Monday, August 8, 2016

फेसबुक

फेसबुक
-------------
झोपलेले मन सकाळी सकाळीच जरा लाळेळे झालेले असते तेव्हा फेसबुक हे त्या मनाचे मुखप्रक्षालन आहे.
मनातले साचलेले ढकलायला फेसबुक हे चांगले कमोड आहे.
कमोडवर बसून बसून पायाला मुंग्या आल्यावर मनाचे पाय मोकळे करायला फेसबुक हे चांगले जॉगिंग पार्क आहे.
मनाचा हुरूप वाढवायला फेसबुक ही चांगली सकाळची न्याहरी आहे.
मनाला उभारी देणारी फेसबुक ही चांगली पंगत आहे.
पेंगुळलेल्या मनाला काही जुने टाकीत फेसबुक ही चांगली वामकुक्षी आहे.
संध्याकाळच्या रंगांना डोळे मोडीत बघण्याची फेसबुक ही चांगली संधी आहे.
थकून भागून अंग टेकायला फेसबुक ही चांगली पथारी आहे.
दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षे भ्रमित करणारे फेसबुक हे सखोल मायाजाल आहे !
---------------------------

No comments:

Post a Comment