा “फांदी सळसळली”, ही जाणीव झाली, पण त्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले, ते जगले नाहीत व ज्यांना त्या सळसळण्याने “शत्रू जवळ आलाय” हे “जाणवले” ते तगले.
जाणीवेच्या सबंध क्षेत्रात कार्यकारण भाव कदाचित शक्यतेतला नसेल. पण कार्यकारण समजायला जाणीव असणे मात्र आवश्यकच असते.
त्यामुळे मुळात आपण अर्थच का शोधतो, ह्याचे संभाव्य कारण उत्क्रांती व तग धरून राहायची वृत्ती हेच असावे !
-----------------
No comments:
Post a Comment