Friday, August 26, 2016

बीभत्स गाळावा : २

बीभत्स गाळावा : २

-----------------------------

कला आणि नीती ह्यांचा काही संबंध असावा असे वाटणाऱ्यांचा एक पक्ष असू शकतो तर काहींना कला ही फक्त कलामूल्यांवरच जोखली जावी असे वाटू शकते.

एक ताजे उदाहरण पाहू. ओरिसा राज्यात एका गरीब माणसाची बायको मेली. क्रिया कर्म करण्यासाठी त्याला हॉस्पिटल पासून ६० मैल दूर जावे लागणार होते. त्याच्याकडे शव अॅम्बुलन्सने न्यायचे पैसे नव्हते. त्याने ते शव चक्क खांद्यावरून नेले. १० मैल. काही वार्ताहरांच्या प्रयत्नांनी नंतर त्याला सोय मिळाली.

आता ही झाली बातमी. जर्नालिझम ने आपल्याला सविस्तर माहिती दिली.

एका चित्रकाराने ह्यावर एक रेखाटन केले. आता त्याच्या रेखांमध्ये अॅनॉटोमी शास्त्राबरहुकूम शवाच्या रेखाटनात कलामूल्य आहे का, rigor mortis सेट झाल्याने शवाचे मोटे सारखे दिसणे आहे का ह्या कलानिकषावर ही कलाकृती निकृष्ट का श्रेष्ठ ठरवणे हा झाला एक प्रकार व दुसरा हे रेखाटन पाहिल्यावर अनुकंपा पाहणाऱ्याच्या मनात जागते का हा. अनुकंपाच चित्रकाराला वाटायला पाहिजे वा त्याने तसे न वाटताही अनुकम्पाच दाखवायला पाहिजे असा काही नियम नाही. एखाद्याला शवाचे उघडे नागडे स्वरूप दाखवावे वाटले तरी त्याला मुभाच आहे. पण नीती शास्त्राने चित्रातून अनुकंपा दिसली तर कलेचा आणि नीतीचा दाट व योग्य संबंध आला असे आपल्याला वाटणे गैर ठरू नये. ह्या उलट शवाचे चित्र पाहून उद्वेग आला, किळस आली, तर तो बीभत्सपणा काय कामाचा व त्यात कसली कला ?

ज्ञात अज्ञात चित्रकर्त्यांची क्षमा मागून ( परवानगी न घेतल्याने ) खालील चित्रे पहा व ठरवा की बीभत्स गाळावा ?

--------------------

No comments:

Post a Comment