वेडेपण आणि सर्जकता
आजच्या युगात सर्वमान्य झालेले सर्जकतेचे माप म्हणजे आयफोन ! आणि त्याचा जनक आहे स्टीव जॉब ! तसेच त्याच्या बरोबर असलेले मित्र !
त्याने सर्जकतेसाठी हर प्रयत्न केले होते, ज्यात अगदी ड्रग्ज घेणे सुद्धा आले. त्याच्या आयुष्यात शेवटी शेवटी त्याचा एक सहकारी वेडा झालेला होता व रस्त्यात भटके. त्याने एकदा कोणाच्या घरावर दगडं मारले म्हणून त्याला अटक झाली होती. त्याची ही अवस्था पाहून स्टीव्हचे इतर मित्र त्याच्याकडे आले व म्हणाले की तसे आपण सगळेच वेडे आहोत. पण ह्याला असे पोलिसांनी पकडावे डांबावे हे काही चांगले नाही, तरी तू तुझे वजन वापरून त्याला सोडव. स्टीव्हने त्यावर एक दिवस विचार केला व शेवटी तो त्याला सोडवून घरी घेवून आला.
आजच्याच पेपरात एका युनिव्हार्सिटीतले संशोधन आले आहे की सर्जकतेच्या पलीकडे जावून ज्यांनी समुदायांना प्रवृत्त केले असे पुढारी जसे अब्राहम लिंकन, मार्टिन लुथर किंग, महात्मा गांधी, चर्चिल वगैरे पुढारी हे त्यांना भावना-विकार असलेले होते !
म्हणजे वेडेपण नुसतीच सर्जकता नाही तर पुढच्या वाटाही दाखवते !
--------------------
No comments:
Post a Comment